Chirag Paswan : चिराग पासवान हे आज भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे नाव बनले आहे. पण त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात मात्र अभिनय क्षेत्रातून झाली होती. दिवंगत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे पुत्र असलेल्या चिरागने वडिलांच्या प्रभावामुळे लहानपणापासूनच समाजसेवा आणि राजकारण यांची जाण ठेवली. मात्र, त्याने सुरुवातीला बॉलिवूडमध्ये नशीब आजमावले. २०११ साली “मिले ना मिले हम” या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. चित्रपटात अभिनेत्री कंगना रनौतसोबत त्याने काम केले, परंतु हा चित्रपट फारसा चालला नाही आणि चिरागचा अभिनेता म्हणून प्रवास लवकरच संपला.
चित्रपट क्षेत्रात अपयश आल्यावर चिरागने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात प्रवेश केला. वडिलांच्या लोक जनशक्ती पक्षाच्या (LJP) माध्यमातून त्याने आपली राजकीय वाटचाल सुरू केली. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली तो लवकरच पक्षात सक्रिय झाला आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत बिहारच्या जमुई मतदारसंघातून त्याने विजय मिळवला. या निवडणुकीने त्याला एक राजकीय ओळख मिळवून दिली आणि तो लोकसभेतील एक युवा खासदार म्हणून उदयास आला.

Chirag Paswan
चिरागने आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक वेळा आपली स्वतंत्र भूमिका घेतली आहे. वडिलांच्या निधनानंतर एलजेपी पक्षात अंतर्गत संघर्ष निर्माण झाला, पण चिरागने पक्षाची धुरा एकहाती घेतली. त्याने “बिहारी फर्स्ट, बिहारी युवा” ही संकल्पना मांडून नव्या पिढीतील मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. भाजपशी संबंध टिकवून ठेवत, त्याने नीतीश कुमार यांच्या नेतृत्वावर अनेकदा सडकून टीका केली. या भूमिकेमुळे तो चर्चेत राहिला.(Chirag Paswan)
==========
हे देखील वाचा :
Jai Singh : मुघलांचे मन जिंकणारा जयसिंह, पण औरंगजेबाचा रोष ओढवून घेणारा राजा
==========
आज चिराग पासवान केवळ रामविलास पासवान यांचा मुलगा म्हणून नव्हे, तर एक स्वतंत्र आणि युवा राजकीय नेता म्हणून ओळखला जातो. अभिनय क्षेत्रातून राजकारणात आलेल्या चिरागने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचा स्वच्छ प्रतिमा, स्पष्ट भूमिका आणि युवा नेतृत्व यामुळे तो बिहारच्या तसेच राष्ट्रीय राजकारणातही आपलं अस्तित्व दाखवत आहे. त्याचा प्रवास हा एक प्रेरणादायक उदाहरण आहे की अपयश कोणत्याही क्षेत्रात येऊ शकतं, पण जिद्द आणि दूरदृष्टीने नव्या वाटा शोधता येतात.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics