Home » भारतातील ‘या’ राज्यांचा होणार विध्वंस, रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

भारतातील ‘या’ राज्यांचा होणार विध्वंस, रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

by Team Gajawaja
0 comment
Climate Change Effect
Share

गेल्या काही दिवसांपूर्वी प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार असा दावा करण्यात आला आहे की, बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि पंजाबसह भारतातील नऊ राज्य ही जगातील प्रमुख ५० क्षेत्रांमध्ये सहभागी आहेत जेथे हवामानाच्या बदलच्या धोक्यामुळे मानव निर्मित पर्यावरणाला मोठा धोका उद्भवू शकतो. एका नव्या रिपोर्टनुसार, ही बाब समोर आली आहे. क्रोस डिपेंडेंसी इनिशिएटिवने २०५० पर्यंत जगभरातील २६०० पेक्षा अधिक राज्य आणि प्रातांबद्दल मानव निर्मित पर्यावरणाबद्दल भौतिक हवामानाच्या जोखमीचे आकलन केले आहे. एक्सडीआय हवामान बदलावामुळे होणाऱ्या नुकसानांबद्दल शोध घेण्यासाठी प्रतिब्ध कंपन्यांच्या एक समूहाचा हिस्सा आहे. (Climate Change Effect)

भारत-चीनला सर्वाधिक धोका
मनुष्याने आपल्या गरजेनुसार पर्यावरणात काही बदलाव केले आहेत. मानव निर्मित पर्यावरणात प्रत्येक अशा वस्तूचा समावेश आहे ज्याची निर्मिती व्यक्तीने केली आहे. घर, इमारत, विमानतळ, रेल्वे स्थानक, मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा, रुग्णालय सारख्या मानव निर्मित पर्यावरणाचे प्रमुख भाग आहेत. एक्सडीआयच्या रिपोर्टनुसार, पर्यावरण आणि हवामान बदलामुळे पुर, जंगलांना लागणारी आग, हिटवेव आणि समुद्र स्तरात वाढ झाल्याने इमारती आणि संपत्तीला होणाऱ्या नुकसानीच्या अनुमानांचे आकलन केले गेले. यामध्ये चीन आणि भारतावर विशेष लक्ष दिले गेले आहे. या यादीत एशियाला अधिक धोका आहे. कारण मुख्य २०० क्षेत्रांपेक्षा अधिकाधिक ११४ एशियाई क्षेत्र आहेत.

भारतातील ९ राज्यांना सर्वाधिक धोका
विश्लेषणानुसार, २०५० मध्ये प्रमुख ५० पेक्षा अधिक धोकादायत असणारी राज्य आणि प्रांतांपैकी ८० टक्के चीन, अमेरिका आणि भारतात आहे. मुख्य ५० राज्यांमध्ये चीन नंतर सर्वाधिक नऊ राज्य भारतातील आहेत. त्यामध्ये बिहार, उत्तर प्रदेश, असम, राजस्थान, तमिळनाडू, महाराष्ट्र, पंजाब, गुरात आणि केरळचा समावेश आहे. (Climate Change Effect)

आसाममध्ये ३०० पटींने अधिक वाढणार धोका
आसाम मध्ये मानव निर्मित पर्यावरासाठी हवामानाच्या जोखिममध्ये १९९० च्या तुलनेत २०५० पर्यंत अधिकाधिक ३३० टक्क्यांनी अधिक वाढ होणार असल्याचे दिसून येणार आहे. प्रमुख १०० मध्ये पाकिस्तानच्या काही प्रांतांचा समावेश ही आहे, ज्यामध्ये सिंधचा ही समावेश आहे. जून आणि ऑगस्ट २०२२ च्या दरम्यान, विध्वंसक पुरामुळे पाकिस्तानातील ३० टक्के क्षेत्राला फटका बसला होता. सिंध प्रांतात नऊ लाखांपेक्षा अधिक घर आंशिक रुपात जमिनदोस्त झाली होती.

असे पहिल्यांदा होणार झाले असेल जेव्हा जगातील प्रत्येक राज्य, प्रांत आणि क्षेत्राची तुलना करत विशेष रुपात निर्माण पर्यावरणावर केंद्रित एक भौतिक हवामानाच्या जोखमीचे विश्लेषण केले गेले आहे. नुकसान होणाऱ्या ठिकाणांमध्ये १०० मधील अत्याधिक विकसित आणि जागतिक स्तरावर महत्वपूर्ण एशियाई आर्थिक केंद्रांत बीजिंग, जकार्ता, हो चि मिन्ह सिटी, ताइवान आणि मुंबईचा समावेश आहे.

हे देखील वाचा- भारतात मोठा भूकंप येण्याची शक्यता?

युरोपातील काही परिसरांना धोका
चीनमध्ये धोका असणाऱ्या राज्य आणि प्रांत यांग्त्जी आणि पर्ल नदीच्या पुराचे क्षेत्र आणि डेल्टासह जागतिक स्तरावर पूर्व आणि दक्षिणेला आहे. अमेरिकेत आर्थिक रुपात महत्वपूर्ण कॅलिफोर्निया, टेक्सास आणि फ्लोरिडाला सर्वाधिक फटका बसू शकतो. प्रमुख ५० मध्ये काही प्रांत आणि राज्यांच्या सुचीतील अन्य देशांमध्ये ब्राजील, पाकिस्तान, इंडोनेशियाचा समावेश आहे. युरोपात उच्च रॅकिंग असणाऱ्या राज्यांमध्ये लंडन, मिलान, म्युनिख आणि वेनिसचा समावेश आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.