तुम्ही गर्भवती आहात का? तुमच्या पाळीची तारीख काय आहे, तुम्हाल नियमीत पाळी येते का, असा फोन एखाद्या महिलेला आल्यावर तिची प्रतिक्रिया काय असेल. अर्थातच तिचा संताप होईल. राग येईल. पण असेच फोन सध्या चिनमधील महिलांना सरकारी कार्यालयातून येत आहेत. आणि त्यामागे कारण आहे, चीनमधील कमी होणारी लोकसंख्या. आपल्या शेजारी असलेल्या चीनमध्ये एकेकाळी जगातील सर्वाधिक लोकसंख्या होती. मात्र आता या देशातील लोकसंख्या झपाट्यानं कमी होत असून त्याजागी भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश झाला आहे. चीनमध्ये लोकसंख्या एवढ्या झपाट्यानं कमी होत आहे, की चीनमधील सरकारला भविष्याची चिंता वाटू लागली आहे. सातत्याने कमी होत असलेल्या लोकसंख्येमुळे चीन सरकारनं आता महिलांना फोन करुन त्या गर्भवती आहेत की नाही, याची चौकशी करण्याचे काम सरकारी अधिका-यांवर टाकले आहे. गर्भवती असलेल्या महिलांना सरकारकडून अनेक सुविधा देण्यात येत आहेत. (China People)
तसेच अन्य महिलांना गर्भधारणेसाठी प्रवृत्त करता यावे यासाठी सरकारकडून प्रोत्साहन योजनाही चालवल्या जात आहेत. विवाहीत जोडप्यांनी अधिक मुले जन्म घालाव म्हणून चीनमध्ये सध्या अनेक धोरणे जाहीर होत आहेत. यात पालकांना आर्थिक अनुदान देण्यात येत आहे. ज्यांना जास्त मुले होतील, त्या मुलांच्या सर्व शिक्षणाचा आणि भरणपोषणाचा भारही चीन सरकार घेत आहे. यासाठी विविध स्तरावर समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच पहाणी अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळेच चीनमध्ये भविष्यात लोकसंख्येचे संकट किती गंभीर होणार आहे, याची एक झलक मिळत आहे. चीनच्या सरकारनं एकेकाळी जन्मदर रोखण्यासाठी कठीण उपाय केले होते. आता हेच उपाय चीनच्या अस्तित्वासाठी संकट ठरले आहेत. त्यामुळे आत्ताचे सरकार देशातील प्रजनन दर वाढवण्यासाठी अनेक उपाय करत आहेत. त्यातून चीनमधील महिलांना फोन करुन त्या गरोदर आहेत किंवा नाही, याची थेट चौकशी करण्यात येते. अर्थात या गोष्टीमळे तेथील सोशल मिडियावर अनेक विनोद, मिम्सही येत आहेत. मात्र चीनमधील कमी जन्मदर हा अनेक समस्या घेऊन आला आहे. कमी जन्मदरामुळे, चीनमधील अनेक बालवाडी शाळा बंद केल्या आहेत. या बालवाड्यांच्या जागी आता वृद्धाश्रम सुरु झाले आहेत. (International News)
एका अहवालानुसार 2035 पर्यंत, चीनच्या लोकसंख्येपैकी एक तृतीयांश लोकसंख्या ही 60 वर्षांपेक्षा जास्त वयाची असणार आहे. ही परिस्थिती देशाच्या भविष्यासाठीही गंभीर असल्याची जाणीव सरकारला झाली आहे. मुख्य म्हणजे, चीनची सर्व मदार त्यांच्या उत्पादन व्यवसाय आणि लष्करी शक्तीवर आहे. चीनची लोकसंख्याच एवढ्या मोठ्या प्रमाणात वयोवृद्ध झाल्यास या दोन्हीही क्षेत्रात चीन मागे पडणार आहे. एकूण याचा चीनच्या प्रगतीलाही खिळ बसणार आहे. त्यामुळेच चीनने 2020 मध्ये एक मूल धोरण रद्द केले. या धोरणानुसार, एकापेक्षा जास्त मुले असलेल्या कुटुंबांना मोठा दंड भरावा लागला होता. यामुळेच प्रजनन दरावर गंभीर परिणाम झाला होता. या धोरणाच्या विरुद्ध जाऊन आता अधिक मुले जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी अनेक नवीन धोरणे जाहीर केली आहेत. या धोरणांमध्ये मुलाच्या जन्मावर अनुदान देणे आणि पालकांचे कर कमी करण्यात आले आहेत. शिवाय मातांसाठी मातृत्व विम्याचालीह लाभ देण्यात येत आहे. गर्भार महिलेचा सर्व वैद्यकीय खर्च हा सरकारी योजनांमधून होत आहे. (China People)
======
हे देखील वाचा : दिवाळी ट्रेंडिंगचा ६८ वर्षांचा मोठा इतिहास
====
चीनमधील सर्वात मोठे शहर असलेल्या शांघायमध्ये 2023 मध्ये प्रजनन दर 0.6 टक्के होता. समाजातील लोकसंख्येची सद्यस्थिती कायम ठेवण्यासाठी प्रजनन दर 2.1 असावा लागतो. यातून या शहरात किती तफावत आहे, हे लक्षात येते. मात्र चीन सरकार हे सर्व उपाय करत असले तरी तेथील जनतेच्या प्रतिक्रीया संमिश्र आहेत. मुळात एक मुल योजना जाहीर केल्याबद्दलचा राग अद्यापही चीनच्या जनतेच्या मनात आहे. तेव्हा एकापेक्षा जास्त मूल झाले तर त्या जोडप्यावर अनेक बंधने टाकण्यात येत होती. तसेच त्यांच्याकडून दंडही वसूल करण्यात येत होता. तेव्हा सरकारने अशा प्रत्येक कुटुंबाकडून 45 हजार अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे 38 लाख रुपये दंड वसूल केला होता, ही सर्व रक्कम परत करावी अशी मागणीही करण्यात येत आहे. शिवाय चीन सरकारनं नागरिकांच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करण्याची सवय सोडावी अशी मागणीही चीनमधील तरुणानंकडून होत आहे. (International News)
सई बने