Home » China : जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुणांना चीनची साद !

China : जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुणांना चीनची साद !

by Team Gajawaja
0 comment
China
Share

अमेरिकेच्या ट्रम्प सरकारनं एच-1बी व्हिसासाठीच्या शुल्कामध्ये मोठी वाढ केल्यानं खळबळ उडाली आहे. या व्हिसाच्या आधारे जवळपास 70 टक्के भारतीय तरुण अमेरिकेमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहेत. अशा तरुणांच्या नोकरीवर गदा येणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र ट्रम्प यांच्या या खेळीवर आता चीननं चोख उत्तर दिलं आहे. जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणा-या तरुणांना आपल्याकडे आकर्षिक करण्याची हिच एक योग्य संधी असल्याचे पाहून चीननं आता अमेरिकेच्या एच-1बी व्हिसाशी स्पर्धा करेल असा के व्हिसाचा पर्याय आणला आहे. चीनचा नवीन के व्हिसा 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. हा व्हिसा अमेरिकेच्या एच-1बी व्हिसासारखाच आहे. परदेशी प्रतिभा आकर्षित करण्यासाठी, विशेषतः विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या किंवा शिकणाऱ्या तरुणांसाठी के व्हिसा डिझाइन केला आहे. (China)

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच1-बी व्हिसासाठी शुल्क वाढवले ​​आहे. यामुळे भारतासह जगभरात चिंता व्यक्त होत असतांना आता चीनने एक पर्याय सादर करुन डोनाल्ड ट्रम्प यांचे हे व्हिसा कार्ड फोल ठरवण्यासाठी पाऊल उचलले आहे. चीनने जगभरातील तरुण आणि प्रतिभावान व्यावसायिकांना आकर्षित करण्यासाठी, विशेषतः विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रातील तरुण आणि प्रतिभावान व्यावसायिकांना आकर्षित करण्यासाठी ही के व्हिसा ही श्रेणी सुरू केली आहे. हे करतांना चीननं या के व्हिसाची सर्व नियमावली अत्यंत सुलभ केली आहे. त्यामुळे भविष्यात एच-1बी व्हिसाचे महत्त्वच कमी होण्याची शक्यता आहे. (International News)

एच-1बी हा अधिक महाग आहे. मात्र चीननं के व्हिसासाठी परदेशी व्यावसायिकांवर कोणतेही बंधन ठेवलेले नाही. या व्हिसासाठी अर्ज करणा-यांना स्थानिक कामाची आवश्यकता, हा नियम लागू होणार नाही. त्यामुळे या तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुणांचा चीनमध्ये प्रवेश सुलभ होणार आहे. के व्हिसा चीनच्या विद्यमान 12 सामान्य व्हिसा श्रेणींपेक्षा अधिक फायदेशीर आहे. या व्हिसाच्या माध्यमातून दीर्घ कालावधीच्या वास्तव्याची परवानगी मिळणार आहे. शिवाय ज्या कंपनीमध्ये हे तरुण कामाला असणार आहेत, त्या कंपनीकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तताही कमी प्रमाणात असणार आहे. चीनमध्ये ऑगस्टमध्ये मंजूर झालेला हा निर्णय परदेशी लोकांच्या देशात प्रवेश आणि निर्गमन नियंत्रित करणाऱ्या नियमांमध्ये सुधारणा करणारा आहे. हा के व्हिसा 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होईल. (China)

चीनचा नवीन के व्हिसा हा यूएस एच-1बी व्हिसाशी मिळताजुळता मानला जातो. चीननं अगदी योग्यवेळी आपल्या देशात विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रातील प्रतिभांना आकर्षित करण्यासाठी उचललेले हे पाउल आहे. यामागे चीनची अंतर्गत स्थितीही कारणीभूत आहे. गेल्याकाही वर्षापासून चीनमध्ये सामाजिक समतोल ढळलेला आहे. चीनच्या एक मूल धोरणानं अनेक सामाजिक परिणाम येथील समाजमनावर झाले आहेत. परिणामी आता चीनची लोकसंख्या ही दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे चीनमध्ये आवश्यक असे मनुष्यबळ कमी होत असल्याची ओरड आहे. त्यातच चीनमधील काही कंपन्यांनी नोकरीच्या ठिकाणी कामाचे तास वाढवले आहेत. अनेक कंपन्यांमध्ये आठवड्याच्या सुट्ट्याही देण्यात येत नाहीत. या सर्वांमुळे येथील तरुण वर्गात कमालीची नाराजी आहे. त्यामुळे चीनमधील तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात परदेशात जात आहे. अशावेळी चीनमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुणांची कमी जाणवत आहे. यामुळेच गेल्या काही महिन्यापासून चीन सरकार चीनमध्ये परदेशातील तरुणांना आकर्षिक होतील असा व्हिसा डिझाइन करत होते. (International News)

============

हे देखील वाचा : Donald Trump : अमेरिकेच्या व्हिसा शुल्कात वाढ !

==============

आता नेमकं अमेरिकेनं एच-1बी व्हिसाच्या शुल्कात वाढ केली आणि के व्हिसाचा पर्याच चीननं जगभरातील तरुणांपुढे ठेवला आहे. या के व्हिसा अंतर्गत मान्यताप्राप्त विद्यापीठे किंवा संशोधन संस्थांमधून शिक्षणही घेता येणार असून त्या तरुणांना चीनमध्येच काम करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी अर्जदारांना चीन सरकारने ठरवलेल्या निकषांची पूर्तता करावी लागणार असून पदवी प्रमाणपत्र, संशोधन/रोजगाराचा पुरावा ही आवश्यक कागदपत्रे दान करावी लागतील. चीनमध्ये प्रवेश केल्यानंतर, के व्हिसा धारकांना व्यावसायिक क्रियाकलापांव्यतिरिक्त संस्कृती आणि विज्ञान क्षेत्रात अभ्यास करण्याची परवानगी दिली जाणार आहे. अमेरिकेच्या एच-1बी व्हिसाच्या शुल्कवाढीनंतर चीनचा के व्हिसा हा आशियातील तरुणवर्गासाठी सोयीस्कर पर्याय ठरणार आहे. (China)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.