Christmas 2023 : हमास आणि इज्राइलमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान युक्रेन पुन्हा चर्चेत आला आहे. यामागील कारण म्हणजे ख्रिसमसचा सण. सर्वसामान्यपणे जगभरात ख्रिसमस 25 डिसेंबरला साजरा केला जातो. तर युक्रेनमध्ये ख्रिसमस 7 जानेवारीला साजरा करण्यात येतो. यंदा ख्रिमस साजरा करण्याची तारीख युक्रेनने बदलली आहे.
युक्रेन आज म्हणजेच 25 डिसेंबरला ख्रिसमस साजरा करत आहे. या सणाच्या माध्यमातून युक्रेन रशियाला सडेतोड उत्तर देत आहे. युक्रेन रशियाला हे दाखवू पाहात आहे की, त्यांच्या परंपरा कोणीही मानत नाही.
दरम्यान, 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियाने युक्रेनच्या विरोधात विशेष सैन्य अभियानाची घोषणा केली होती. त्यानंतर युक्रेन (Ukraine) सरकारकडून रशियन परंपरेचा त्याग करण्यासाठी वेगवेगळी पावले उचलत आहे. याच संदर्भात जुलैमध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की (Volodymyr Zelenskyy) यांनी एका कायद्यावर स्वाक्षरी केली. यामुळे युक्रेनमध्ये ख्रिसमसनिमित्त राजकीय सुट्टीची तारीख बदलली गेली आहे.
ख्रिसमसच्या तारखेत बदल
एकेकाळी सोवियत संघाचा हिस्सा राहिलेल्या युक्रेनचे रशियाच्या संस्कृतीशी सखोल आपुलकी आहे. आतापर्यंत युक्रेनमध्ये 7 जानेवारीला ख्रिसमसचा सण साजरा केला जायचा. खरंतर ज्युलियन कॅलेंडरच्या आधारावर हा सण साजरा केला जात होता. याच कॅलेण्डरचा वापर रशियन ऑर्थोडॉक्स चर्चही करतो.
पण वर्ष 2022 च्या सैन्य अभियानानंतर युक्रेन सरकारकडून काही पावले उचलली जात आहेत. याअंतर्गत त्यांना रशियाचा युक्रेनवरील प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच आता युक्रेन पश्चिमेकडील देशांप्रमाणे 25 जानेवारीला ख्रिसमसचा सण साजरा करणार आहे. याआधी वर्ष 1917 मध्ये 25 डिसेंबरला युक्रेनने ख्रिसमसचा सण साजरा केला होता.
यंदाच्या वर्षात जुलै महिन्यात युक्रेनने आपल्या कॅलेंडरमध्ये बदल केला होता. 27 जुलैला युक्रेनने ऑर्थोडॉक्स चर्चमध्ये संशोधित ज्युलियन कॅलेंडर मानले. या कॅलेंडरची खास गोष्ट अशी की, हे कॅलेंडर सध्या पश्चिमेकडील ग्रेगोरियन कॅलेंडरप्रमाणे आहे. (Christmas 2023)
कॅलेंडरमध्ये करण्यात आलेल्या ख्रिसमस सेलिब्रेशनच्या बदलामुळे आता युक्रेनमधील अन्य राष्ट्रीय दिवसांवरही प्रभाव पडला आहे. युक्रेनमध्ये स्टेटहुड डे (Statehood Day) ची तारीख 28 जुलै होती ती 15 जुलै झाली आहे. तर डिफेंडर्स डे (Ukraine Defender Day) ची तारीख 1 ऑक्टोंबर झाली आहे.