डिसेंबर महिना सुरु झाला की सगळ्यांनाच वेध लागतात ते ख्रिसमसचे. जगभरात ख्रिसमसचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मुख्यत्वे परदेशात ख्रिसमसचा उत्साह कमालीचा पाहायला मिळतो. पण आता भारतातही ख्रिसमसची क्रेझ हळूहळू वाढताना दिसत आहे. ख्रिश्चन समाजासोबतच इतरही लोकं मोठ्या जल्लोषाने ख्रिसमसच्या उत्सवात सहभागी होताना दिसत आहेत. ख्रिसमसच्या निमित्ताने ख्रिश्चन घरांमध्ये विविध प्रकारचे केक बनवले जातात. ख्रिसमस जवळ येऊ लागला की, बाजारात देखील हे केक मोठ्या प्रमाणावर मिळतात, मात्र घरी ख्रिसमस केक बनवण्याची मजाच न्यारी आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ख्रिसमस साठी काही खास केकच्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपी सांगणार आहोत. (Christmas)
साहित्य
दोन वाट्या कणिक, दीड वाटी गूळ, पाऊण वाटी बटर, पाऊण वाटी दही, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, दीड टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा चमचा दालचिनी पावडर, अर्धा चमचा सुंठ पावडर, अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स, बदाम, अक्रोड, काजू, खजूर, मनुका, टूटी-फ्रुटी आवश्यकतेनुसार आणि ऑरेंज ज्यूस
कृती
सर्वात आधी बदाम, अक्रोड, काजू, खजूर, मनुका रात्रभर फ्रुट ज्यूसमध्ये भिजवून ठेवा. एका बाऊलमध्ये दही, बटर, बारीक करून घेतलेला गूळ एकत्र करून घ्या. त्यामध्ये व्हॅनिला इसेन्स घालून एकजीव करुन घ्या. नंतर दुसऱ्या भांड्यात गव्हाचं पीठ, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, दालचिनी पावडर, सुंठ पावडर एकत्र करून घ्या. हे मिश्रण गुळाच्या मिश्रणात थोडं-थोडं घाला. आता भिजवलेले ड्राय फ्रुट तयार बॅटरमध्ये मिक्स करा. एका भांड्याला बटर लावून घ्या. केकच्या भांड्यामध्ये तयार बॅटर ओता. त्यावर टूटी-फ्रुटी आणि ड्रायफ्रुट टाका. त्यानंतर हे भांडं गरम केलेल्या प्रेशर कुकरच्या मधोमध स्टँडवर ठेवा. त्यानंतर कुकरची शिट्टी आणि रिंग काढून टाका. हा केक ४० मिनिटांपर्यंत मंद आचेवर शिजवून घ्या. गॅस बंद केल्यानंतर टूथपिकच्या मदतीनं केक पूर्णपणे शिजला आहे की नाही हे तपासा. केक तयार झाल्यानंतर थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर केक चाकूच्या मदतीने कापा. (Top Marathi News)

रवा केक
साहित्य
बारीक रवा – १ वाटी, साखर – १ वाटी, दही – १ वाटी, तूप – दीड वाटी, वेलची पूड – चिमूटभर, बेकिंग पावडर – १ चमचा, बेकिंग सोडा – १ चमचा, दूध – ३ ते ४ चमचे, सुका मेवा, चिमूटभर मीठ
कृती
बारीक रवा, साखर आणि दही एकत्र करून फेटून घ्यावा. मिश्रणात तूप, वेलची पूड, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर घालून मिक्स करा. तयार मिश्रण १० मिनिटे बाजूला ठेवा, जेणेकरून रवा फुगेल. १० मिनिटांनंतर मिश्रणात दूध घालून पुन्हा एकत्र करून घ्या. यानंतर मिश्रणात सुकामेवा बारीक करून घालावा. आता केक तयार करण्यासाठी कढईत मूठभर मीठ घालून त्यावर स्टँड ठेवा. कढई १० मिनिटे मध्यम आचेवर गरम करायला ठेवा. आता केक टिनला तेल लावा आणि तयार मिश्रण त्यात ओता. आता गरम कढईत टिन ठेवा आणि झाकण ठेवून ४० मिनिटे शिजू द्या. केकच्या मध्ये टूथपिकने टोचून केक शिजला आहे का नाही चेक करत राहा. जर टुथपिक स्वच्छ निघाली की केक तयार झाली आहे हे समजा. (Top Trending Headline)
=======
Princess Sofia : स्वीडनची राजकुमारी सोफिया एपस्टाईन फाईलमध्ये !
=======
प्लम केक
साहित्य
१ कप मैदा, १ कप साखर, १/२ कप बटर, २ अंडी, १ टीस्पून बेकिंग पावडर, १/२ टीस्पून बेकिंग सोडा, १/४ टीस्पून मीठ, १ टीस्पून व्हॅनिला इसेन्स, १ कप प्लम्स लहान तुकडे करून
कृती
सर्व प्रथम, ओव्हन १८० डिग्री सेल्सिअसवर गरम करा. दरम्यान, एका मोठ्या भांड्यात मैदा, साखर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि मीठ चांगले मिसळा. एका भांड्यात बटर घ्या आणि मायक्रोवेव्हमध्ये वितळवा. आता पिठाच्या मिश्रणात गरम बटर घाला. यासोबत अंडी आणि व्हॅनिला अर्क देखील घाला. यानंतर, सर्वकाही चांगले मिसळा. आता या मिश्रणात चिरलेला प्लम घाला आणि चांगले मिसळा. एका पातेल्यात बटर लावल्यानंतर त्यात हे केक पिठात टाका. हे केक पॅन ४५-५० मिनिटे बेक करावे. केक नीट शिजत आहे की नाही हे मध्येच चाकूच्या मदतीने तपासत रहा. शिजल्याबरोबर ते मायक्रोवेव्हमधून बाहेर काढा आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. तुम्हाला हवे असल्यास केक बनवताना त्यात ड्रायफ्रुट्स टाकू शकता. तुमचा प्लम केक तयार आहे. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
