इंग्लंडमध्ये अशी एक शाळा आहे जी १५५२ रोजी सुरु केली गेली. येथे जवळजवळ १० वर्षांनी अगदी व्यवस्थितीत पद्धतीने मुलांनी शाळेत अॅडमिशन घेतले. ही शाळा आज ही जुन्या पद्धतीने आणि परंपरेने चालवली जाते. परंतु येथील शिक्षण हे आधुनिक काळातील मुलांना दिले जाते. येथील मुलं सुद्धा फार वेगळी असतात. ब्रिटेनमध्ये असलेल्या या शाळेची खास गोष्ट अशी की, येथे ४७० वर्षांपासून विद्यार्थ्यांचा युनिफॉर्म बदललेला नाही. क्राइस्ट हॉस्पिटल(Christ’s Hospital) बोर्डिंग स्कूल असे त्याचे नाव आहे. येथे ११ ते १८ वयोगटातील मुलं शिकतात. ही स्कूल इंग्लंडमधील वेस्ट ससेक्स मध्ये होरशामच्या दक्षिणेला आहे. खरंतर ती १५५२ रोजीच सुरु केली. पण योग्य पद्धतीने शिक्षण त्याच्या पुढील वर्षापासूनच सुरु झाले होते.
या स्कूलचा संपूर्ण खर्च हा क्राइस्ट हॉस्पिटलकडून केला जातो. या शाळेतील विद्यार्थ्यांची पहिली बॅच ३०० च्या रुपात १५५३ मध्ये रजिस्टर्ड झाली होती. सुरुवातीपासूनच शाळेत मुलं-मुली एकत्रित शिकतात. येथून शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना थेट ऑक्सफोर्ड आणि केब्रिजमध्ये शिक्षणासाठी संधी मिळते. खरंतर या शाळेच्या इमारतीला ४७० वर्षात फार नुकसान ही सहन करावे लागले आहे.
मुख्यत: या शाळेत गणित आणि नेव्हिगेशनसाठी ट्रेंन्ड केले जाते. परंतु आता येथे विविध शिक्षण दिले जाते. ज्यामध्ये आर्ट्स ते म्युझिकसह स्पोर्ट्सचा सुद्धा समावेश आहे. आधी शाळेचे मुख्य उद्दिष्ट हे उत्तम नौसैनिक अधिकारी तयार करण्याचे होते. मात्र आता एक उत्तम विद्यार्थी घडवणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. याला शासकीय आणि राजघराण्यातून ही मोठी आर्थिक मदत दिली जाते. हे स्कूल १२०० एकर जमीनीवर उभारण्यात आलेले आहे.

या शाळेच्या अशा काही परंपरा आहेत ज्या शेकडो वर्षांपासून पाळल्या जात आहे. येथे लंचपूर्वी एक बँन्डसह परेड होते जी मंगळवार, गुरुवार आणि रविवार असे दिवस सोडून अन्य दिवशी असते. जर वातावरण ठीक असेल तरच. शाळेचा युनिफॉर्म हा निळ्या रंगाचा कोट, पिवळे मोजे आणि सफेद नेक बँन्ड असा आहे. हा युनिफॉर्म येथे १५५३ पासून लागू करण्यात आला आणि आजही तो तसाच घातला जातो. परंतु उन्हाळ्याच्या दिवसात तो बदलेला असतो. (Christ’s Hospital)
हेही वाचा- गे, लेस्बियन, बायसेक्सुअल, ट्रान्सजेंडर यांच्यात फरक काय असतो ?
खरंतर क्राइट्स हॉस्पिटल स्कूलचा युनिफॉर्म जगभरात प्रसिद्ध आहे. तो ऐतिसाहिक स्कूलचा सर्वाधिक आकर्षक पैलू आहे. यामध्ये निळ्या रंगाच्या कोटला काळ्या रंगाच्या बेल्टने बांधला जातो. शाळेचा युनिफॉर्म हा निळ्या आणि पिवळ्या रंगातच का निवडला गेला यावरुन चर्चा ही झाली. सुरुवातीला असा विचार केला गेला की,दोन्ही रंग महागडे नाहीत. परंतु जेव्हा ही मुलं हॉस्पिटलमध्ये सेवा करण्यासाठी जातील तेव्हा त्यांना पटकन ओळखता येईल. कोटवर पिवळ्या रंगाची लाइनिंग असायची. त्यांचे स्टॉकिंग्स सुद्धा नेहमीच गुघड्याच्या लांबीऐवढे असायचे. निळ्या रंगाच्या कोटच्या बटणांवर शाळेचे संस्थापक किंग एडवर्ड VI यांचे एम्बॉसिंग आहे.