Home » मातीच्या भांड्यात जेवण बनवत असाल तर ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

मातीच्या भांड्यात जेवण बनवत असाल तर ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

by Team Gajawaja
0 comment
Clay Pots
Share

वर्षानुवर्ष जेवण बनवण्यासाठी प्रत्येक घरात मातीच्या भांड्यांचा वापर केला जायचा. याच दरम्यान आता मातीची भांडी कमी झाली असून त्याजागी अॅल्युमिनियमची भांडी आली आहेत. परंतु अशातच आता पुन्हा मातीची भांडी वापरण्यास शहरात ही सुरुवात झाली आहे.खरंतर मातीच्या भांड्यातच जेवण बनवणे सर्वाधिक सुरक्षित मानले जाते. याचे कारण असे की, ती सच्छिद्र असतात. त्यामध्ये जेवण अगदी हळू आणि समान रुपात शिजण्यास मदत होते. यामध्ये जेवण बनवल्यानंतर ते स्वादिष्टच नव्हे तर यामध्ये पोषक तत्वांचा सुद्धा समावेश होतो. या व्यतिरिक्त मातीच्या भांड्यात जेवण बनवल्याने अत्याधिक तेलाची गरज सुद्धा भासत नाही. (Clay Pots)

खरंतर मातीच्या भांड्यात जेवण बनवणे हा बेस्ट पर्याय आहेच. परंतु ती व्यवस्थितीत सांभाळावी सुद्धा लागतात. अन्यथा जेवण बनवतानाच ती फुटण्याची शक्यता असते. अशातच तुम्ही सुद्धा आपल्या घरात मातीची भांडी आणली असतील तर जेवण बनवताना त्याची कशी काळजी घ्यावी याबद्दल जाणून घेऊयात.

मातीची भांडी पाण्यात भिजवून ठेवा
मातीचे भांडे वापरण्यापूर्वी नेहमी हलक्या स्वरुपात गरम करावीत. त्यामुळे जेवण यामध्ये चिकटत नाही. तर त्याचा वापर करण्यापूर्वी काही तासांसाठी ते पाण्यात बुडवून ठेवावीत. आता ते सुक्या कपड्याने पुसून घ्यावे. त्यानंतर पुन्हा त्यात पाणी भरुन २ मिनटे हलक्या गॅसवर ठेवा. आता त्यामधील पाणी काढून त्यात जेवण बनवण्यास सुरुवात करु शकता.

-जेवण मंद आचेवर शिजवा
स्वयंपाक घरातील सामान्य भांड्यांप्रमाणेच ती भांडी सुद्धा मंच आचेवर ठेवून त्यात जेवण बनवावे. अन्यथा भांडे फुटण्याची शक्यता असते. या व्यतिरिक्त मंद आचेवर जेवण शिजवल्याने ते अधिक स्वादिष्ट होते. (Clay Pots)

-लाकूड किंवा सिलिकॉनचे चमचे वापरा
मातीच्या भांड्यात जेवण शिजवताना ते वरखाली करण्यासाठी तुम्ही स्टीलच्या चमच्यांचा अजिबात वापर करु नका.त्याऐवजी लाकूड किंवा सिलिकॉनच्या चमच्यांचा वापर करा.असे केल्याने भांड फुटण्याची शक्यता फार कमी असते.

हे देखील वाचा- या आंब्यांमध्ये ‘दशहरी आंबा’ हा खास खवय्यांच्या आवडीचा

-अशा पद्धतीने मातीची भांडी करा स्वच्छ
मातीच्या भांड्यांचा पुन्हा वापर करण्यासाठी ते स्वच्छ करताना फार काळजी घ्यावी लागणार आहे. अन्यथा ते फुटू शकतात. ते स्वच्छ करण्यासाठी तुम्ही साबण आणि मुलायम स्क्रबचा वापर करा. त्यानंतर हलक्या हाताने ते स्वच्छ करा. लक्षात असू द्या की, शीत कडक झाल्यास ती जोराने काढण्याऐवजी त्यात बेकिंग सोडा टाकून त्यात पाणी टाका. आता ते भांडे तसेच थोडावेळ ठेवा.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.