तुम्ही पेप्सी, 7अप, ड्यू आणि मिरिंडा सारखे सॉफ्ट ड्रिंक जरुर पित असाल. तर सर्वांनाच माहिती आहे की, हे सॉफ्ट ड्रिंक्स पेप्सीको तयार करते. पण तुम्हाला हे माहिती आहे का, या सॉफ्ट ड्रिंकच्या बॉटल जेव्हा पॅक होऊन येतात तेव्हा त्या कोण तयार करत असेल? खरंतर हे सुद्धा काम पेप्सीकोच करते असा विचार करत असाल तर तो चुकीचा आहे. कारण पेप्सीको या बॉटल एक भारतीय कंपनी वरुण ब्रेवरेजेस यांच्याकडून पॅकिंग केल्या जातात. या कंपनीचे मालक आहेत अरबपति रवि कांता जयपुरिया. देशात ते कोला किंगच्या नावाने प्रसिद्ध आहे. ते ७३ हजार कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. (Cola King India)
अमेरिकेबाहेर वरुण ब्रेवरेजेस पेस्सीची सर्वाधिक दुसरी मोठी बॉटलिंग पार्टनर आहे. बॉटल तयार करण्यासह रवि जयपुरिया यांची ही कंपनी पेप्सीकोचे प्रोडक्ट्स भारतात सुद्धा डिस्ट्रिब्युट करते. वरुण ब्रेवरेजेस व्यतिरिक्त जयपुरिया यांची आणखी एक कंपनी देवयानी इंटरनॅशनल सुद्धा आहे. ही कंपनी भारतात केएफसी, पिज्जा हट, कोस्टा कॉफी आणि डीब्ल्यूजी टी आउटलेट्सचे संचालन करते. फोर्ब्सनुसार, रवि जयपुरिया यांचे नेट वर्थ ८.९ बिलियन डॉलक आहे. फोर्ब्सच्या लिस्टमध्ये त्यांचे २३ वे स्थान आहे. ते भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या लिस्टमध्ये २१ व्या क्रमांकावर आहेत.

रवि जयपुरिया हे एक मारवाडी परिवारातील आहेत. जे आरजे कॉर्पचे चेअरमॅन आहेत. आरजे कॉर्प ही वरुण ब्रेवरेज आणि देवयानी इंटरनॅशनलचे प्रबंधन करते. रवि यांनी आपले शालेय शिक्षण दिल्लीतील मथुरा रोड येथील डीपीएस शाळेतून केले. बिझनेस मॅनेजमेंटचा अभ्यास हा त्यांनी अमेरिकेतून केला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९८५ मध्ये ते अमेरिकेतून भारतात आले आणि आपल्या परिवाराच्या व्यवसायात त्यांनी एन्ट्री केली.
१९८७ मध्ये रवि यांच्या परिवाराच्या संपत्तीत वाटणी झाली. त्यांच्या वाटणीत त्यांना एक बॉटलिंग प्लांट मिळाले. जयपुरिया यांनी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांनी पेप्सीको सोबत करार केला आणि कंपनीसाठी बॉटल्स तयार करु लागले. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. जयपुरिया यांच्या लग्नाच्या काही वर्षानंतरच एक विमान अपघातात त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यांचा मुलगा वरुण आणि मुलगी देवयानी आहे. या दोन्ही मुलांच्या नावावरच त्यांनी आपल्या दोन्ही कंपन्या सुरु केल्या आहेत. (Cola King India)
हे देखील वाचा- एलॉन मस्क यांचा Successful Failure फॉर्म्युला
रवि जयपुरिया यांची हेल्थकेअर फर्म मेदांता आणि हॉटेल चेन लेमन ट्री मध्ये सुद्धा त्यांचा हिस्सा आहे. तर आरजे ग्रुपच्या मार्च २०२३ पर्यंतच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, आरजे कॉर्प लिमिटेडकडे पब्लिकली ७ स्टॉक्स आहेत. ज्यांचे नेट वर्थ ३७,३३४.१ कोटी रुपये आहे.