चीनने देशात वाढत्या वृद्धांच्या लोकसंख्येसह जन्मदरात होणारी घट पाहता पहिल्यांदाच म्हटले आहे की, लोकसंख्येच्या वृद्धित घट झाली आहे. चीननच्या नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिक्सच्या नुसार देशात गेल्या वर्षांच्या तुलनेत २०२२ च्या अखेर पर्यंत लोकसंख्या ८,५०,००० कमी होती. (China Population)
नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅस्टिक्स हाँककाँग, मकाओ आणि स्वशासी ताइवानसह परदेशी स्थानिकांची गणना करत नाही. हे ब्युरो केवळ चीनच्या लोकसंख्येची गणना करते. ब्युरोच्या मते, असे सांगितले गेले १.०४१ कोटी लोकांचा मृत्यू झाला होता. तर चीनमध्ये ९५.६ लाख लोकांच्या जन्मासह देशातील लोकसंख्या १४११७५ अरब झाली होती. यामध्ये ७२,२०६ कोटी पुरुष आणि ६८,९६० कोटी महिला सुद्धा असतात. चीन दीर्घ काळापासून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश होता. जर भारताची जनसंख्या वृद्धी थांबली नाही तर चीन पेक्षा देशाची लोकसंख्या होऊ शकते.
चीनमध्ये घटतोय जन्मदर
नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिक्सच्या मते, चीनमध्ये २०२१ मध्ये जन्मदर ७.५२ टक्के होती. तर वर्ष २०२२ मध्ये हाच आकडा कमी होऊन ६.६७ टक्के झाला. चीनमध्ये २०२१ मध्ये १०० लोकांवर ७.५२ मुलांचा जन्म व्हायचा. पण २०२२ मध्ये कमी होत तो आकडा ६.६७ झाला. १९४९ नंतरचा हा सर्वाधिक कमी आकडा आहे. चीनने १९७६ च्या नंतर आपल्या उच्चतम मृत्यूदर दाखल करण्यात आला होता.
चीनमध्ये घटत्या लोकसंख्येचे कारण काय?
चीनची लोकसंख्या सातत्याने कमी होत असल्यामागील कारण असे की, वन चाइल्ड पॉलिसी. चीनने वर्ष १९८० ते २०१५ दरम्यान, वन चाइल्ड पॉलिसी लागू केली होती. चीनमध्ये एज्यूकेशन ते लाइफस्टाइल ऐवढी महागडी आहे की, लोक मुलं जन्माला घालण्यापूर्वी काही वेळा विचार करतात. बहुतांश चीनचे नागरिक प्रतिबंध हटवल्यानंतर ही वन चाइल्ड पॉलिसीचे पालन करत आहेत. (China Population)
हे देखील वाचा- ईराणने आपल्याच देशातील माजी मंत्र्यांना दिली फाशी, कोण होते अलीरेज अकबरी?
जनसंख्या विशेतज्ञांचे असे म्हणणे आहे की, चीनमध्ये कोविड महारोगामुळे एक मोठी लोकसंख्या गमावली आह. चीनची हेल्थ सिस्टिम पूर्णपणे अयशस्वी झाल्याने लोकांचा मृत्यू होतायात. स्थानिक सरकारकडून लोकांना अधिक मुलं जन्माला घालण्याचा सल्ला दिला जात आहे. परंतु लोक त्यासाठी घाबरत आहेत.
आर्थिक रुपात गंभीर परिणाम
चीननच्या घटत्या लोकसंख्येमुळे आर्थिक रुपात गंभीर परिणाम होणार आहे. चीनमध्ये फार कमी लोक जन्माला येत आहेत. त्याचसोबत येथील वृद्धांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. त्यामुळे लवकरचा अशी वेळ येणार आहे की, जेव्हा चीनकडे काम करण्यासाठी तरुणांची कमतरता असणार आहे. तज्ञांचे असे मानणे आहे की, हा ट्रेंन्ड नवी घर आणि सामानाच्या मागणीला धीमा करुन आर्थिक विकासावर ब्रेकच्या रुपात काम करु शकते.