भारतात बहुतांशवेळा असे ऐकायला मिळते की, एका लहानश्या शासकीय नोकरीसाठी डिग्री धारक ही अर्ज करतात. देशात शिक्षित बेरोजगारांची संख्या वेगाने वाढत चालली आहे. परंतु गरजेनुसार नोकऱ्यांची संधीच नाही. चीनमध्ये सुद्धा अशीच काहीशी स्थिती निर्माण झाली आहे. येथे बेरोजगारांची संख्या वेगाने वाढत चालली आहे. परंतु त्याचसोबत एक नवा ट्रेंन्ड ही पहायला मिळत आहे. तेथे मोठ्या संख्येने तरुण हे अधिक पगाराची नोकरी सोडून वेटर किंवा अन्य स्वयंरोगजाराचा मार्ग निवडत आहेत. (Chinese youth unemployed)
चीनमध्ये काही तरुण, ज्यामध्ये महिलांचा सुद्धा समावेश आहे, त्यांनी आपली अधिक पगाराची नोकरी सोडली आहे. अशातच त्यांनी शारिरीक श्रमाचे काम पडेल असे रोजगार शोधत आहेत. येथे त्यांना पगार ही फार कमी मिळतोय. यामध्ये वेटर, कॅशियर, बरिस्ता सारख्या कामांचा समावेश आहे. चीनच्या लियाओनिंगच्या एका २५ वर्षीय महिलेने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिले आहे की, तिला यापूर्वी किती पगार होता आणि ती काय करत होती.

या महिलेने असे लिहिले आहे की, तिची नोकरीसह अखेरचा ईमेल, इंटरव्यू, पीपीटीपासून सुटका झाली आहे. ती तिने एका बरिस्ताची सुरुवात केली आहे. त्यामधून तिला मिळणारे पैसे हे आधीच्या नोकरीच्या एक अंशाप्रमाणे आहे. अशा प्रकारचे पॅटर्न संपूर्ण देशात पहायला मिळत आहे. कारण देशात बेरोजगारीचा दर एक नवा रेकॉर्ड करत आहे.
याच कारणास्तव एक संपूर्ण पिढीच्या पीढी अधिक सुशिक्षित असून ही बेरोजगार झाली आहे. अशाच प्रकारे टिकटॉकची पेरेंट कंपनी बाइटांन्स मध्ये काम करणाऱ्या आणखी एका चीनी महिनेने एक ईटर सुरु केले आहे. ती संपू्र्ण दिवस जेवणच तयार करते. तिने सोशल मीडियात लिहिले की, तिला कंपनी सोडल्यानंतर खुप आनंद झाला. जरी शरिर आता थकत असले तरीही आताच्या कामातून आनंद मिळतोय.
गेल्या काही वर्षांमध्ये चीन मध्ये हा ट्रेंन्ड सोशल मीडियामधील इंस्टाग्रामवर जिआओहोंगशूचे व्हिडिओ आणि फोटोत असे दिसून येते की, लोक आपल्या नव्या कामाबद्दल अधिक बोलत आहेत. बिझनेस इंसाइडरच्या रिपोर्टनुसार १२ जून पर्यंत येथे हॅशटॅग ‘माय फर्स्ट फिजिकल वर्क एक्सपिरियंस’च्या माध्यमातून ३ कोटींहून अधिक लोकांनी ते पाहिले आहे. (Chinese youth unemployed)
हेही वाचा- अमेरिका रासायनिक शस्त्रे नष्ट करणार…
चीन मधील लोक असे करण्यामागील असे की, फास्ट फूड, रेस्टॉरंट मालक, स्वच्छता कर्मचारी, वेटरर्स ते पेट ग्रुमिंग करणारे आपल्या आयुष्यात आणि डोकं न लावता केल्या जाणाऱ्या कामांत सेल्फ सॅटिसफॅक्शन शोधत आहेत. ज्या लोकांनी अधिक पगाराच्या नोकऱ्या सोडल्या आहेत ते असेच म्हणतायत की, त्यांना आता परफॉर्मेंन्स रिपोर्टचे टेंन्शन नाही. त्यांना केवळ आपण आता जे काही करतोय त्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. यावरुन कळते की, चीन मध्ये नोकरी करणाऱ्या व्यक्तीवर किती दबाव टाकला जातो. तसेच ती नोकरी सोडण्यासाठी एखादा तरुण कोणत्या थराला जाऊ शकतो हे सुद्धा यावरुन स्पष्ट होते.