ज्याचं जसं कर्म त्याला तसं फळ असे म्हटले जाते. पण हे म्हणणे प्रत्यक्षात कसे येत असेल, हे पाहायचं असेल तर चीनकडे (China) बघा… चीनमधून कोविड महामाराचा जगभर प्रसार झाला होता. चीननं (China) त्यांच्या प्रयोगशाळेत कोविडचे विषाणू तयार केले होते. बायोबॉम्ब सारखा त्यांचा वापर करायचा होता. पण या प्रयोगशाळेत झालेल्या एका दुर्घटनेत हे विषाणू आधीच पसरले गेले आणि जगभर कोविडची महामारी आली. चीनवर (China) जागतिक आरोग्य संघटनेनंही कोविड बाबत योग्य माहिती देण्याची मागगी केली. पण या देशानं कोणालाही महत्त्व दिले नाही. कोविडची महामारी आपल्या देशामुळे पसरली आहे, या गोष्टीचा कायम विरोध केला. हे करताना चीननं कोविडसाठी अन्य देशांनाच जबाबदार धरले. चीनमध्ये (China) 2019 मध्ये वुहान या शहरातून कोविडचे रुग्ण यायला सुरुवात झाली. जानेवारी 2020 पासून कोविडच्या जागतिक प्रसाराला सुरुवात झाली. या घटनेला आता जवळपास तीन वर्ष झाली आहे. जगात झपाट्यानं पसरलेल्या या घातक महामारीला आटकाव घालण्यात यश आलं आहे. काही देशात कोविडच्या अगदी सातवी, आठवी लाटही आली. पण या सर्वांवर मात करत पुन्हा सर्व जग सुरळीत सुरु झालं आहे. कोविडच्या काळ्या आठवणी मागे सारून सर्व प्रांतात पुन्हा नव्या उमेदीनं कामांना सुरुवात झाली आहे. पण येथेच चीनचे कर्म त्याच्या आडवे आल्यासारखे झाले आहे. जगाला ज्या महाभयंकर अशा रोगाची देणगी या चीननं दिली. पण त्याचा चीनच्या सरकारनं कायम इन्कार केला आहे. आता सर्व जग सुरळीत सुरु असताना एकटा चीनच कोविडच्या विळख्यात पुन्हा पुन्हा पडत आहे. आताही चीनमध्ये (China) कोविडचे संकट गडद झाले असून येत्या काही महिन्यात वाढलेल्या कोविड रुग्णांमुळे मृत्यूदरही चीनमध्ये लाखाच्या आसपास जाईल अशी शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.

कोविड-19 या महामारीसाठी चीननं (China) कितीही नकार दिला तरी जगानं चीनलाच जबाबदार धरले आहे. या रोगावर मात करण्यासाठी चीननं अतिशय क्रूर पद्धतीचा वापर केला होता. आपल्याच नागरिकांना चीननं बंदीवासात ठेवलं होतं. तसेच ज्यांना कोविड झाला आहे, अशा नागरिकांना तर मरणयातना सहन कराव्या लागल्या आहेत. एवढ्या उपाययोजना करुनही चीनमधून (China) कोविडचे समूळ उच्चाटन करण्यात अपयश आले आहे. कारण याच चीनमध्ये आता नव्यानं कोविडची साथ सुरु झाली आहे. चीनमध्ये झिरो कोविड धोरण राबवण्यात आले होते. ते धोरण मागे घेतल्यानंतर कोविड प्रकरणांमध्ये वाढ दिसू लागली आहे. चीनमध्ये वाढलेले कोविडचे रुग्ण पाहता पुन्हा कोविड महामारी येण्याची शक्यता तज्ञ व्यक्त करीत आहेत. ही महामारी नव्यानं आली तर चीनमध्ये एका आठवड्यात 6.5 कोटी कोविड रुग्णांची संख्या होऊ शकते असाही अंदाज आहे. यामुळे चीनचे आरोग्य अधिकारी धास्तावले आहेत. या संभाव्य नवीन लाटेचा सामना करण्यासाठी चिनी अधिकारी कोविड लसींची मागणी करत आहेत. जूनमध्ये एका आठवड्यात 65 दशलक्ष कोविड रुग्ण पुढे येतील असा अहवाल चीनच्या आरोग्य समितीनं जाहीर केल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. कोविड विषाणूचे नवीन XBB प्रकार आढळल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. ही विषाणू अत्यंत झपाट्यानं पसरत असून पुन्हा चीन या कोविडच्या विळख्यात वेगानं जाण्याची चिन्ह आहेत.
आता या नव्यानं येणा-या कोविड विषाणूचा देशातील वृद्ध नागरिकांना धोका जास्त आहे. त्यामुळे कोविड लसीच्या बुस्टर लसीची मागणी होत आहे. तसेच बूस्टर लसीकरण वाढवण्यात येऊ लागले आहे. याशिवाय स्थानिक हॉस्पिटलमध्येही आत्तापासून विशेष व्यवस्था करण्यास सुरुवात झाली आहे. चीनमध्ये नव्यानं पसरत असलेल्या कोविड साथीबाबत हाँगकाँगच्या युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधील तज्ञांनीही सावधगिरी बाळगावी असा इशारा दिला आहे. त्यांच्या मते, यात मोठ्याप्रमाणता संक्रमण वाढण्याची शक्यता असून त्याचा नागरिकांचा आरोग्यावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो.
=========
हे देखील वाचा : मनाली लेह ट्रेकची तयारी सुरु करा…
=========
चीनमध्ये (China) एप्रिलच्या शेवटच्या दोन आठवड्यात कोविडच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली. ही वाढ मे महिन्यातही कायम आहे. कोविड विषाणूचा XBB प्रकार टाळण्यासाठी चीनने (China) अधिक प्रभावी लस तयार करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. कोविडची नवीन लाट चीनमध्ये कहर करू शकते, अशी भीती येथील तज्ञ झोंग नानशान यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या मतानुसार जून महिन्यात येणारी कोविडची नवीन लाट अत्यंत विनाशकारी ठरू शकते या महिन्यात कोविड विषाणूचा संसर्ग शिगेला पोहोचणार आहे. संपूर्ण जग कोविडच्या बंधनातून मुक्त होत असतांना त्याचा उगमदाता मात्र त्याच महामारीच्या पाशात अधिक गुंतत चालला आहे. यालाच कर्मा इज बॅक म्हणतात.
सई बने