स्टाइलिश आणि ट्रेंडिंग लूक मध्ये आपण दिसण्यासाठी लोक काही ब्रँन्डेड कपडे घालणे पसंद करतात. कारण महागडे कपडे हे तुमचे व्यक्तिमत्व सुद्धा तेवढेच आकर्षक करते असे मानले जाते. परंतु हे कपडे जेव्हा धुवायचे असतात तेव्हा काही चुका केल्या जातात. ज्यामुळे तुमचा महागडा एखादा ड्रेस, साडी खराब होते. काही गोष्टींबद्दल माहिती नसल्याने लोक ते कपडे सुद्धा आपण दररोजच्या कपड्यांप्रमाणे धुतो. त्यामुळे काहीवेळ कपड्याचा रंग फिका होते किंवा त्याची चमक कमी होते. अशातच आम्ही तुम्हाला महागडे कपडे धुताना कशा पद्धतीने काळजी घ्याल याच बद्दलच्या काही टीप्स शेअर करणार आहोत. (Cloths Washing Tips)
-लेबल वाचणे विसरु नका
कपडे धुताना काही वेळेस लोक सर्व कपडे एकत्रित धुण्यासाठी टाकतात. त्यामुळे महागडे कपडे लवकर खराब होतात. अशातच तुम्ही ते कपडे वेगळे धुतले तर उत्तमच. त्याचसोबत महागडे कपडे धुण्यापूर्वी कपड्यावर लावण्यात आलेला टॅग ही तुम्ही जरुर वाचा. त्यानुसारच कपडे धुवा.
-वॉशिंग मशीनचा वापर करण्यापासून दूर रहा
वॉशिंग मशीनमध्ये महागडे कपडे धुण्यासाठी टाकत असाल तर थांबा. कारण असे कपडे नेहमी हाताने धुवावेत. तसेच त्या कपड्यांवर ब्रश ही लावू नये. यामुळे कपड्यांचे फॅब्रिक टिकून राहिल. आणखी महत्वाचे म्हणजे महागडे कपडे धुण्यासाठी थंड पाण्याचा वापर करणे उत्तम ठरेल.
-डाग स्वच्छ करा
महागड्या कपड्यांवर लागलेला डाग काढण्यासाठी त्याच ठिकाणी थोडं पाणी टाकून बोटाने डाग स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर कपड्यांवर डिटर्जेंट लावून तो स्वच्छ करा. अशाने कपड्यांवरील डाग सहज निघून जाईल.
-कपड्यांना येणारा वास घालवा
महागड्या कपड्यांना येणारा दुर्गंध दूर करण्यासाठी तुम्ही फॅब्रिक सॉफ्टनर किंवा कलर सॉफ्टनरचा वापर करु शकतात. यासाठी तुम्ही पाण्यात या गोष्टी मिसळा आणि कपडे १५ मिनिटांसाठी पाण्यात बूडवून ठेवा. यामुळे कपड्यांचा दुर्गंध निघून जाईल.(Cloths Washing Tips)
हे देखील वाचा- धावपळीच्या आयुष्यात महिलांनी अशा पद्धतीने दूर करा मानसिक थकवा
-महागडे कपडे धुण्याच्या टीप्स
काही लोक कपडे धुण्यासाठी ते जोरात पिळून उन्हात सुकण्यासाठी घालतात. मात्र कपडे पिळल्यानंतर त्या कपड्याचे फॅब्रिक सैल होतेच. पण कडक उन्हात कपड्यांचा रंग हा फीका पडतो. त्यासाठी महागडे कपडे हलक्या हाताने पिळून सामान्य उन्हात वाळत घाला.