Home » बदलत्या हवामानाचा कॅलिफोर्नियाला तडाखा 

बदलत्या हवामानाचा कॅलिफोर्नियाला तडाखा 

by Team Gajawaja
0 comment
Climate change
Share

अमेरिकेला चक्रीवादळाचा प्रचंड मोठा तडाखा बसला आहे. अमेरिकेची अनेक शहरे पाण्याखाली असून तेथील वीजपुरवठ्यावरही मोठा परिणाम झाला आहे. यामध्ये कॅलिफोर्नियाला सर्वात जास्त फटका बसल्याची माहिती आहे. ज्या कॅलिफोर्नियामध्ये काही महिन्यापूर्वी दुष्काळ होता आता तोच कॅलिफोर्निया सतत येणा-या बर्फ आणि पावसाच्या वादळांमुळे त्रस्त झाल्याचे चित्र आहे. या शहरातील सर्व रस्ते पाण्याखाली असून वीजपुरवठाही खंडित झाला आहे. भारतात पावसात अनेक शहरात पाणी भरल्यावर नागरिकांची सुटका करण्यासाठी बोटींचा वापर करण्यात येतो. सध्या कॅलिफोर्नियामध्येही अशीच परिस्थिती आहे. अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. घरांच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी लागल्यानं या नागरिकांची सुटका करण्यासाठी बोटींचा वापर करण्यात येत आहे. त्यातच या संपूर्ण भागात अंधाराचे साम्राज्य पसरल्यानं परिस्थिती कठीण झाली आहे.  (Climate change)

कॅलिफोर्नियामध्ये बॉम्ब चक्रीवादळाने कहर केल्याची परिस्थिती आहे. अमेरिकेच्या या पश्चिम किनारपट्टीवर पुन्हा एकदा चक्रीवादळाचा जबरदस्त फटका बसला आहे(Climate change). वादळामुळे येथील परिस्थिती बिकट झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पाऊस आणि त्यासोबत बर्फवृष्टी यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. कॅलिफोर्नियामधील अनेक शहरे सध्या पाण्याखाली बुडल्याचे फोटो सोशल मिडीयामधून समोर येत आहेत.  त्यामध्ये या शहरातील बहुतेक गाड्याही पाण्याखीली असल्याची माहिती मिळाली आहे. जोरदार पाऊसासोबत असलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विजेचा पुरवठा करणा-या ताराही पडल्या आहेत.  तीन लाखांहून अधिक लोकांच्या घरांमध्ये आणि व्यावसायिक कार्यालयांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला आहे. येत्या काही दिवसात होणा-या पावसामुळे या शहरातील परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. (Climate change)

 मुसळधार पावसामुळे लाखो नागरिक घरांमध्ये अडकले आहेत. हजारोंच्या घरात पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांना घरे सोडावी लागत आहेत. स्थानिक प्रशासन आणि पोलिस बोटींची मदत घेऊन नागरिकांची सुटका करीत आहेत. मुसळधार पावसाचा रस्त्यांनाही फटका बसला आहे. अनेक रस्ते या पावसाच्या मा-यानं खचले आहेत. फार काय पावसानं विमानांची वाहतूकही मंदावली आहे. सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होणारी अनेक विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली. रेल्वेच्या रुळावर झाडे पडल्याने काही भागातील रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे.(Climate change)

कॅलिफोर्नियामध्ये सातत्यानं बर्फाची आणि मुसळधार पावसासह वादळे येत आहेत. डिसेंबरच्या उत्तरार्धापासून वादळांची ही मालिका पाहायला मिळत आहे(Climate change). डिसेंबरनंतर या भागात पावसामुळे पूर आला आणि त्यानंतर विक्रमी बर्फवृष्टी झाली. यात कोट्यवधी डॉलर्सचे नुकसान झाले आहे. त्यामुळे वारंवार येणा-या या वादळांमुळे आणि  पुराच्या भीतीने येथील स्थानिकांवर स्थलांतरीत करण्याची वेळ आली आहे.  तसेच हजारो नागरिक हा परिसर सोडून अन्य भागात स्थलांतरीत होत आहे,  प्रशासनानेच तसे नागरिकांना आवाहन केल्यामुळे स्थानिक आपली घरे सोडण्याच्या विचारात आहेत.  यातच वाढत्या पुरांमुळे या भागाला भूस्खलनाचा धोकाही जाहीर केला आहे. त्यामुळे स्थलांतरीत करण्यावर स्थानिकांचा भर आहे.  

=======

हे देखील वाचा : ‘या’ ठिकाणी उघडल जाणार साधूंसाठी पार्लर

======

कॅलिफोर्नियामध्ये वारंवार येणा-या वादळांचा आणि पूराचा अभ्यास करण्या-या एका समितीनं यासंदर्भात धक्कादायक अहवाल दिला आहे.   या समितीच्या म्हणण्यानुसार या भागात पावसाचे प्रमाण जसजसे वाढत जाईल, तसा भूस्खलनाचा धोका वाढेल, अशी शक्यता  आहे.  फक्त सहा महिन्यांपूर्वीपर्यंत, कॅलिफोर्नियामध्ये तीव्र दुष्काळ होता. मात्र आता या भागात पूराचे साम्राज्य आहे. निसर्गाच्या या बदललेल्या प्रवाहानं हवामान तज्ञही संभ्रमात पडले आहेत. लॉस एंजेलिस येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील हवामान शास्त्रज्ञ डॅनियल स्वेन यांनी सांगितले की, शक्तिशाली वादळे अचानक येत आहेत.  त्यामुळे त्याचा फटका मोठ्याप्रमाणात बसत आहे.  ही चितींत करणारी गोष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.  या वादळांसोबत जोरदार वाराही वाहत आहे.  ही बदलत्या हवामानाची लक्षणे असून याचा अभ्यास होणे गरजेचे असल्याचे स्वेन यांनी सांगितले.  मात्र त्याआधी ज्या भागात पावसाचे आणि वा-याचे प्रमाण अधिक आहे, तेथील नागरिकांना स्थलांतरीत करावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.  कारण अचानक येणा-या या वादळांमुळे जमिनही खचण्याचा धोका त्यांनी व्यक्त केला आहे. एकूण बदलते हवामान (Climate change) किती घातक असू शकते, याची एक झलकच कॅलिफोर्नियात सतत होणा-या वादळांतून मिळाली आहे.  

 सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.