सध्याच्या काळात क्रेडिट स्कोर हा प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्वाचा हिस्सा झाला आहे. कारण तुमचा हा आर्थिक प्रोफाइलचा एक मुख्य भाग मानला जातो आणि क्रेडिट संदर्भातील माहिती सुद्धा सांगितली जाते. जेव्हा तुम्ही क्रेडिटवर तुमचे आयुष्य जगण्यास सुरुवात करता तेव्हा तुमचा सिबिल स्कोर तयार होतो. हा स्कोर तुमच्या क्रेडिट रिपोर्ट आणि क्रेडिटसह गेल्या अनुभवांवर अवलंबून असतो. अशातच तुम्हाला एखादे नवे कर्ज घ्यायचे झाल्यास प्रथम तुमचा सिबिल स्कोर(cibil score) किती आहे तो तपासून पाहिला जातो.
तुम्ही पॅन कार्डच्या मदतीने तुमचा क्रेडिट स्कोर अगदी सहज तपासून पाहू शकता. पॅन कार्डच्या मदतीने सिबिल स्कोर तपासून पाहणे हे अत्यंत सोप्पे आहे कारण ते तुमच्या आर्थिक प्रोफाइलला सुद्धा लिंक असते. क्रेडिट स्कोरची रेंज ३००-९०० दरम्यान असते. त्यामध्ये ७५०-९०० रेंज ही सर्वाधिक उत्तम मानली जाते. परंतु जेव्हा तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन सिबिल स्कोर तपासता तेव्हा तुम्हाला तेथे काही थर्ड पार्टी सर्विस प्रोवाइडर्स फ्री सिबिल स्कोर एकदा तपासून पाहण्याची संधी देतात. एकापेक्षा अधिक वेळा क्रेडिट स्कोर तपासून पाहण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतात. फक्त तुम्ही तुमच्या पॅन कार्डच्या मदतने तुमचा सिबिल स्कोर पुढील पद्धतीने तपासून पाहू शकता.
सिबिल स्कोर(cibil score) तपासण्याची पद्धत
-अधिकृत सिबिल वेबसाइटवर जाऊन तेथे सेल्फ सर्विस सेक्शन शोधा. आता नि:शुल्क वार्षिक सिबिल स्कोर आणि रिपोर्ट मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
-आवश्यक माहिती देत नॉमिनेशन फॉर्म भरा
-इनकम टॅक्स आयटी नंबरच्या रुात आईडी टाइप निवडा आणि खाली आपल्या पॅन कार्डची माहिती द्या
-आता आपले अकाउंट तयार करा आणि फ्री सिबिल स्कोर जाणून गेण्यासाठी डॅशबोर्डपर्यंत जा
हे देखील वाचा- ED कडून ४ वर्षात ६७,००० कोटींची जप्ती, पण छापेमारी केलेला पैसा, सोन्या-चांदीचे काय होते?
जसे आपण आधीच पाहिले की, एका वर्षात फक्त एकदाच फुकटात सिबिल स्कोर तपासून पाहता येते. तुमच्या क्रेडिट प्रोफाइलचे आकलन करण्यासाठी तुम्ही तुमचा सिबिल स्कोरचा रिपोर्ट सुद्धा डाऊनलोड करु शकता. जर तुमच्या क्रेडिट स्कोरमध्ये वेळेनुसार बदल झाल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही. त्याचसोबत क्रेडिट स्कोर तपासल्याने तुम्हाला तुमच्या क्रेडिट हेल्थ बद्दल ही अधिक स्पष्टता येते. जेणेकरुन तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोर अधिक उत्तम कसा होईल त्या दृष्टीने काही गोष्टी करु शकता.