जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर दिवसागणिक वाढत चालला आहे. लोक याच्या माध्यमातून काही हटके करण्याचा प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान चीन मधील एका व्यक्तीने मृत आजीला पुन्हा जीवंत करण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी त्याने आर्टिफिशियल इंटेलिजेंसची मदत घेतली आहे. त्याचा हा प्रयत्न पूर्ण नव्हे तर काही मर्यादेपर्यंत यशस्वी झाला आहे. खरंतर शंघाई मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने ही कमाल केली आहे. (China)
साउथ चाइना मार्निंग पोस्टनुसार, व्यक्तीच्या या अशा कामगिरीमुळे चीनमध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे. व्यक्तीने तंत्रज्ञानाचा अशा पद्धतीने केलेल्या वापरामुळे आता सर्वजण त्याच्याबद्दल बोलू लागले आहेत. २४ वर्षीय वू नावाच्या व्यक्तीने मृत आजीशी एआयच्या माध्यमातून चॅट केले आहे. या दोघांमधील संवादाचा ऑडिओ सुद्धा नुकताच व्हायरल झाला होता. हा ऑडिओ ऑनलाईन पद्धतीने वू याने शेअर केला होता.

या व्हिडिओ वू असे म्हणत आहे की, आजी यावेळी माझे विडल आणि मी तुझ्याकडे येऊ शकत नाही. वडिलांनी गेल्यावेळी तुला कॉल केला होता. तेव्हा तु त्यांना काय म्हणाली होतीस? यावर एआय आजीने उत्तर दिले होते की, मी त्याला म्हटले होते की, दारु पिऊ नकोस, चांगला माणूस हो. पत्ते खेळू नकोस.
बातचीत दरम्यान एआय आजी त्या मुलाचे बोलणे काळजीपूर्वक ऐकत होती. त्याचसोबत ती हे सुद्धा दिसून येत होते की, ती बोलताना तिच्या चेहऱ्यावरील हावभाव स्पष्ट दिसून येत होते. वू हा खरंतर पेशाने विज्युअल डिझाइनर आहे. त्यामुळेच त्याने आजीला पुन्हा जिवंत करण्याचा विचार केला. कोरोना संक्रमणामुळे त्याच्या आजीचे निधन झाले होते. वू याने एआयचा वापर करत आजीची उपस्थिती, आवाज, व्यक्तिमत्व आणि तिच्या आठवणी ताज्या केल्या. या व्यतिरिक्त त्याने आजीचा फोटो एआय अॅपच्या मदतीने इंपोर्ट केला आणि तिचा आवाज सुद्धा त्याला दिला. या व्यतिरिक्त वू ने एआय चॅटबोट जीपीटीसोबत खुप वेळ बातचीत केली. जेणेकरुन त्याला कळेल की आजी कशा प्रकारे त्याच्याशी बोलत आहेत. (China)
हेही वाचा- ‘या’ परिवारातील सर्व सदस्यांची एक समानच नावे, ऐकून व्हाल हैराण
दरम्यान, वू हा आपल्या आजीशी खुप क्लोज होता. त्याचा आई-वडिलांचा घटस्फोट झाल्यानंतर त्याच्या आजीनेच त्याला वाढवले होते. वू च्या आजीच्या निधनानंतर तो फार दु:खी होता. अशातच त्याने तिच्यासोबत बातचीत करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीने एक आभासी अवतार तयार केला.