Home » CICO Diet म्हणजे काय तुम्हाला माहितेय का?

CICO Diet म्हणजे काय तुम्हाला माहितेय का?

by Team Gajawaja
0 comment
cico diet
Share

आपण हेल्थी आणि फिट रहावे म्हणून व्यायाम, योगा, डाएटचा आधार घेतला जातो. अशातच अलीकडल्या काळात विविध प्रकारचे डाएट प्लॅन तुम्हाला तुमच्या वजनानुसार सांगितले जातात. परंतु तुम्ही कधी CICO Diet बद्दल ऐकले आहे का? ते कशा प्रकारे काम करते? याचा फायदा नक्की खरंच पोटाची चरबी कमी करणे अथवा वजन कमी करण्याठी होतो का? वेगाने वजन कमी करण्यासाठी या डाएटमध्ये सोप्प्या पद्धतीने फूड खाल्ले जाते आणि लवकरच फरक दिसून येतो. अशातच याच डाएटबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत.

CICO डाएट म्हणजे काय?
CICO Diet म्हणजे ही एक वजन कमी करण्यासाठीची पद्धत आहे. त्यामध्ये Calories in, Calories Out ची पद्धत वापरली जाते. या डाएटच्या रुटीनमध्ये कॅलरीज इंटेकसह ते बर्न करण्यावर ही फोकस केला जातो.

कसे करते हे काम
धावपळीच्या आयुष्यात खाण्यापिण्याच्या हेल्दी सवयी फॉलो केल्या जात नाही. अशातच वजन वाढू लागते. CICO डाएट फॉलो करणाऱ्यांचा फोकस एनर्जेटिक राहण्यावर असतो. यामध्ये आराम करताना सुद्धा तुम्ही किती कॅलरीज बर्न करता याकडे अधिक लक्ष दिले जाते.

या डाएटचे फायदे
वॅट लॉस करणाऱ्यांनी प्रतिदिनी ५०० कॅलरी बर्न करावेत. असे समजा जर तुम्ही २००० कॅलरेजीचे इंटेक करता आणि दररोज २५०० कॅलरी बर्न करत असाल तर दररोज ५०० कॅलरीज बर्न होतात. लो कॅलरी डाएटमुळे नुकसान पोहचू शकते. तर CICO डाएटमध्ये तुम्हाला बॅलेन्स कॅलरी बर्न करण्याचा सल्ला दिला जातो. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनच्या रिपोर्टनुसार, अशा प्रकारच्या डाएटमुळे वेट लॉससह मधुमेहाचा धोका सुद्धा कमी केला जाऊ शकतो. जर तुमचे गुडघे दुखत असतील तर तुम्हाला CICO डाएटच्या माध्यमातून वजन कमी करण्याचा सराव करावा केला पाहिजे. काही दिवसांमध्येच तुम्हाला फरक दिसेल. याचा एक असा सुद्धा फायदा आहे की, तुम्ही शरिरात लवकचिकता जाणवू शकता.

हे देखील वाचा- खुप वेळ झोपून राहिल्याने मधुमेहासारखा गंभीर आजार होतो?

CICO डाएटमुळे होणारे नुकसान
या डाएटमध्ये आपण पाहिले की, तुम्ही जेवढ्या कॅलरीज खाता, तेवढ्याच कॅलरी बर्न करायच्या असतात. अशातच यावेळी आपण कॅलरीजवर अधिक लक्ष देतो. त्यामुळे शरिराला महत्वाच्या वाटणाऱ्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे धोका निर्माण होऊ शकतो. या व्यतिरिक्त केस गळणे, मानसिक आरोग्यासंबंधित समस्या, हृदयरोगासंबंधित आजार, सूज येणे, रोगप्रतिकार शक्ती कमी होणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे जर तुम्ही या डाएटचा विचार करत असाल तर तज्ञांचा सल्ला घ्या आणि त्यानंतरच ते फॉलो करा.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.