व्यक्तीने विज्ञानाच्या मदतीने खुप प्रगती केली आहे. आज सुद्धा जगातील असे काही रहस्य आहेत जे कोणीही उलगडू शकले नाहीत. खासकरुन जेव्हा आकाशातून अचानक पडणारा पाऊस, गाऱ्याऐवजी येणारी धुळ, रेती आणि किडे सुद्धा पडतात तेव्हा लोकांना काहीच कळत नाही. अशीच काहीशी स्थिती चीन मधील बिजिंग मध्ये झाली आहे. (China)
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, चीनची राजधानी बिजिंगमध्ये राहणाऱ्या लोकांना एका विचित्र समस्येचा सामना करावा लागत आहे. राजधानीतील विविध ठिकाणी आकाशातून किड्यांचा पाऊस पडत आहे. सोशल मीडियात याचे फोटो सुद्धा खुप व्हायरल होत आहेत. त्यामध्ये असे दिसून येत आहे की, चिकट किडे कशा प्रकारे रस्त्यांवर, गाड्यांवर पडले आहेत.
घरातून छत्री घेऊन बाहेर पडतायत लोक
El Heraldo च्या रिपोर्टनुसार, बिजिंगच्या नागरिकांना अधिकाऱ्यांनी सल्ला दिला आहे की, जर ते घरातून बाहेर पडत असतील तर त्यांनी छत्री घेऊन जावे. जेणेकरुन किड्यांपासून बचाव होईल. हैराण करणारी गोष्ट अशी की, चीनी अधिकाऱ्यांना सुद्धा या किड्यांच्या पावसाबद्दल काहीच कल्पना नाही. विविध सिद्धांत समोर ठेवले जात आहे. पण खरं जे काही असेल, चिकट अशी दिसणारी गोष्ट खुप मोठ्या प्रमाणात आकाशातून खाली कोसळत आहे.
नक्की काय आहे हे?
काही लोकांचे असे म्हणणे आहे की, चीनमध्ये आढळून येणारी पॉप्लरची ही फुलं आहेत.यावेळी झाडांवर फुल आणि त्याच्या बिया दिसून येतात. जेव्हा त्याची फूल पडतात तेव्हा असे दिसते की, ती फुलपाखरं आहे. दुसऱ्याने असे म्हटले की, वेगाने येणाऱ्या वाऱ्यासह हे चिकट किडे येत आहेत. या प्रकरणामुळे लोक घाबरली गेली आहेत. तसेच लोकांनी किड्यांची गडगडाट ही ऐकला. जेव्हा पाहिले तेव्हा जमिनीवर खुप प्रमाणात किडे विस्तारले गेले होते. टिकटॉकवर ही याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.(China)
हे देखील वाचा- जगातील ‘हे’ बेट प्रत्येक ६ महिन्याला बदलते देश
Mother Network च्या नावाने सायन्स जर्नल मध्ये असे सांगितले गेले आहे की, अशा प्रकारच्या वादळामुळे असे किडे येणे ही काय नवी गोष्ट नाही. यापूर्वी सुद्धा आकाशातून माशांचा पाऊस विविध देशांमध्ये पडल्याची प्रकरणे समोर आली होती. या विचित्र घटनेमागील नेमके कारण काय याचा खुलासा झालेला नाही. आता विविध कारणं त्याबद्दल सांगितली जात आहेत. प्रत्येकजण आपल्या पद्धतीने या संदर्भात तर्क लावत आहेत.