Home » तुम्ही चीनचा लसूण खात असाल तर !

तुम्ही चीनचा लसूण खात असाल तर !

by Team Gajawaja
0 comment
Chinese Garlic
Share

भारतीय पदार्थ बनवतांना दोन महत्त्वाच्या गोष्टींची गरज असते. त्यातील एक गोष्ट म्हणजे, कांदा आणि दुसरी गोष्ट म्हणजे, लसूण. सध्या बाजारात या दोघांच्याही किंमती आकाशाला पोहचल्या आहेत. त्यातही लसूणाची किंमत तर पाचशे रुपयांच्या आसपास झाली आहे. अशातच भारतीय बाजारात छुप्या पद्धतीनं चिनी लसुणाची आयात होत असल्यानं काळजी व्यक्त करण्यात येत आहे. 2014 पासून भारताने चिनी लसणाच्या आयातीवर बंदी घातली आहे. कारण या चिनी लसुणामध्ये मोठ्या प्रमाणात किटकनाशकांचे प्रमाण आढळून आले होते. चिनी लसूण हा बुरशीने संक्रमित होता. जगात सर्वाधिक लसूण चीनमध्येच तयार होतो. जगभरात लसुणाची मागणी आहे, त्या मागणीसाठी 80 टक्के लसूण एकट्या चीनमध्ये तयार होतो. (Chinese Garlic)

पण हा लसूण किटकनाशकयुक्त असल्याचे सिद्ध झाल्यावर भारतीय बाजारात त्यावर बंदी घालण्यात आली. भारतीय लसूणाची पाकळी ही बारीक असते, पण चिनी लसूणाची पाकळी ही जाड असते. त्यामुळे अनेकांना चिनी लसूण हा चांगला असल्याचे वाटते. प्रत्यक्षात चीननं लसूणाची नैसर्गिक पोत बदलल्याचा जाणकारंचे सांगणे आहे. मुळात लसूण कुठल्याही प्रांतात लावला तरी त्याची कळी ही बारीक् असते. पण चिननं किटकनाशकांचा वापर करीत या लसणाच्या कळ्या जाड केल्या आहेत. लसणाच्या या कळ्यांमुळे मानवी जीवनाला धोका असल्याचे स्पष्ट झाले आहे. असाच चिनी बनावटीचा लसूण सध्या भारताच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला आहे. हा लसूण कमी किंमतीमध्ये उपलब्ध असल्यामुळे त्याची खरेदी केली जाते. याबाबत न्यायालयातही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. (International News)

चीन मध्ये सर्वाधिक लसूणाचे उत्पादन होते. मात्र चिनी बनावटीच्या या लसुणाला भारतामध्ये बंदी आहे. असे असले तरी हा चिनी लसूण भारताच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. यासंदर्भात नुकतीच अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. चिनी लसूणावर असलेल्या बंदीनंतरही हा लसूण भारतात मिळतोच कसा असा सवाल यावर हायकोर्टानं विचारला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकामध्ये दावा करण्यात आला आहे की, चिनी लसूण कीटकनाशके आणि रसायनांचा वापर करून तयार केले जातो. त्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता आहे. (Chinese Garlic)

भारताने या लसूणावर 2014 मध्येच बंदी घातली आहे, असे असतांनाही त्याची विक्री भारतीय बाजारपेठेत खुलेपणानं सुरु आहे. यासाठी चिनी लसूण थेट अलाहाबाद उच्च न्यायालयासमोर दाखवण्यात आला. यावर अलाहाबाद उच्च न्यायालयाने सरकारच्या अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन विभागाच्या यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने अशा बंदी असलेल्या वस्तूंचा देशात प्रवेश रोखण्यासाठी नेमकी कोणती यंत्रणा कार्यरत आहे हे विचारुन त्यात काही कमी आहेत, का याचे निरिक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. चायनीज लसूणवर बंदी असतानाही देशभरात उपलब्ध असल्याचे याचिकाकर्त्याने न्यायालयाला सांगत सुमारे अर्धा किलो चायनीज लसूण आणि त्यासोबत भारतीय लसूण न्यायालयासमोर सादर केला. (International News)

तसेच चायनीज लसुणावर बंदी घातल्यापासून हा लसूण नेपाळ किंवा बांगलादेशमार्गे भारतात येत असल्याची शंका आहे. चिनी लसुणात मिथाइल ब्रोमाइड नावाचे विषारी रसायन वापरले जाते. या लसुणाला बुरशीपासून वाचवण्यासाठी हे रसायन लावले जाते. मात्र लसुणासोबत हे किटकनाशक मानवी शरीरात जाते. दीर्घकाळ हे मिताइल ब्रोमाइड नावाचे रसायन लावलेला लसूण सेवन केल्याने यकृत, मूत्रपिंड आणि मज्जातंतूंच्या समस्या उद्भवू शकतात. शिवाय चिनी लसुणात फायटोसॅनिटरी धोका आहे. युनायटेड स्टेट्स इंटरनॅशनल ट्रेड कमिशनच्या अहवालानुसार अनेक देशांनी चिनी लसणावर बंदी घातली आहे. (Chinese Garlic)

======

हे देखील वाचा : ‘हे’ शाकाहारी पदार्थ आहेत प्रोटीनचा उत्तम स्रोत

======

चिनी लसूण नेमका कसे ओळखावा असा प्रश्न महिलांना पडतो. त्याची मुख्य खूण म्हणजे, भारतीय लसुणाची पाकळी ही बारीक असते, तर चिनी लसुणाची पाकळी ही जाड असते. चायनीज लसुणाचा वास स्थानिक लसुणापेक्षा कमी असतो. चिनी लसूण गुलाबी रंगाचा असतो. भारतीय लसूण हा पांढ-या रंगाचा असतो. चिनी लसूणावर झालेल्या संशोधनानुसार या लसुणावर मिथाइल ब्रोमाइडचा वापर होतो. त्यामुळे बुरशीची वाढ सहा महिन्यांपर्यंत थांबते. पण या सर्वांमुळे कर्करोग, रक्तदाब अशा आजारांना निमंत्रण मिळते. त्यामुळे बाजारात लसूण खरेदी करतांना प्रथम त्याचा दर्जा कसा आहे, हे बघण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. (International News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.