Cold & cough remedies- सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. अशातच काही आजार सुद्धा पावसाळ्यात आपल्याला होतात. खासकरुन सर्दी-खोकला किंवा ताप येतो. पावसाळ्यात व्हायरल, बॅक्टेरियल आणि फंगल इंन्फेक्शन सुद्धा होतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे अधिक महत्वाचे आहे. यामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी योग्य डाएट आणि दररोज व्यायाम करणे फार महत्वाचे आहे. मास्क घाला आणि थंड- आंबट गोष्टी खाणे पावसाळ्यात तरी टाळा. अशातच तुम्हाला सर्दी-खोकला झाला असेल तर तुम्ही घरगुती उपायांनी यापासून सुटका मिळवू शकता.
बहुतांश जण घरगुती उपाय म्हणून दूधात हळद टाकून त्यात काळी मिरी आणि मध मिसळून पितात. तसेच गरम पाण्याच्या गुळण्या ही केल्या जातात. यामुळे तुम्हाला सर्दी-खोकल्या पासून काही वेळ आराम मिळेल पण हळूहळू ही समस्या ही दूर होण्यास मदत होईल. तर पाहूयात कोणत्या घरगुती उपायांनी सर्दी-खोकल्यापासून आपण बरे होऊ शकतो.
-आलं आणि मध
जेवल्यानंतर अर्ध्या तासांनी एक चमचा आल्याची पावडर ही एक चमचा मधात मिसळून हे मिश्रण दिवसातून दोन वेळा घ्यावे. तर लहान मुलांना देत असाल तर एक चतुर्थांश चमचाच द्या.
-हळद, काळी मिर्ची आणि मध
एक चमचा हळदीत चिमुटभर काळी मिर्ची आणि मध मिळून दिवसातून दोन दिवस घ्या. हे मिश्रण जेवल्यानंतर अर्ध्या तासांनी घ्या.
हे देखील वाचा- फक्त चवच नाही, तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे ‘असा’ चहा, तुम्हाला त्याबद्दल माहितीये का?

-गरम हर्बल चहा
तुम्ही दिवसभरात गरम हर्बल चहा पिऊ शकता. जसे की, तुळस, मेथी, आलं, पुदीना आणि मुलैठीची चहा.
-मुलैठी आणि मध
एक चमचा मुलैठी मध्ये एक चमचा मध मिसळून खा.जेवल्यानंतर ४० मिनिटानंतर दिवसभरातून दोन वेळा खा. जर तुम्हाला हायपरटेंन्शन म्हणजेच ब्लड प्रेशरचा रुग्ण असाल तर मुलैठी खाऊ नका. लहान मुलांना ते अर्धा चमचाच द्या.
या व्यतिरिक्त पुदीना, मेथी, जीर आणि हळद टाकून उकळा आणि त्याची वाफ घ्या. त्याचसोबत संपूर्ण दिवस उकळलेले पाणी प्या. त्याचसोबत तुम्ही मेथीच्या दाण्याचा वापर सर्दी-खोकला दूर घालवण्यासाठी वापर करु शकता. कारण मेथीच्या दाण्यात अँन्टीबॅक्टिरियल गुण असतात. त्यामुळे तुम्ही मेथीच्या पाण्याचा वापर करु शकतात. म्हणजेच हे पाणी शरिरातील हानिकार बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी मदत करते. त्याचसोबत रोगाच्या संक्रमणापासून बचाव करते. त्यासाठी तुम्ही एक मोठा चमचा मेथीचे दाणे गरम पाण्यात उकळवून घ्या. याचे सेवन तुम्ही नियमित रुपात करु शकतात.