प्रत्येकाला खरेदी करण्याची फार आवडत असतो. खरेदी ही कोणत्याही वस्तूची किंवा कपड्यांची असो ती वेळोवेळी आवर्जून केलीच जाते. खासकरुन महिलांना भरपूर प्रमाणात शॉपिंग करणे आवडते. त्यामुळे जेव्हा कधी अॅमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या अन्य इ-कॉमर्स बेवबाइट किंवा एखाद्या कपड्यांच्या दुकानात सेल लागतो तेव्हा बहुतांश महिला या शॉपिंग नक्कीच करतात. मात्र तुम्हाला शॉपिंग करताना काही समस्या आल्या आहेत का? म्हणजेच स्वत:साठी कपड्याची साइज कशी निवडावी किंवा कपड्याचे मटेरियल कसे असेल असे विविध प्रश्न तुम्हाला कधी उद्भवले आहेत का? या व्यतिरिक्त सर्वात महत्वाचे म्हणजे एखादे कपडे आपण ज्यावेळी खरेदी करतो तेव्हा त्याच्या किंमतीसह कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. अन्यथा आपली फसवणूक किंवा आपण जे कापडे ऑर्डर केलेयंत तसे न आल्यास आपल्या पदरी निराशा पडू शकते. तर जाणून घेऊयात शॉपिंग करताना नक्की कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.(Clothes Shopping Tips)
-कपड्यांची गुणवत्ता
जेव्हा आपण एखादे नवे कपडे खरेदी करतो तेव्हा त्याची गुणवत्ता म्हणजेच क्वालिटी तपासून पहावी. कपडयांची किंमत अधिक असेल तर त्याची क्वालिटी उत्तमच असेल असे नाही. तुम्ही तुमच्या शिखाला परवडणाऱ्या किंमतीत उत्तम गुणवत्तेचे कपडे खरेदी करु शकता. मात्र एक गोष्ट अशी की, कपड्याची गुणवत्ता जेवढी उत्तम तेवढे ते अधिक टिकतात आणि आरामदायी सुद्धा असतात.
-कंम्फर्टेबल असावेत
कपडे खरेदी करताना नेहमीच लक्षात ठेवा आपण जे वस्र घेणार आहोत ते आपल्यासाठी कंम्फर्टेबलच असतील. काही वेळेस दुकानदार सांगतोय म्हणून आपण त्याच्या बोलण्यावरुन कपडे घेतल्यास आपल्याला ते पुन्हा घालावेसे वाटत नाही. तसेच कापडाचा प्रकार आणि शिलाई याकडे जरुर लक्ष द्या.
हे देखील वाचा- जाड असाल, तर साडी नेसताना अजिबात करू नका ‘या’ चुका, संपूर्ण लुक होईल खराब
-ऑनलाईन कपड्यांची क्वालिटी कशी तपासून पाहाल
जेव्हा आपण एखाद्या मॉल मधून कपडे खरेदी करतो तेव्हा ते हातात घेऊन पाहतो किंवा ट्रायल करुन पाहतो. मात्र ऑनलाईन शॉपिंग करताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे लागते. नेहमी अधिकृत वेबसाइटसह एखादे कपडे घ्यायचे झाल्यास त्यासंबंधित अधिक माहिती सुद्धा जरुर वाचा. कारण ऑनलाईन कपडे खरेदी करताना आपल्याला त्याच्या कापडाच्या गुणत्तेबद्दल कळत नाही. त्यामुळेच ऑनलाईन कपडे खरेदी करताना त्याखाली दिलेले रिव्हू किंवा कपड्यासंदर्भातील माहिती सुद्धा वाचण्यास विसरु नका.(Clothes Shopping Tips)
-कपडे कसे धुवावेत
जर तुम्हाला खरेदी केलेले कपडे अधिककाळ टिकवून ठेवायचे असतील ते व्यवस्थितीत सुद्धा ठेवावे लागतात. या व्यतिरिक्त कपडे धुताना सुद्धा त्याची काळजी घ्यावी लागते. एखादे कपडे कसे धुवावेत याची माहिती त्यावर असलेल्या टॅगवर लिहिलेली असते. जर तुमच्याकडे वॉशिंग मशीन नसेल तर असे कपडे घेणे टाळा जे फक्त मशीनमध्येच स्वच्छ धुतले जातात.
-कपड्याचा रंग फिकट तर होत नाही ना?
आपण जेव्हा एखाद्या दुकानातून कपडे खरेदी करतो तेव्हा त्याच्या क्वालिटीकडे लक्ष द्यावेच. पण काही वेळेस असे ही होते की, महागड्या कपड्यांचा रंग सुद्धा धुतल्यानंतर फिकट होते. त्यामुळे कपडे खरेदी करण्यापूर्वी दुकानदाराला त्याच्या रंगाबद्दल जरुर विचारुन घ्या.