थायलंड आणि कंबोडिया या दोन आशियायी देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धामागे नेमका कोणाकोणाचा हात आहे, हे आता उघड होऊ लागलं आहे. थाई सैन्याने कंबोडियाविरुद्ध ‘ऑपरेशन युथा बोडिन’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. आपली पवित्र भूमी परत मिळवण्यासाठी हे युद्ध लढणार असे थायलंडनं जाहीर केलं आहे. वास्तविकपणे थायलंडच्या लष्करी सामर्थ्यांपुढे कंबोडियाचे लष्करी सामर्थ्य हे अत्यंत कमी आहे. पण तरीही हा देश थायलंडने सुरु केलेल्या हल्ल्याविरुद्ध उभा राहिला, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात होते. त्यातूनच कंबोडियामागे कोणता देश आहे, याचा मागोवा घेण्यात आला. यातून पहिला नंबर लागला तो चीनचा आणि त्यापाठोपाठ नाव आले ते पाकिस्तानचे. चीननं कंबोडियामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक केली आहे. (Thailand and Cambodia)
कंबोडियामधील विमानतळे आणि अन्य सरकारी इमारती बांधण्यात चीनचा पुढाकार आहे. त्यामुळे चीनचा कंबोडियाला या युद्धासाठी छुपा पाठिंबा मिळत आहे. सोबतच कंबोडियन सैन्याचा युद्ध सराव पाकिस्तानी सैन्यासोबत होतो. त्यामुळे या युद्धात पाकिस्तानचा पाठिंबा कंबोडियाच्या मागे आहे. अर्थात पाकिस्तान कंबोडियाला कुठलिही आर्थिक मदत देण्याच्या परिस्थितीत नाही. पण चीन या युद्धात जाहीरपणे कंबोडियाच्या मागे उभा राहिला तर पाकिस्तानही आपली भूमिका जाहीर करणार आहे. यासर्वात थायलंडचे सैन्य अमेरिकन सैन्याकडून प्रशिक्षण घेते. त्यामुळे थायलंड आणि कंबोडिया या युद्धात या दोन्ही देशांच्या नाड्या चीन आणि अमेरिका या दोन देशांच्या हातात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
थायलंड आणि कंबोडिया या दोन्ही देश गौतम बुद्धाच्या विचारसणीचे पालन करतात. मात्र आता या देशांमध्ये एका मंदिरावरुन युद्ध सुरु झाले आहे. मंदिरावरुन युद्ध असले तरी या युद्धामागे दोन्ही देशांचा उद्देश वेगळा आहे. थायलंडनं ‘ऑपरेशन युथा बोडिन’ जाहीर केले आहे. थाई भाषेत ‘युथा बोडिन’ चा अर्थ “भूमीचे रक्षण करण्यासाठी सर्वोच्च युद्ध” असा होतो. ‘युथा’ हा शब्द युद्धाचे प्रतीक आहे, तर ‘बोडिन’ हा शब्द पवित्र भूमीचा संदर्भ देतो. थायलंडच्या लष्करी अधिका-यांनी जाहीर केले आहे की, थायलंडच्या जमिनीवर आक्रमण करणा-या कुठल्याही शत्रूला माफ करण्यात येणार नाही. जमीन, लोक आणि थाई सन्मानासाठी थाई भूमीवर अतिक्रमण करणाऱ्या सर्वांना चिरडून टाका, म्हणत, थायलंडच्या सैन्यानं कंबोडिया विरोधात जोरदार आघाडी उभारली आहे. याला उत्तर देण्यासाठी कंबोडियाने रशियन बनावटीच्या रॉकेट सिस्टीमचा वापर केला. यामुळे हे युद्ध वाटते तेवढे सोप्पे नाही, याची कल्पना आली. (Thailand and Cambodia)
थायलंड आणि कंबोडियामधील सीमा वाद 1907 च्या करारापासून सुरू झाला. त्याकाळी कंबोडिया फ्रेंच वसाहत होती. दुसऱ्या महायुद्धात थायलंडने कंबोडियाचा काही भाग ताब्यात घेतला, परंतु 1946 मध्ये तो फ्रेंच राजवटीत परत करावा लागला. तेव्हापासून या दोन्ही देशांमध्ये सीमावाद सुरु आहे. या दोन्ही देशांमध्ये अनेक किलोमीटर जमिनीवरून सुरु असलेला वाद 2008 मध्ये अधिक दाहक झाला. तेव्हा 1000 वर्ष जुन्या भगवान शंकराच्या मंदिराचा मुद्दा यात आला. त्यातून 2008 आणि 2011 मध्ये या दोन्ही देशांमध्ये छोट्या चकमकी झाल्या. पण यावेळी जे युद्ध सुरु झाले आहे, त्यामुळे आशियामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. यावेळी युद्धाची सुरुवात थायलंडनं केली आहे. F-16 सारख्या प्राणघातक लढाऊ विमानांचा वापर केल्यामुळे 15 हून अधिक कंबोडियन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आता याबाबत कंबोडियानं युएनकडे दाद मागितली आहे. (International News)
कारण युद्ध सुरु झाले तर त्यात कंबोडियाचा कितपत निभाव लागेल हे प्रश्नचिन्ह आहे. कंबोडिया हा एक अतिशय गरीब देश आहे. या देशानं अनेक दशके युद्ध, हुकूमशाही, गृहयुद्ध, नरसंहार आणि दुष्काळ सहन केला आहे. त्यातून अलिकडच्या काळात सावरत असलेल्या कंबोडियावर थायलंडनं हे युद्ध लादलं तर त्याला चीनचा सहारा घ्यावा लागणार आहे. कंबोडिया आणि चीन यांची जवळीक अलीकडे वाढली आहे. कंबोडियामध्ये, चीन एक भव्य विमानतळ बांधत आहे. शिवाय तेथील सरकारी इमारती आणि देशातील पहिल्या एक्सप्रेसवेच्या बांधकामासाठी मोठ्याप्रमाणात चीनने निधीही दिला आहे. (Thailand and Cambodia)
=========
Prince Mohammed bin Salman : स्वप्नातील शहराचा प्रकल्प डबाबंद होणार
=========
याशिवाय चीनने अलीकडेच कंबोडियातील रीम नौदल तळाचे आधुनिकीकरण केले आहे. आता हा नौदल तळ चिनी युद्धनौकांसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळेच कंबोडिया आणि थायलंड हे युद्ध लांबले तर कंबोडिया स्वतःच्या सुरक्षेसाठी चीनकडे साकडं घालणार, अशी अटकळ आहे. असे झाल्यास थायलंडवर दबाव आणण्यासाठी, चीन कंबोडियाला लष्करी मदत देईल, असा अंदाजही व्यक्त कऱण्यात येत आहे. याशिवाय थायलंडच्या सैनिकांना अमेरिकन सैन्य प्रशिक्षण देते. त्यामुळे अमेरिकेवर अप्रत्यक्ष दबाव आणण्यासाठी चीन या युद्धात कंबोडियाला मदत देण्याची शक्यता आहे. असे झाले तर हे दोन आशियायी देश दोन महासत्तांच्या हातातले बाहुले होण्याचीच शक्यता यातून दिसत आहे. (International News)
सई बने…
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics