Home » हिंदूसाठी लढणा-या चिन्मय दास यांना अटक !

हिंदूसाठी लढणा-या चिन्मय दास यांना अटक !

by Team Gajawaja
0 comment
Bangaldesh
Share

बांगलादेशमध्ये गेल्या साठ दिवसापासून चालू असणा-या हिंदू विरोधी हिंसक घटनांचा जोरदार विरोध करणारे इस्कॉनचे चिन्मय दास यांना अटक करण्यात आली आहे. स्वामी चिन्मय दास यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे स्वामी चिन्मय दास यांना फाशीचीही शिक्षा होऊ शकते. चिन्मय दास यांच्या अटकेमुळे बांगलादेशमधील हिंदू विरोधी वातावरण अधिक गडद झाल्याचे स्पष्ट झाले आहे. चिन्मय कृष्ण प्रभू यांना बांगलादेशातील विमानतळावरून अटक करण्यात आली. शेख हसीनाचे सरकार पडल्यानंतर हिंदूंच्या बाजूने जे आंदोलन उभे राहिले, त्यामागे चिन्मय दास यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी बांगलादेशमधील हिंदूंच्यावर झालेल्या हल्ल्याला जगासमोर आणले, तसेच हिंदू हे बांगलादेशमधील मुळ निवासी आहेत, त्यांच्यावर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही, असेही सांगितले होते. (Bangaldesh)

मात्र आता त्याच चिन्मय दास यांना अटक झाल्यामुळे बांगलादेशमधील हिंदू विरोधी धोरण पुन्हा एकदा समोर आले आहे. अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प सरकारमधील राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालक तुलसी गबार्ड यांनीही बांगलादेशमधील हिंदूंवर होणा-या अत्याचाराबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तुलसी गबार्ड या इस्कॉन मंदिराबरोबर जोडल्या असून त्यांनी बांगलादेशमध्ये इस्कॉन मंदिराला हानी पोहचवल्याबद्दलही जाहीर नाराजी व्यक्त केली होती. आता तेथील प्रमुख चिन्मय दास यांना अटक केल्यावर तुलसी गबार्ड यांची प्रतिक्रीया काय राहिल याकडे लक्ष लागले आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणारे अत्याचार थांबत नाहीत. गेल्या काही दिवसापूर्वी, रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी जात असलेल्या हिंदू बांधवांच्या गाडीवरच हल्ला करुन अनेकांना जखमी करण्यात आले होते. आता हिंदूंच्या बाजूने रॅली काढणाऱ्या इस्कॉनच्या चिन्मय दास यांना विमानतळावरुन अटक केल्याची बातमी आल्यानं खळबळ उडाली आहे. ढाका विमानतळावरून देशद्रोहाच्या प्रकरणात त्यांना अटक झाली आली आहे. (International News)

बांगलादेश सनातन जागरण मंचचे नेते असलेले चिन्मय दास हे हिंदूंना एक करण्यासाठी मोठे प्रयत्न करीत होते. 5 ऑगस्ट रोजी शेख हसिना यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडल्यानंतर हिंदूंवरील हल्ल्यांच्या विरोधात त्यांनी मोठी फळी तयार करुन हिंदूंना मोठ्यासंख्येनं बाहेर काढून आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा प्रतिकार करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळेच चिन्मय कृष्ण दास आणि त्यांच्या अन्य सहकार्यांवरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे बांगलादेश आणि भारतातही तीव्र नाराजी पसरली आहे. चिन्मय दास यांनी आपल्या अनुयायांसह 25 ऑक्टोबर रोजी चितगावमधील न्यू मार्केट चौकात बांगलादेशच्या राष्ट्रध्वजावर भगवा ध्वज फडकावला होता. त्यानंतर 30 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. चिन्मय दास यांच्या काही सहकार्यांना यावेळी अटकही करण्यात आली. या अटकेचा निषेध करत चिन्मय दास यांनी “आम्ही हिंदू आहोत, आम्ही ऋषींचे वारस आहोत, आम्ही आर्यपुत्र आहोत. मरेपर्यंत लढणार आहोत. हिंदूंनो, संघटित व्हा. असे जाहीर आवाहन केले होते. त्यामुळे चिन्मय दास यांच्यावर बांगलादेश सरकरानं देशाचे सार्वभौमत्व कमकुवत करण्याचा आणि अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप लावला आहे. (Bangaldesh)

=====

हे देखील वाचा : ब्रिटनमध्ये स्थलांतरितांविरोधात अघोषित युद्ध

========

इस्कॉन कोलकाता उपाध्यक्ष राधारमण दास यांनी यासंदर्भात माहिती दिली असून चिन्मय दास यांच्या जिवाला बांगलादेशमध्ये धोका असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. बांगलादेशमध्ये हंगामी सरकारच्या आश्रयाखाली हिंदूंवर अत्याचार होत आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी 10 वर्षाच्या हिंदू मुलीचे अपहरण करत तिचे जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करण्यात आले आहे. याशिवाय कट्टरपंथी इस्लामिक गट हिफाजत-ए- इस्कॉनचे भाविक दिसतील तिथे त्यांना पकडून मारून टाका असे जाहीर आवाहनच या कट्टरवाद्यांनी केले आहे.
दरम्यान, बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेसाठी इस्कॉनने पंतप्रधान मोदींना साकडे घातले आहे. बांगलादेशमध्ये इस्लामिक गट खुलेआम इस्कॉनच्या भाविकांना पकडून, त्यांच्यावर अत्याचार करून त्यांना ठार मारण्याची धमकी देत ​​आहेत. आता इस्कॉनचे सचिव चिन्मय दास यांनाही देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. इस्कॉनचे अन्य सदस्यही बांगलादेश सरकारच्या आदेशानं तुरुंगात आहेत. त्यांचा छळ होत असल्याची माहितीही पुढे आली आहे. या सर्वांवर इस्कॉनच्या सदस्य असलेल्या अमेरिकेच्या तुलसी गबार्ड यांची भूमिका काय राहिल याकडेही लक्ष लागले आहे. (International News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.