Home » पेप्सी आणि कोकचे उत्पादन काही दिवसांनी थांबण्याची शक्यता?

पेप्सी आणि कोकचे उत्पादन काही दिवसांनी थांबण्याची शक्यता?

by Team Gajawaja
0 comment
Production of coke
Share

उन्हाळ्याच्या या मौसमामध्ये थंडा थंडा कूल कूल अशा कोल्डड्रिंकना बाजारात मोठी मागणी असते. त्यातही तरुण पिढीमध्ये पेप्सी कोकसारखी पेय अधिक लोकप्रिय आहेत. पण या पेप्सी आणि कोकचे उत्पादन काही दिवसांनी थांबेल की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याला कारण सुदानमधील गृहयुद्ध आहे. 15 एप्रिलपासून सुदानमध्ये गृहयुद्ध सुरु आहे. या युद्धामुळे सुदान उध्वस्त झाले आहेच, पण त्याचवेळी सुदानमधील कच्चामालापासून तयार होणा-या उत्पादनावरही बंधनं आली आहेत. त्यातीलच एक म्हणजे पेप्सी आणि कोक ही पेय. पेप्सी-कोकसाठी सुदान येथील दुर्गम भागात होणारा एक विशिष्ट गम वापरण्यात येतो. हाच गम काही औषधांमध्येही वापरण्यात येतो.  त्यामुळे पेप्सी आणि कोकसोबत काही औषधांची निर्मितीही धोक्यात आली आहे. (Production of coke) 

15 एप्रिलपासून सुदानमध्ये गृहयुद्ध सुरु झाले आहे. सुदानच्या दोन लष्करी अधिका-यांमध्ये वर्चस्वासाठी सुरु असलेल्या या लढाईनं हा अफ्रीकेचा देश पार उध्वस्त झाला आहे. त्यातील बहुतांशी परकीय नागरिक निघून गेले आहेत. मुळ नागरिकही शेजारच्या देशांमध्ये आस-यासाठी गेले आहेत. आधीच या देशात उद्योगधंदे मर्यादीत होते. सुदानमध्ये मुख्य उप्तादनासाठी लागणारा कच्चा माल मुबलक उपलब्ध आहे.  हा कच्चामाल अनेक मोठ्या उद्योगधंद्यांना पुरवण्यात येतो. त्यापैकी कच्चामाल म्हणजे गोंद आहे. बाभूळ डिंक म्हणूनही त्याला ओळखले जाते.  या बाभूळ डिंकाची मागणी कोल्डड्रींकसाठी मोठी आहे. (Production of coke)

एप्रिलमध्ये सुरु झालेले हे गृहयुद्ध कधी थांबेल याची नक्की माहिती आता देता येत नाही. सुदानमधील संपूर्ण व्यवस्था आता कोलमडली आहे.  या सर्वांचा फटका कोक आणि पेप्सीसारख्या मोठ्या कोल्ड्रींग कंपन्यांना बसला आहे. जर सहा महिन्यात हे गृहयुद्ध थांबले नाही तर या कंपन्यातील उत्पादन पूर्णपणे बंद होण्याची भीती कंपन्यांकडून व्यक्त होत आहे. सुदानमधील युद्ध न थांबल्यास 3 ते 6 महिन्यांत या मोठ्या कंपन्या बंद होणार आहेत. त्यामुळे हजारो कामगारही बेकार होण्याची भीतीही आहे. याशिवाय औषध उद्योगावरही या युद्धाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.  एकट्या सुदानमधून 66 टक्के डिंकाचा पुरवठा केला जातो. (Production of coke)  

सुदानमधील विशिष्ट भागात ही डिंक मिळतो. बाभुळाच्या झाडांनी हा सर्व भाग व्यापला आहे. येथील स्थानिक नागरिक या झाडापासून डिंक काढतात आणि त्याची थेट खरेदी या कोल्ड्रिंगच्या कंपन्या करतात. कोक आणि पेप्सीसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्या या डिंकाला मोठी किंमत देतात. यावर येथील स्थानिकांनाही मोठा आर्थिक लाभ मिळत होता. मात्र सुदानमधील गृहयुद्ध सुरु झाल्यावर हे सर्व बंद झाले. शीतपेयांची चव टिकवण्यासाठी हा डिंक गरजेचा आहे. याशिवाय शीतपेयांचा रंग आणि त्याची चव टिकवण्यासाठी हा डिंक गरजेचा असतो. याशिवाय हा डिंक च्युइंगम आणि मऊ कँडीमध्ये वापरला जातो. शिवाय औषधांमध्येही त्याचा मोठा वापर आहे. याशिवाय वॉटर कलर पेंट्स, टाइल्सची चमक, प्रिंट मेकिंग, गोंद, सौंदर्यप्रसाधने, फार्मास्युटिकल्स, वाईन, शू पॉलिश क्रीम आणि काही दैनंदिन उत्पादनांमध्येही हा डिंक वापरला जातो.  या सर्वांच्या जागतिक दर्जाच्या अनेक कंपन्या सुदानमधील डिंकावर अवलंबून आहेत.  सुदानची सर्व आर्थिक व्यवस्थाच या डिंक उत्पादन आणि त्याची निर्यात यावर अवलंबून आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मात्र आता ही डिंकाची निर्यात पूर्णपणे थांबली आहे. परिणामी अनेक सुदामी नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.  शिवाय जागतिक दर्जाच्या कंपन्या बंद करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, सुदानची अर्थव्यवस्था अवलंबून असलेले डिंकाचे उत्पादन वाढवण्यासाठी यूएनची विशेष तज्ज्ञांची टीम अनेक वर्षांपासून सुदानमध्ये काम करत होती.  त्यामुळे या उत्पादनात 20 टक्के वाढ झाल्याचेही सांगण्यात येते.(Production of coke)  

=======

हे देखील वाचा : ब्रिटनमध्ये ई सिगरेटचे वाढते व्यसन…

=======

या नैसर्गिक डिंकाची झाडे चाड, नायजेरिया, सेनेगल आणि माली येथेही आढळतात. मात्र सुदानमध्ये त्याची झाडे अधिक आहेत. 15 एप्रिल रोजी सुदानमध्ये गृहयुद्ध सुरू झाल्यानंतर, या डिंकचे उत्पादन काढले जात असले तरी त्याची निर्यात पूर्णपणे थांबली आहे. हा डिंक दुर्गम वाळवंटी भागात आढळतो. व्यापारी स्थानिकांकडून तो विकत घेतात आणि मग त्याची निर्यात होते. गृहयुद्ध सुरु झाल्यावर अशी निर्यात करण्याच्या प्रयत्न करणा-यांचा जीवही गेला आहे.  त्यामुळे ही निर्यांत पूर्णपणे थांबली आहे. एकट्या सुदानमध्ये  या डिंकाची झाडे सुमारे 5 लाख चौरस किलोमीटरवर पसरलेली आहेत.  त्यावरुन या डिंकाचे उप्तादन किती प्रमाणात होत आहे, याची कल्पना मिळते. सध्या सुदानची परिस्थिती भयानक आहे.  युनायटेड नेशन्सच्या म्हणण्यानुसार, लढाईमुळे सुदानच्या अनेक भागात पाणी आणि वीज पुरवठा थांबला आहे. लोकांना खायला अन्नही मिळत नाही. यामुळे सुमारे हजारो नागरिकांनी देश सोडला आहे.  हे गृहयुद्ध जेवढा वेळ लांबेल तेवढी त्या देशाची घडी पूर्णपणे विस्कटणार आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.