चीन मध्ये नुकतेच भुकंपाचे जोरदार धक्के बसले होते. त्याची तीव्रता ६८ रिश्टर स्केल होती. या भुकंपात आतापर्यंत ७४ जणांचा मृत्यू झाला आहे. शेकडो लोक जखमी झाले आहेत. त्याचसोबत संसाधनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झाले आहे. भुकंपाच्या या धक्क्यांमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर रेस्क्यू ऑपरेशन सुद्धा सुरु आहे. एका बाजूला भुकंपाची स्थिती तर दुसऱ्या बाजूला कोविडचे कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. (China Covid Outbreak)
सध्याची स्थिती अशी आहे की, चीनमध्ये साडे सहा कोटी लोकांना कठोर कोविडच्या नियमाअंतर्गत नजरकैदेत ठेवले आहे. चीनमध्ये पुढील काही दिवसात नॅशनल हॉलिडे येणार आहेत. त्यामुळेच चीनकडून कोणत्याही प्रकारच्या प्रवासावर बंदी घातली आहे. म्हणजेच सुट्टीच्या दिवशी सुद्धा चीनी नागरिकांना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई असणार आहे.

लूनर न्यू ईअरच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय
चीनमध्ये लूनर न्यू ईयर सुरु होणार आहे. त्यामुळे १०-१२ सप्टेंबर पर्यंत सुट्टी असते. हे चीनमधील सर्वाधिक दुसरे खास आणि महत्वपूर्ण दिवस आहेत. परंतु ज्या प्रकारे कोविड संदर्भात चीन सरकारकडून निर्बंध लादले गेले आहेत त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या सामान्य आयुष्यावर पडत आहे. याच दरम्यान चीनमध्ये सत्तारुढ कम्युनिस्ट पार्टीचे असे म्हणणे आहे की, हे निर्बंध कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक आहेत.(China Covid Outbreak)
हे देखील वाचा- एरिया 51 काय आहे? ज्याबद्दल ऐकले पण खरंच ते एलियने बेस कॅम्प आहे?
६.५ कोटी लोक घरात नजरकैद
चीनी बिझनेस मॅगझिन Caixin च्या नुसार, संपूर्ण चीनमधील ३३ शहरात सध्या पूर्णपणे किंवा आंशिक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यामध्ये ६.५ कोटी लोकांचा समावेश आहे. ही लोक एका बाजूला घरात नजरकैदेत आहेत आणि त्यांना घराबाहेर पडण्यास बंदी आहे. सोमवारी नॅशनल हेल्थ कमिशनच्या एका रिपोर्ट्सनुसार, एका दिवसात देशात कोरोनाचे नवे १५५२ रुग्ण आढळून आले होते.
दरम्यान, दक्षिण पश्चिमी चेंगदू शहरात जवळजवळ २.१ कोटी लोकसंख्या आपल्या फ्लॅट किंवा स्थानिक परिसरातील घरात बंदच आहेत. तर पूर्व बंदरगाह शहर तियानजिन मध्ये कोरोनाचे १४ प्रकरणे समोर आल्यानंतर तेथे ऑनलाईन वर्ग सुरु करण्यात आले आहेत. तर
कोरोना व्हायरस पहिल्यांदाच २०१९ च्या अखेरीस चीन मधील वुहान येथे आढळून आला होता.