Home » China : लग्न करा अन्यथा….

China : लग्न करा अन्यथा….

by Team Gajawaja
0 comment
China
Share

चीन या देशाबद्दल जेवढं ऐकावं तेवढं नवल आहे. एकेकाळी सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या या देशात एकेकाळी दाम्पत्याला एक मुलाची सक्ती कऱण्यात आली होती. एकापेक्षा जास्त मुले झाल्यास त्या मुलांना कुठलिही सुविधा मिळत नसे. शिवाय त्याच्या पालकांनाही नोकरीमध्ये बढतीपासून वंचित ठेवण्यात येत असे. मात्र आता चीनचे हेच धोरण त्याच्या पतनास कारणीभूत ठरण्याची चिन्हे आहेत. गेल्या काही वर्षात चीनमधील लोकसंख्या झपाट्यानं कमी होत आहे. येथे जन्माला येणा-या मुलांच्या प्रमाणात घट झालीच आहे, शिवाय चीनमधील तरुणांमध्ये मुले जन्माला घालण्याबाबत उदासीनता आहे. चीनमध्ये मुलभूत सुविधांच्या वाढलेल्या किंमती आणि कुटुंबाबदद्लची तरुणांमध्ये कमी असलेली ओढ यामुळे येथे सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नाबाबत समाजात जागृकता निर्माण करण्यासाठी उपाय करण्याऐवजी चीन सरकारनं आता आपल्याच नागरिकांना धमकी द्यायला सुरुवात केली आहे. (China)

त्यासाठी मोठे विचित्र कायदे लागू कऱण्याच्या तयारीत चीनमधील सरकार आहे. एक तर चीनमध्ये युवकांमध्ये लग्न कऱण्याच्या प्रमाणात घट आली आहे, यावर उपाय म्हणून चीनमधील सरकारनं युवकांसाठी फर्मान काढले आहे, लग्न करा, अन्यथा नोकरीपासून दूर व्हा. जे तरुण लग्न करणार नाहीत, त्यांना नोकरीतून काढून टाकण्यात येणार आहे. एवढ्यावरच थांबेल तर चीनमधील सरकारच काय, यापुढे जात चीनमधील सरकारनं नवविवाहित जोडप्यांना आदेश दिला आहे की, लग्न झाल्यावर नऊ महिन्यात बाळाचा जन्म झालाच पाहिजे. असे झाले नाही तरीही या जोडप्याला नोकरीतून काढून टाकण्यात येणार आहे. या आदेशामुळे चीनमधील तरुणांमध्ये खळबळ उडाली असली तरी, जागतिक स्तरावर चीनवर टिका करणा-यांच्या हातात चीननं आणखी एक मुद्दा दिला आहे. चीनमध्ये सध्या सर्वात मोठी समस्या आहे ती, लोकसंख्येमध्ये होणारी झपाट्यानं घट. गेल्या काही वर्षापासून येथील लोकसंख्या वाढीचा दर कमी झाला आहे. (International News)

2024 मध्ये चीनची लोकसंख्या 13 लाखांहून अधिक कमी झाली. जाणकारांच्या मते जशी वर्ष वाढत जातील, तसा हा लोकसंख्या घटण्याचा वेग वाढत जाणार आहे. त्यातच चीनमध्ये 2035 नंतर 60 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या ही वयाच्या 65 वयाच्या पुढे गेलेली असणार आहे. यामुळे चीनी सरकारनं लोकसंख्या वाढीचं आव्हान स्विकारत त्यासाठी देशातील तरुणांना धमकवण्यास सुरुवात केली आहे. चीनी सरकारनं येथील कंपन्यांना एक नोटीस दिली आहे. त्याबाबत कंपन्यामध्ये काम करत असलेल्या तरुणांना लग्न करा, असा आदेशच देण्यात आला आहे. या नोटीसमध्ये तुम्ही लग्न केले नाहीत तर तुम्हाला नोकरीवरून काढून टाकले जाईल, असे स्पष्ट आदेशच देण्यात आले आहेत. बरं हे आदेश एवढ्यावरच नाहीत, तर लग्न झाल्यावर 9 महिन्यात मुलाला जन्म दिलाच पाहिजे, अन्यथाही नोकरीवरुन काढून टाकण्याचा आदेश आहे. याची तारीखही कंपन्यांनी दिली आहे. कंपनीतील ज्या कर्मचा-यांची लग्न झालेली नाहीत, त्यांनी 30 सप्टेंबर पर्यंत लग्न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर जे अविवाहित तरुण किंवा तरुणी कंपनीमध्ये असतील, त्यांना नोकरीतून कुठलिही नोटीस न देता काढून टाकण्यात येईले, असेही सांगण्यात आले आहे. (China)

सरकारनच असे आदेश दिल्यामुळे अनेक कंपन्या त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी कऱत आहेत. काही कंपन्यांनी नोकरभरतीची जाहिरात प्रसिद्ध करतांना याबाबत सूचना दिलेली आहे. तसेच या सूचनेचा जे पालन करत नाहीत, ते कृत्य म्हणजे, देशाचा विश्वासघात असल्याचेही म्हणण्यात आले आहे. चीनमधील एका सुपरमार्केट साखळीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना खर्च कमी करण्यासाठी लग्नात भेटवस्तू मागू नका, अशाही सूचना केल्या होत्या. त्यातून लग्नाचा खर्च कमी होईल, आणि अधिकजण लग्न करण्यासाठी प्रेरित होतील, हा हेतू आहे. गेल्यावर्षी चीनमध्ये 6.1 दशलक्ष जोडप्यांनी लग्न केले. त्याआधीच्या वर्षाची तुलना केली तर लग्न करणा-यांची संख्या 20 टक्क्यांनी घटली आहे. मात्र चीनमध्ये तरुणांमध्य लग्न करण्याबाबत असलेली उदासीनता हा जरी प्रमुख मुद्दा असला तरी लग्न झालेली दाम्पत्ये मुल होऊ देण्यास नकार देत आहेत. (International News)

===============

हे देखील वाचा : Black Turmeric : भारताच्या काळ्या सोन्याला परदेशात मोठी मागणी !

America : अमेरिकेत जन्मलेल्या मुलांनाही देश सोडावा लागणार !

===============

याला कारण तेथील नोकरीमध्ये असलेली स्पर्धा विशषतः नोकरी करणा-या महिलांना बाळपणासाठी घेण्यात येणा-या रजेमुळे नोकरीमध्ये बढती मिळण्याच्या संधी कमी झाल्याची भावना आहे. तसेच येथील मुलभूत सुविधांमध्येही महागाईचे चटके बसू लागले आहेत. त्यामुळे अनेक जोडपी मुलांना जन्म देणे टाळत आहेत. अशा जोडप्यांसाठीही चीनी सरकारनं आदेश काढले आहेत. लग्न झाल्यावर नऊ महिन्यात मुल जन्माला आले नाही तर अशा जोडप्यांना घरी बसावे लागणार आहे. लोकसंख्या वाढवण्यासाठी असे आदेश गरजेचे असल्याचे चीनी सरकारमधील काही मंत्र्यांचे म्हणणे आहे. सध्या चीनमध्ये मुलांसाठी लग्नाचे किमान वय 22 वर्षे आणि मुलींसाठी 21 वर्षे आहे. आता मुला-मुलींचे लग्नाचे वय 18 वर्षे करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याचीही माहिती आहे. एकूण एकीकडे जगावर राज्य करण्याचे स्वप्न बघणा-या चीन सरकारला स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी स्वतःच्याच देशात झगडावे लागत आहे. (China)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.