Home » जेव्हा साबण-सर्फ नव्हता तेव्हा राजा-राणीचे कपडे कसे स्वच्छ व्हायचे?

जेव्हा साबण-सर्फ नव्हता तेव्हा राजा-राणीचे कपडे कसे स्वच्छ व्हायचे?

by Team Gajawaja
0 comment
Clothes Washing Technic
Share

१९ व्या शतकाच्या आधीपर्यंत भारतात ना साबण होता ना कपडे धुण्यासाठी कोणतेही ड्राय क्लिनिंग सारखे तंत्रज्ञान. तो असा काळ ही होता जेव्हा आजच्या प्रमाणे भारतीयांकडे अधिक कपडे नसायचे. त्यांच्याकडे फक्त काही निवडक कपडे असायचे. ते स्वच्छ करुन आपले काम करायचे. मात्र राजे-रजवाड्यांबद्दल ही बाब वेगळी आहे. त्यांच्याकडे एकापेक्षा एक महागडे कपडे असायचे. पण तेव्हा भारतात अखेर कपडे स्वच्छ कसे करायचे? (Clothes Washing Technic)

तुम्ही कधी या गोष्टीवर विचार केला आहे का जेव्हा साबण आणि सर्फ नसायचा तेव्हा कपडे कशाने धुतले जायचे? राजा-राणींचे ऐवढे महागडे कपडे कसे स्वच्छ होऊन चकचकीत दिसायचे? कशा प्रकारे सामान्य लोक आपले कपडे धुत असतील तर याच सर्वांबद्दल आपण आज जाणून घेऊयात.

भारतात आधुनिक साबणाची सुरुवात १३० वर्षांपूर्वी ब्रिटिश शासनात झाली होती. लीबर ब्रदर्श इंग्लंडने भारतात पहिल्यांदा आधुनिक बाजारात उतरवण्याचे काम केले होते. आधी तर ब्रिटेन मधून साबणाची आयात केली जायची आणि त्याची मार्केट व्हायची. जेव्हा भारतात लोक साबणाचा वापर करु लागले तेव्हा पहिल्यांदा त्याची येथे फॅक्ट्री सुरु करण्यात आली. ही फॅक्ट्री अंघोळीचा आणि कपडे स्वच्छ करण्याचा साबण तयार करायी. नॉर्थ वेस्ट सोप कंपनी पहिली अशी कंपनी होची ज्यांनी १८९७ मध्ये मेरठ येथे साबणाचा कारखाना सुरु केला. या उद्योगाला खुप यश मिळाले. त्यानंतर जमशेदजी टाटा यांनी हा उद्योगात पहिल्यांदा एन्ट्री केली.मात्र आता प्रश्न असा उपस्थितीत राहतो की, साबणाचा जेव्हा भारतात उपयोग व्हायचा नाही तेव्हा काय केले जायचे?

Clothes Washing Technic
Clothes Washing Technic

रीठाचा वापर
भारत वनस्पती आणि खनिजांनी समृद्ध आहे. देशात रीठा नावाचे झाडाचा कपडे स्वच्छ करण्यासाठी खुप वापर केला जायचा. राजांच्या महलांमध्ये रीठाचे झाडं अथवा रीठाचे गार्डन तयार केले जायचे. महागडे रेशमी वस्र हे किटकमुक्त आणि स्वच्छ करण्यासाठी रीठाचा वापर केला जायचा. तर आजही रीठा सर्वाधिक उत्तम ऑर्गेनिक प्रोडक्ट आहे. केस धुण्यासाठी सध्या त्याचा अधिक वापर केला जातो. रीठा पासून तयार करण्यात आलेला शॅम्पू ही बाजारात उपलब्ध आहे. जुन्या काळात राणी आपले केस रीठाने स्वच्छ धुवायच्या.

गरम पाण्यात टाकून कपडे उकळवले जायचे
तेव्हा दोन प्रकारे कपडे स्वच्छ केले जायचे. सामान्य लोक गरम पाण्यात कपडे टाकायचे आणि ते उकळवायचे. त्यानंतर त्यामधून काढून काही प्रमाणात थंड झाल्यानंतर ते दगडांवर आपटायचे. जेणेकरुन कपड्यांमधील मल निघून जाईल. हे काम मोठी भांडी आणि भट्ट्या लावून केले जायचे. आता भारतात जसे धोबी घाट आहे. तेथे सुद्धा अशाच पद्धतीने कपडे धुतले जातात. त्यामध्ये साबण किंवा सर्फचा वापर केला जात नाही. (Clothes Washing Technic)

हे देखील वाचा- राजस्थान मधील ‘या’ गावात ७०० वर्षांपासून उभारलेच नाही दुमजली घर, नक्की काय आहे कारण?

महागडे कपडे रीठाच्या फेसाने धुतले जायचे
महागडे आणि मुलायम कपड्यांसाठी रीठाचा वापर केला जायचा. पाण्यात रीठाची फळं टाकून ती गरम केली जायची. असे केल्याने पाण्यात फेस निर्माण व्हायचा. त्यामध्ये कपडे टाकून ब्रश, हात किंवा लाडकावर घासल्यानंतर ते केवळ स्वच्छच नव्हे तर किटकमुक्त सुद्धा व्हायचे. शरिरावर त्याचा कोणताही परिणाम व्हायचा नाही.

त्याचसोबत प्राचीन भारतच नव्हे तर काही दशकांपूर्वी परयंत माती आणि राखेचा वापर करुन अंग स्वच्छ केले जायचे. आपले हात ही त्यानेच धुतले जायचे. राख आणि मातीचा वापर करुन भांडी सुद्धा स्वच्छ केली जायची. जुन्या काळात लोक स्वच्छतेसाठी मातीचा वापर खुप करायचे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.