Home » चीनमध्ये 2 तासच स्मार्टफोन वापरता येणार?

चीनमध्ये 2 तासच स्मार्टफोन वापरता येणार?

स्मार्टफोनच्या चुकीच्या वापरासंदर्भात चीन कठोर पावले उचलणार आहे. चीन स्मार्टफोनच्या वापराबद्दल काही नवे नियम लागू करण्याची योजना आखत आहे.

by Team Gajawaja
0 comment
China
Share

सध्या सर्वांच्याच हातात स्मार्टफोन दिसतो. खरंतर स्मार्टफोन प्रत्येकाच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग झाला आहे. लहान मुलं सुद्धा जेवढा वेळ अभ्यास करण्यासाठी घालवत नाही तेवढा अधिक वेळ स्मार्टफोनवर घालवतात. अशातच  स्मार्टफोनच्या चुकीच्या वापरासंदर्भात चीन कठोर पावले उचलणार आहे. चीन स्मार्टफोनच्या वापराबद्दल काही नवे नियम लागू करण्याची योजना आखत आहे. नव्या नियमांनुसार मुलांसाठी स्मार्टफोनच्या वापरावर बंदी घातली जाऊ शकते. अद्याप हा नियम लागू झालेला नाही. चीनने यावर काही प्रस्ताव दिला असून त्यानुसार १८ वर्षाखालील मुलांना दिवसातून केवळ २ तासच फोन वापरण्यास दिला पाहिजे. तर काही एक्सपर्ट्सचे असे मानणे आहे की, विविध वयातील मुलांसाठी स्मार्टफोनचा वापर करण्याची वेळ ही विविध असावी. (China)

काय असू शकतात नियम?
नव्या प्रस्तावानुसार चीनमध्ये आठ वर्षापेक्षा कमी वयातील मुलांना दिवसातून कमीत कमी ४० मिनिट स्मार्टफोन वापरण्यास दिला पाहिजे, तर ८-१६ वयोगटातील मुलांना दररोज किमान १ तास तरी स्मार्टफोन, जर मुलाचे वय १६-१७ वर्षादरम्यान असेल तर दोन तासांची वेळ निर्धारित केली पाहिजे.

या व्यतिरिक्त चीनकडून १८ वर्षाखालील मुलांसाठी रात्री १० ते सकाळी ६ वाजे पर्यंत स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातली पाहिजे. चीनचे असे मानणे आहे की, अधिक वेळ स्क्रिनवर घालवल्याने लठ्ठपणा, झोपण्यासाठी समस्या आणि लक्ष केंद्रित होण्यास समस्या उद्भवू शकते. त्यामुळे चीन स्मार्टफोनमध्ये माइनर मोड देणार आहे. माइनर मोड १८ वर्षाखालील मुलांसाठी असतो.

माइनर मोड म्हणजे काय?
रिपोर्ट्सनुसार, माइनर मोड मध्ये आई-वडिलांना कंटेट पाहणे आणि त्यावर बंदी घालण्याची सुविधा दिली जाणार आहे. जेणेकरुन त्यांना पाहता येईल की, त्यांची मुलं स्मार्टफोनवर काय पाहत आहेत आणि काय नाहीत.

दरम्यान गेल्या काही वर्षांमध्ये तरुणांमध्ये इंटरनेचा वाढत्या वापरामुळे अथॉरिटीज चिंतेत आहेत. चीनच्या सरकारने जवळजवळ दोन वर्षांपूर्वी १८ वर्षाखालील मुलांसाठी व्हिडिओ गेम प्लेअरवर बंदी घातली होती. यामुळे Tencent सारख्या मोठ्या गेमिंग कंपन्यांचे भारी नुकसान झाले होते. (China)

हेही वाचा- युनेस्कोने सुद्धा सांगितले मुलांसाठी मोबाईल घातक, पालकांनी करावे ‘हे’ काम

भारतात स्मार्टफोन वापरासंबंधित काय नियम आहे?
भारतात मुलांसाठी स्मार्टफोन वापरासाठी कोणताही नियम नाही. मात्र काही कंपन्या जरुर विचारतात की, तुमचे १८ वर्षापेक्षा अधिक आहे की नाही. जर तुम्ही यासाठी हा म्हणालात तर वेरिफिकेशन केले जात नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.