Home » सीरप तयार करणाऱ्या ‘या’ कंपनीने सॉफ्ट ड्रिंकच्या जगात असा रचला इतिहास

सीरप तयार करणाऱ्या ‘या’ कंपनीने सॉफ्ट ड्रिंकच्या जगात असा रचला इतिहास

by Team Gajawaja
0 comment
Coca Cola
Share

सध्या कोका कोला (Coca Cola) चर्चेत आहे. याचे कारण असे की, खास प्रकारची बॉटल कंपनीने नुकतीच मार्केटमध्ये उतरवली आहे. कंपनीने दिवाळीच्या मुहूर्तावर अशी एक बॉटल लॉन्च केली आहे ज्याचे झाकण हे ब्लुटूथच्या माध्यमातून अनलॉक केले जाणार आहे. कोका कोला त्या ब्रँन्ड्समध्ये सहभागी आहे ज्यांनी सॉफ्ट ड्रिंकच्या जगात रेकॉर्ड बनवला आहे. आजच्या तारखेला या कंपनीचे जगभरातील २०० देशांमध्ये २०० हून अधिक ब्रँन्च विक्री करण्यात आली आहे. कोका कोलाची सुरुवात १८८६ मध्ये अटलांटा येथे झाली होती. याची सुरुवात केली ती म्हणजे फार्मासिस्ट जॉन पेम्बर्टन यांनी.

आपल्या लॅबमध्ये जॉन यांनी औषधासंबंधित प्रगोयादरम्यान सोड्यापासून खास पद्धतीचे लिक्विड तयार केले. ते तयार केल्यानंतर काही लोकांना त्याची स्वाद घेण्यास सांगितला. तेव्हा त्या लोकांना अत्यंत आवडला. अशा प्रकार कोका कोलाचा फॉर्म्युल्याचा शोध लागला. पण आजही त्याचा फॉर्म्युला कोणालाही जास्त माहिती नाही.

Coca Cola
Coca Cola

असे पडले नाव
कंपनीच्या अधिकृत वेबसाइटनुसार ८ मे १८८६ हाच तो दिवस होता जेव्हा पहिल्यांदा लोकांनी कोका कोला टेस्ट केला होता. सुरुवातीला तो बॉटल नव्हे तर एका ग्लास मध्ये दिला जायचा. दररोज फक्त ९ ग्लासची विक्री व्हायची. हळूहळू लोकांच्या जीभेवर याची चव येऊ लागली. त्याला सॉफ्ट ड्रिंकचे नाव देण्याचे काम जॉन यांचा अकाउंटट फ्रँक रॉबिनसन यांनी केले. त्यांचे असे मानणे होते की, जर कंपनीचे नाव सी अक्षरावरुन ठेवल्यास फायदेशीर ठरेल.

हे देखील वाचा- दुर्लभ गुलाबी हिऱ्याची तब्बल ४८० कोटींना लिलावात विक्री, का आहे हा हिरा एवढा महाग?

ते गुपित कधीच समोर आले नाही
धक्कादायक बाब अशी की, ही कंपनी फक्त सीरप तयार करायची. यामध्ये पाण्यासह साखर ही दुसऱ्या ठिकाणी मिक्स केली जाते. गेल्या १३६ वर्षाच्या प्रवासात कंपनी आपली सीरप बॉटलिंग पार्टनरटची विक्री करते. तो पार्टनर ज्यामध्ये पाणी, स्वीटनर, सोड्यासह बॉटलमध्ये पॅक करुन मार्केट मध्ये पोहचवते. काळानुसार कंपनीने विविध पद्धतीचे सॉफ्ट ड्रिंक्स सुद्धा तयार केले. मात्र कोका कोलाच्या (Coca Cola) टेस्टमध्ये बदल केला नाही. सध्या कंपनीचे फँन्टा, थम्सअप आणि स्प्राइटसह २०० ब्रँन्ड मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.

कोका कोलाचे सीरप कसे तयार होते आणि त्याची रेसपी काय आहे हे आजवर कोणालाही कळली नाही. याची माहिती फक्त कंपनीच्या एक-दोन जणानांच आहे. कोका कोलाच्या फॉर्म्युल्याची मुळ कॉपी अटलांटाच्या सन ट्रस्ट बँकेत ठेवण्यात आली आहे. बँकने कधीच त्याबद्दल कोणाला सांगू नये म्हणूत कंपनीने त्यांना आपले ४८.३ मिलियन शेअर्स दिले आहेत. ऐवढेच नव्हे तर कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये सुद्धा त्यांना सहभागी केले आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.