भारतानं केलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचे दहशतवादी अड्डे आणि हवाई तळ उद्ध्वस्त झाले आहेत. पण यासोबतच चीन, तुर्की आणि अमेरिकेसारख्या देशांना मोठा धक्का बसला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्ताननं भारतावर अनेक ड्रोनद्वारे हल्ला केला. यातील बहुतांशी ड्रोन हे चिनी बनावटीचे होते. (China)
शिवाय तुर्कीनंही पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात शस्त्रपुरवठा केला होता. मात्र भारतानं या सर्वांला चोख प्रत्युत्तर दिलेच पण चिनी बनावटीची शस्त्रे किती कुचकामी आहेत, हे जगाला दाखवून दिले. सोबतच मेक इन इंडिया मोहीमेद्वारे भारतात तयार होत असलेली शस्त्रास्त्रे किती आधुनिक आणि सक्षम आहेत, याचीही झलक सर्व जगाला दाखवली. या सर्वांचा मोठा फटका बसला आहे तो चीनला. कारण ऑपरेशन सिंदूरमुळे चिनी शस्त्रांस्त्रांचा भाव जमिनीला टेकला आहे. चीन आपल्याकडील शस्त्रे विकत घेण्यासाठी पाकिस्तानसह अनेक देशांमध्ये करार करत आहे. त्यात श्रीलंका, नेपाळ आणि दक्षिण अफ्रिकेमधील काही देशांचा समावेश आहे. मात्र आता या चिनी शस्त्रांस्त्रांमधील फोलपणा समोर आल्यावर या देशांमधील अब्जोरुपयांचे हे शस्त्रास्त्र खरेदी करार धोक्यात आले आहेत. (International News)
ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानमध्ये दहशत निर्माण केली आहे. सोबतच पाकिस्तानचा मित्र देश असलेल्या चीनचा शस्त्रास्त्र विक्रीचा बाजारही उठवला आहे. चीननं पाकिस्तानला दिलेली क्षेपणास्त्रेही भारतीय स्वदेशी शस्त्रांसमोर फोल ठरली. त्यामुळेच चीनची शस्त्रास्त्र बाजारपेठ उद्ध्वस्त झाल्याचे जाणकारांचे मत आहे. चीन आणि तुर्कीकडून मिळालेल्या शस्त्रांचा वापर करून पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. पण ही शस्त्रे भारतीय संरक्षण सीमा पार करु शकली नाहीत. कामिकाझे ड्रोन हे पाकिस्तान आणि तुर्कीने संयुक्तपणे विकसित केलेले ड्रोनही अपयशी असल्याचे यात स्पष्ट झाले आहे. चीन आत्तापर्यंत आपली शस्त्रे आधुनिक तंत्रज्ञांनानी सक्षम असल्याचा दावा करीत होता. पण ती सर्वच शस्त्र निरुपयोगी ठरली आहेत. यासर्वांसमोर भारतीय संरक्षण प्रणाली अभेद्य ठरली आहे. (China)
पाकिस्तानने चीनकडून खरेदी केलेल्या विंग लूंग-II ड्रोनचा भारताविरुद्ध अनेकवेळा वापर केला. हे चीनचे हवेतून पृष्ठभागावर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. पाकिस्तानने भारतावर डागलेल्या या क्षेपणास्त्राला भारतीय हवाई संरक्षण रडार यंत्रणेने अडवून निकामी केले. सोबत भारतावर पाकिस्तानने चिनी सुपरसॉनिक CM-400AKG क्षेपणास्त्र देखील सोडले. या क्षेपणास्त्राचा उल्लेख कॅरियर किलर म्हणून करण्यात येतो. हे अँटी-शिप मिसाईल भारतीय रडारने त्याच्या उड्डानाआधीच टिपले होते. भारतीय अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार एस-400 रडारने त्याचे निरीक्षण केले आणि या क्षेपणास्त्राला हवेतच नष्ट केले. मिळालेल्या माहितीनुसार सुवर्ण मंदिरावरही पाकिस्ताननं हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी चिनी बनावटीच्या A-100 MLRS चा वापर करण्यात आला. (International News)
हे चीनमध्ये बनवलेले एक मल्टीपल रॉकेट लाँचर शस्त्र आहे. या रॉकेटची क्षमता 100 किलोमीटरपर्यंत आहे. भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने हे रॉकेटही हवेतच नष्ट केले. चिनी शस्त्रांस्त्रांमध्ये या रॉकेटच्या क्षमतेबाबत मोठे दावे करण्यात येत होते. मात्र भारतानं हे सर्व दावे फेल असल्याचे दाखवून दिले. चिनी बनावटीच्या या क्षेपणास्त्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचेही आता उघड होत आहे. पीएल-15 हे त्यापैकीच एक आहे. जगातील सर्वात प्रगत हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांपैकी एक म्हणून पीएल-15 चा उल्लेख करण्यात येतो. मात्र पाकिस्तानने ते त्यांच्या JF-17 मधून भारताकडे सोडले तेव्हा ते अपयशी ठरले. कारण तांत्रिक बिघाडामुळे पीएल-15 उड्डाणादरम्यान पडले. त्याचे अवशेष होशियारपूरमध्ये साप़डले असून आता भारतीय तज्ञ त्याचा अभ्यास करीत आहेत. (China)
=======
हे देखील वाचा : Uttar Pradesh : चला देशातल्या पहिल्या विस्टाडोम ट्रेनच्या प्रवासाला
Langada Mango : लंगडा चालला युरोपला !
=======
भारतीय सैन्यानं चिनी शस्त्रांची निर्मिती किती हलक्या दर्जाची आहे, हे दाखवून दिलेच सोबत बलुचिस्तानमध्येही चिनी शस्त्रास्त्रे निकामी कऱण्यात बलुची सैन्याला यश आले आहे. बलुचिस्तानमधील बलुच बंडखोरांनी पाकिस्तानी लष्कराचे चिलखती वाहन भूसुरुंगाच्या स्फोटाने उडवून दिले. यात वाहनातील सर्व सैनिक ठार झाले. या हल्ल्यात जे वाहन नष्ट झाले होते, ते चिनी बनावटीचे डोंगफेंग आर्मर्ड व्हेईकल होते. 2021 मध्ये पाकिस्तानी सैन्यानं 300 अशी वाहनं खरेदी केली होती. चीन या वाहनाचा उल्लेख पुढील पिढीतील वाहन अशी करतो. मात्र बलुच बंडखोरांनी सध्या शस्त्रांस्त्रांद्वारे हे अख्खे वाहनच उडवून दिले आणि चिननं या वाहनाबाबत केलेला दावाही खोटा असल्याचे दाखवून दिले. या सर्वांमुळे चीनच्या शस्त्रास्त्र व्यापाराला मोठा फटका बसला आहे. (International News)
सई बने