Home » Chocolate : जागतिक चॉकलेट डे: चॉकलेट खाण्याचे फायदे

Chocolate : जागतिक चॉकलेट डे: चॉकलेट खाण्याचे फायदे

by Jyotsna Kulkarni
0 comment
Chocolate
Share

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चॉकलेट आवडत असते. चॉकलेट म्हणजे सगळ्यांचच वीक पॉइंट आहे. चॉकलेट आवडत नाही अशी व्यक्ती जगात शोधूनही सापडणार नाही. खासकरून लहान मुलांमध्ये चॉकलेट प्रेम सर्वात जास्त दिसून येते. अशा या चॉकलेटबद्दल आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी संपूर्ण जगभरामध्ये १३ सप्टेंबर हा दिवस चॉकलेट दिन म्हणून साजरा करण्यात येतो. साधारण २५०० वर्षांपूर्वी चॉकलेटचा शोध लागला असावा असे सांगितले जाते. (Marathi)

चॉकलेटचा शोध हा अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये लागला. या ठिकाणी आधी कोकोची झाडं लावण्यात आली. त्यापासून एक कडवट पेय तयार केले गेले. पण हळूहळू त्यावर विविध प्रयोग करून १६व्या शतकात युरोपियन लोकांनी त्यात दूध आणि साखर घालून त्याला गोड स्वरूप दिले. हळूहळू तो पदार्थ “चॉकलेट” या नावाने जगभर लोकप्रिय झाला. मात्र चॉकलेट खायला लोकांना जेवढे आवडते, तेवढेच त्याच्या दुष्परिणाम देखील भरपूर आहेत. जास्त चॉकलेट खाल्ल्यास दात किडण्याची शक्यता सर्वाधिक असते. (Health News)

चॉकलेटच्या अतिजास्त सेवनामुळे वजन वाढू शकते, हृदयरोगाचा त्रास होऊ शकतो आणि डायबिटीज देखील वाढू शकतो. चॉकलेटच्या जास्त खाण्यामुळे होणारे दुष्परिणाम सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र हे चॉकलेट आरोग्याच्या दृष्टीने अनेकदा लाभदायक देखील ठरते. अर्थात चॉकलेट खाण्याचे काही फायदे देखील आहेत. जर चॉकलेट मर्यादित प्रमाणात खाल्ले तर ते खाण्याचे अनेक फायदे आहेत. मग चॉकलेट खाल्ल्यामुळे कोणकोणते फायदे होतात चला पाहूया. (Todays Marathi Headline)

Chocolate

> डार्क चॉकलेटमध्ये साखर, कोको बटर, कोको सॉलिड, आणि दूध यांचे प्रमाण कमी असते. डार्क चॉकलेट चवीला कडू असले तरी ते शरीरासाठी अँटी ऑक्सिडंटचे मोठे काम करते. १०० ग्रॅम डार्क चॉकलेटमध्ये ७० ते ८० टक्के कोको असते. (Chocolate Day)

> चॉकलेटमुळे त्वचा चमकदार होते. तसे, केवळ चॉकलेट खाणेच नाही, तर चॉकलेट मास्क लावणेदेखील त्वचेसाठी फायदेशीर आहे.

> मूड सुधारण्यासाठी चॉकलेट ही एक उत्तम गोष्ट आहे. ज्यांचा मूड खराब आहे त्यांनी थोडेसे चॉकलेट खाल्ल्याने त्यांचा मूड स्थिर होऊ शकतो आणि तणावातूनही आराम मिळू शकतो. (Marathi News)

> उच्च रक्तदाबाचा त्रास कमी करण्यासाठी चॉकलेटचे सेवन परिणामकारक ठरते. कोकोमध्ये असलेले अँटिऑक्सिडंटस स्वास्थ्य चांगले राखण्यासाठी मदतशीर ठरतात. (Top Marathi Headline)

> मिल्क चॉकलेटच्या तुलनेत डार्क चॉकलेटमध्ये कमी साखर असते, पण ती पूर्णपणे साखरमुक्त नसते. त्यामुळे खरेदी करताना लेबल नक्की तपासा मधुमेहाची समस्या असल्यास साखरेच प्रमाण किती आहे हे जाणून घ्या. (Latest Marathi News)

=========

Skin Care : संवेदनशील त्वचेला हेल्दी बनवायचे असल्यास कोणत्या सवयी सोडाव्यात?

=========

> डार्क चॉकलेट कडवड असल्यामुळे अनेकांना मिल्क चॉकलेट आवडते. मिल्क चॉकलेट हे डेरी फॅट आणि दूध या पदार्थापासून बनवल्यामुळे ते क्रीमी आणि लाइट असते. मिल्क चॉकलेट खाल्याने मेंदू स्वस्थ राहतो. डार्क चॉकलेटप्रमाणेच मिल्क चॉकलेटसुद्धा हेल्दी आहे. (Top Trending News)

> डार्क चॉकलेट फ्लेव्होनॉइड्सने समृद्ध असल्याने, डार्क चॉकलेट मधुमेह असलेल्या लोकांसाठी देखील फायदेशीर आहे. याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. तथापि, मधुमेहींनी प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि चरबी आणि साखर नसलेले डार्क चॉकलेटच निवडावे. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.