चीनच्या एका कोर्टाने भ्रष्टाचाराप्रकरणी चीनचे माजी मंत्री यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. माजी मत्र्यांवर आपल्या पदाचा चुकीचा वापर करण्यासह लाच घेतल्याचा आरोप लावण्यात आला होता. चीनच्या कोर्टानत हे सत्य समोर आले की, माजी मंत्र्यांनी पदावर असतानाच्या काळात भारतीय रुपयांप्रमाणे ७ अरब ऐवढी लाच घेतली होती. दरम्यान त्यांना फाशीच्या शिक्षा देण्यासाठी २ वर्षाची बंदी असणार आहे. (China Ex-Vice Minister Bribe)
याच्या एक दिवसआधी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना एका कोर्टाने भ्रष्टाचार आणि पदाचा दुरोपयोग केल्याप्रकरणी शिक्षा सुनावली होती. राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या विरोधकांच्या एका समूहाचे नेतृत्व करणारे आणि जन सुरक्षा प्रकरणातील माजी उपमंत्री सुन लिजुन यांचा लात घेतल्याच्या आरोपाखाली मृत्यूची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्यावर असा ही आरोप लावण्यात आला आहे की, ते शेअर बाजार प्रभावित करायचे आणि अवैध पद्धतीने हत्यारे ठेवायचे.
जिनपिंग यांचे विरोधी राहिले आहेत सुन लिजुन
पुर्वोत्तर चीनमध्ये जिलिन प्रांतातील इंटरमेडिएट पीपुल्स कोर्ट ऑफ चांगचुग यांनी असे म्हटले की, सुन यांना त्यांच्या राजकीय अधिकारांपासून वंचित केले जाईल. त्यांची सर्व खासगी संपत्ती फ्रीज केली जाईल. सुन यांच्यावर एक विरोधी समूहाचे नेतृत्व करणे आणि शी यांच्या प्रति निष्ठाहीन होण्याचा आरोप लावण्यात आला आहे. वृत्तात असे म्हटले गेले की, भ्रष्टाचाराच्या प्रकरणी आरोपात पाच माजी पोलीस प्रमुखांना याच आठवड्याच्या सुरुवातीला तुरुंगात पाठवण्यात आले होते. (China Ex-Vice Minister Bribe)
हे देखील वाचा- इराण मधील ‘हे’ विचित्र कायदे ऐकून तुम्हालाच येईल राग
आणखी दोघांना मृत्यूची शिक्षा
कोर्टाने एक शक्तिशाली माजी न्याय मंत्री फु जेंघुआ यांच्यासह दोन वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांना सुद्धा मृत्यूची शिक्षा सुनावली होती. दरम्यान, त्यांच्या फाशीच्या शिक्षेवर दोन वर्षांपर्यंत बंदी असेल असे ही त्यांनी स्पष्ट केले. सरकार संचलित पीपुल्स डेली ऑनलाईनच्या बातमीनुसार त्याच्या काही तासानंतर जियांग्युचे अधिकारी वांग लाइक यांना सुद्धा अशीच शिक्षा सुनावली. तर जिगांस्यु प्रांतीय कमेटी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चाइना (सीपीसी) चे माजी सदस्य आहेत. नुकतेच कोर्टाने असे म्हटले की, हे समोर आले सुन यांनी २००१ ते एप्रिल २०२० पर्यंत विविध पदांवर राहत त्याचा फायदा घेत एकूण ९.२३ कोटी डॉलरहून अधिक धन आणि मौल्यवान वस्तू मिळवल्या आहेत.