शेक्सपियर म्हणतो नावात काय आहे? तर नावात अर्थ असतो, नावात इतिहास असतो, महत्त्वाच म्हणजे नावात ओळख असते. आता ही नावं बघा, अहमदनगर, श्रीनगर, गांधीनगर, आज़मगढ़’, ‘चित्तौड़गढ़’, ‘चंदीगढ़’, सोलापुर, नागपूर, जयपूर, जोधपूर, औरंगाबाद, गाझियाबाद, हैद्राबाद आता या शहरांच्या नावात नगर, गढ, पुर, बाद हे आहे. पण का? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? त्याचं उत्तर खूप सोपं आहे. पण त्या सोप्या उत्तरात इतिहास सुद्धा आहे. त्यामुळे शहरांच्या नावापुढे हे नगर, गढ, पुर, बाद हे का असतं जाणून घेऊ. (Cities With Suffix)
नगर हे शहरांच्या नावात का जोडलं जातं, तर नगर’ हा शब्द प्राचीन संस्कृतमधून आलेला आहे, ज्याचा अर्थ आहे ‘शहर’ किंवा ‘कस्बा’. पूर्वी जे शहरं व्यापारी, प्रशासनिक आणि सांस्कृतिक केंद्र होते त्या शहरांपुढे नगर हा शब्द वापरला जात होता. नगराच्या पुढे सामान्यतः त्या शहराच्या संस्थापकाच नाव किंवा तिथल्या खास गोष्टीचे नाव दिले जात होतं. महाराष्ट्रातील (Maharashtra) अहमदनगर घ्या त्या जिल्हयाचं नाव आता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) यांच्या नावावरून अहिल्यानगर ठेवण्यात आलं आहे. पण या शहराचं पूर्वीचं नाव अहमदनगर हे कसं पडलं होतं. तर इ. स १४८६ मध्ये तत्कालीन बहमनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यामध्ये अहमदशहा बहिरी या निजाम शहाने सिना नदीच्या काठावर नवीन शहर वसवलं ज्याला त्याच्या नावावरून अहमदनगर हे नाव पडलं. पुढे हेच शहर निजामशाहीची राजधानी सुद्धा बनलं. ‘नगर‘ (Nagar) हा शब्द महत्त्वाच्या शहरांना सूचित करायचा. सुरुवातीला त्या ठिकाणी मोठे बाजार, मंदिरं आणि महत्त्वाच्या वास्तु असायच्या. थोडक्यात तेव्हा महत्त्वाच्या शहरांमध्ये नगर हा शब्द जोडलेला असायचा. आता एखाद्या शहरात एका एरियाला सुद्धा नगर म्हणतात, उदाहरणार्थ शांतीनगर, ममता नगर वगैरे वगैरे.. नगर शब्द असलेली शहरं संपूर्ण भारतात आढळतात.
आता नगर वरून येऊया गढ कडे, ‘गढ़’ शब्द किल्ल्यांच्या आसपास असलेल्या शहरांसाठी वापरला जातो, जसं जुनागढ शहराचं आधीच नाव सोरथ हे होतं. या सोरथमध्ये बिकानेरचा पहिला राजा रावबिका याने बांधलेला एक जुना दगडी किल्ला होता, ज्याच्या नावावरून शहराचं नाव पडलं जुनागढ. (Cities With Suffix)
गढ नंतर बघूया शहरांमध्ये पुर का जोडलं जात. तर ‘पुर’ हा शब्द वेदांमधून आला आहे. ऋग्वेदात पुर उल्लेख अनेक वेळा आला आहे. ज्याचा अर्थ शहर किंवा किल्ला असा होतो. हा संस्कृतमधील शहरासाठी सर्वात जुना शब्द आहे. महाभारतात (Mahabharata) सुद्धा शहराचं नाव हस्तिनापुर होतं. नगर प्रमाणेच मध्ययुगीन भारतात जेव्हा राजे महाराजे आपलं शहर वसवत असत, तेव्हा त्यांचं स्वत:चं नाव ‘पुर’ शब्दाच्या वापरासह ठेवलं जात होतं. उदाहरणार्थ, राजस्थानमधील ‘जयपूर’ हे शहर राजा जयसिंह यांनी वसवलं, त्यामुळे त्या शहराच नाव ‘जयपूर’ ठेवलं गेलं. (Top Stories)
============
हे देखील वाचा : आकाशगंगा पहायची आहे ? तर पुण्यातली ‘ही’ जागा आहे सरस…
============
आता बघूया हे शहारांच्या नावामध्ये बाद का लावलं जातं. तर बाद हा शब्द खरतर शहरांमध्ये आबाद असा आहे. म्हणजे बघा औरंगाबाद, हैद्राबाद. तर आब म्हणजे पाणी आणि आबाद म्हणजे पाणी असलेली जागा. जिथे पाणी उपलब्ध असतं आणि त्या पाण्याच्या उपस्थितीत शेती केली जाऊ शकते. उदाहरणार्थ, मुरादाबाद हे शहर रामगंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे, त्यामुळे त्याचे नाव ‘मुरादाबाद’ ठेवले गेले. (Cities With Suffix)
तर काही इतिहासकरांच्या असंही म्हणतात की, मुघल साम्राज्याच्या काळात बादशाहांनी आपल्या नावाच्या पुढे ‘आबाद’ शब्द वापरायला सुरुवात केली, ज्यामुळे त्या ठिकाणाला एक नवीन ओळख मिळेल त्या शहरावर त्यांची छाप सुद्धा कायम राहिलं. जसं महाराष्ट्रातलं औरंगाबाद, पूर्वी या शहराच्या आधी इथे खिडकी नावाचं खेडं होतं. जिथे निजामांचे पंतप्रधान मलिक अंबरने राजधानी स्थापन करत तिथे त्याच्या सैन्याची खरं वसवली. त्याच्या मुलाने फतेह खानने या गावाचं नाव बदलून फतेनगर असं ठेवलं. पुढे औरंगजेबाने फतेनगरला आपली राजधानी बनवली आणि नाव बदलून ठेवलं औरंगाबाद. ज्याच आता पुन्हा नाव बदलून छत्रपती संभाजी राजेंच्या नावावर छत्रपती संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Nagar) ठेवण्यात आलं आहे. बघा परत नगर आलचं. ही होती शहरांच्या नावांमध्ये नगर, गढ, पुर, बाद का वापरलं जातं याची माहिती.