Home » चीनकडून जगातील सर्वाधिक वेगवान इंटरनेट सेवा लॉन्च

चीनकडून जगातील सर्वाधिक वेगवान इंटरनेट सेवा लॉन्च

अमेरिकेला मागे टाकत चीनने जगातील सर्वाधिक वेगवान इंटरनेट सेवा लॉन्च केली आहे. ही सेवा ऐवढी वेगात काम करते की, एका सेकंदात 150 HD क्लिप्स ट्रांसफर केले जाऊ शकतात.

by Team Gajawaja
0 comment
China
Share

अमेरिकेला मागे टाकत चीनने जगातील सर्वाधिक वेगवान इंटरनेट सेवा लॉन्च केली आहे. ही सेवा ऐवढी वेगात काम करते की, एका सेकंदात 150 HD क्लिप्स ट्रांसफर केले जाऊ शकतात. चीनमध्ये 1.5 टेराबाइट प्रति सेकंदाची स्पीड मिळत आहे. याच्या लॉन्चिंगनंतर येथे मिनिटांमध्ये होणारे डाउनलोडिंग अवघ्या काही सेकंदात केले जाऊ शकते. अशी चर्चा होती की, २०२५ च्या आधी जगातील सर्वाधिक वेगवान इंटरनेट सेवा तयार होणे मुश्किल आहे. पण चीनने वेळेआधीच ते लॉन्च केले आहे. (China)

चीनने जगातील सर्वाधिक वेगवान इंटरनेटला शिंगुआ युनिव्हर्सिटी, चाइना मोबाईल, हुवावो टेक्नॉलॉजी आणि Cernet कॉर्पोरेटने मिळून तयार केले आहे. अशातच असा प्रश्न उपस्थितीत होतो की, अमेरिका आणि रशिया सारख्या देशांनी जे करून दाखवले नाही ते चीनने कसे साध्य केले?

Australian researchers record world's fastest internet speed | Ariana News

वेगनवान इंटरनेट सेवेसाठी चीन गेल्या १० वर्षांपासून मेहनत करत आहे. चीन भविष्यातातील तंत्रज्ञानाला अधिक मजबूती मिळावी म्हणून प्रोजेक्टची सुरुवात केली होती. नवी संधी चीननच्या फ्युचर इंटरनेट टेक्नॉलॉजी इंफ्रास्ट्रक्चरचा फार महत्त्वाचा हिस्सा आहे. हे चीन एज्युकेशन अॅन्ड रिसर्च नेटवर्कचे नवे रुप आहे. चीनचे सर्वाधिक मोठे एज्युकेशनल आणि रिसर्च कम्प्युटर नेटवर्क आहे. हे नेटवर्क चीनच्या ३ हजार किमी लांब ऑप्टिकल फायबरच्या माध्यमातून फैलावले आहे.

या नेटवर्कला चीनचा बॅकबोन असे म्हटले जाते. कारण ते तीन हिस्स्यात कव्हर करत कनेक्टिव्हिटी मजबूत बनवते. यामध्ये नॉर्थचा बीजिंग, सेंट्रलचे वुहान आणि साउथचे गुआंगझोचा समावेश आहे. या तिन्ही ठिकाणी १ सेकंदात 1.2 TB च्या स्पीडने डेटा ट्रांसफर केला जाऊ शकतो.

चीनने वेगवान इंटरनेट तयार करण्यासाठी जे काही सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर वापरले आहेत जे त्यांनी स्वत:तून त्यांच्या येथे तयार केले आहेत. यामध्ये राउटर, स्विचेस ते ऑप्टिकल फायबर कनेक्शनचा समावेश आहे. चीन आता यावर थांबणार नसून अजून इंटरनेटचा स्पीड कसा वाढला जाईल याची तयार करत आहेत. या प्रोजेक्ट संबंधित टीम येथे मल्टिपल ऑप्टिकल पाथला एकत्रित जोडून डेटा ट्रांसमिशनची स्पीड अधिक वाढवण्याच्या तयारीत आहेत. (China)

तंत्रज्ञानासंबंधितच्या गोष्टींमध्ये चीन आता आपली दुसऱ्यांवर असणारी निर्भरता पूर्णपणे घालवू पाहत आहे. वेगवान इंटरनेट सेवा हेच त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. चीन आता केवळ तंत्रज्ञान क्षेत्रातच नव्हे तर आंतराळात सुद्धा आपली पोच बनवण्याच्या तयारीत आहे.


हेही वाचा- चीन मधून बेपत्ता होतायत मंत्री


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.