Home » Fusarium graminearum : चीनकडून येतोय, कोरोनापेक्षा मोठा धोका !

Fusarium graminearum : चीनकडून येतोय, कोरोनापेक्षा मोठा धोका !

by Team Gajawaja
0 comment
Fusarium graminearum
Share

चीन या देशामध्ये पुन्हा अवघ्या जगाला एका महामारीमध्ये लोटण्याचे कारस्थान चालू आहे. यात चीन यशस्वी झाला, तर जगावर कोविड-19 पेक्षाही मोठे संकट येणार आहे. यामुळे जगभरातील अन्नधान्य साखळी संपुष्टात येणार असून अवघ्या जगावर दुष्काळाची छाया पसरणार आहे. हे टाळायचे असेल तर चीनवर बहिष्कार घालणे हाच एकमेव उपाय आहे. चीनसोबतच्या सर्व प्रकारच्या राजनैतिक, शैक्षणिक आणि तांत्रिक संबंध संपुष्टात आणणे गरजेचे असल्याचे मत अमेरिकेत स्थायिक झालेल्या एका चिनी संशोधकांनीच व्यक्त केले आहे. याशिवाय ही कारवाई लवकर केली नाही तर भविष्यात अमेरिकेसह जगभरात कोरोना आणि फेंटानिल संकटापेक्षाही अधिक धोकादायक रोग-विषाणूंचा फैलाव होण्याचा धोकाही त्यांनी व्यक्त केला आहे. (Fusarium graminearum) 

चायना इज गोइंग टू वॉर’ या पुस्तकाचे लेखक असलेल्या गॉर्डन जी. चांग यांनी हा गंभीर इशारा दिला आहे. गॉर्डन जी. चांग हे चिनी असले तरी ते सध्या अमेरिकेत रहात आहेत. अलिकडेच, अमेरिकेत फ्युझेरियम ग्रॅमिनेरम या विषारी बुरशीची तस्करी केल्याचा आरोप दोन चिनी नागरिकांवर करण्यात आला आहे. विज्ञानाच्या भाषेत या बुरशीला कृषी दहशतवाद असे नाव देण्यात आले आहे. ही बुरशी म्हणजे, अमेरिकेतील अन्नधान्य साखळी संपुष्टात आणणारा एक जैविक बॉम्ब असल्याचा गंभीर आरोप होत आहे. गॉर्डन जी. चांग यांनी या आरोपाची पुष्टी करत चीन आणखीही काही धोकादायक जैविक बॉम्ब तयार करत आहे. हे सर्व रोखण्यासाठी चीनवर सर्वार्थांने बहिष्कार घालणे हा एकच उपाय असल्याचे मत व्यक्त केले आहे. (International News) 

काही दिवसापूर्वींच अमेरिकेत युनकिंग जियान आणि जुन्योंग लिऊ या दोन चिनी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर अमेरिकेत फ्युसेरियम ग्रॅमिनेरम या अत्यंत विषारी बुरशीची बेकायदेशीरपणे तस्करी करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. त्यातील युनकिंग जियान ही तरुणी अमेरिकेतीलच एका विद्यापीठाच्या प्रयोगशाळेची मुख्य आहे. तिच्या माध्यमातून ही बुरशी अमेरिकेतील शेतपीकावर फैलावण्याचा हा कट असल्याचा संशय एफबीआयला आहे. यासंदर्भात एफबीआयही सतर्क असून चीनमधून येणा-या प्रत्येक सामानाची बारकाईनं तपासणी करण्यात येत आहे. ही बुरशी अमेरिकेच्या शेती आणि अन्न सुरक्षेसाठी एक गंभीर धोका मानली जाते. फ्युझेरियम ग्रॅमिनेरम नावाची ही बुरशी पिकांमध्ये फ्युझेरियम हेड ब्लाइट नावाचा रोग निर्माण करते. यात गहू, बार्ली आणि मका या पिकांवर अधिक परिणाम होतो. ही पिके अमेरिकेत सर्वाधिक घेतली जातात. (Fusarium graminearum) 

Fusarium graminearum

यामुळे या बुरशीच्या माध्यमातून अमेरिकेतील शेतपीकावर हल्ला करण्यात येणार होता. असे झाले असते तर, उत्पादनात घट झालीच असती, शिवाय, धान्याची गुणवत्ताही खराब झाली असती. अमेरिकन कृषी शास्त्रज्ञांच्या मते, ही शेती उद्यागाला मोठी हानी करणारी घटना असून हा एकप्रकारे कृषी दहशतवादच आहे. यामुळे अन्न पुरवठा साखळी, अर्थव्यवस्था आणि सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. या फ्युझेरियम ग्रॅमिनेरम बुरशीवर तज्ञ गॉर्डन जी. चांग यांनी अभ्यास करुन अमेरिकन प्रशासनाला त्वरित काळजी घ्यावी असे सांगितले आहे. शिवाय जगभरातही या फ्युझेरियम ग्रॅमिनेरमबाबत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. कारण एकदा एका देशात फ्युझेरियम ग्रॅमिनेरम या बुरशीचा फैलाव झाला, तर त्याला रोखणं कठीण होणार आहे. यामुळे ज्या देशांच्या सीमा शेतीनं जोडल्या गेल्या आहेत, त्या देशांमध्येही या बुरशीचा फैलाव होणार आहे. (International News) 

=========

हे देखील वाचा : China : चीनच्या आणखी एका जैविक शस्त्राची जगभर दहशत !

=========

या बुरशीमुळे पिकांची पाती पिवळी होऊन जातात आणि उत्पादनही अल्प येतं. जे उत्पादन येतं, त्यामधूनही घातक रोगांचा फैलाव होण्याची शक्यता असते. त्यामुळेच फ्युझेरियम ग्रॅमिनेरम बुरशी अमेरिकेत आणणं हा येथील पिकांवर जैविक हल्ला मानण्यात आला आहे. संशोधक चांग यांच्यानुसार या बुरशीचा हल्ला होईल तो देश आर्थिकदृष्ट्याच नव्हे तर राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या देखील कमकुवत होणार आहे. चांग यांनी ही बुरशी कोरोना विषाणूपेक्षाही धोकादायक असल्याचे सांगितले आहे. हे सर्व रोखण्यासाठी यापुढे चीनवर सर्वच देशांनी बहिष्कार घालावा, हा एकमात्र उपाय असल्याचे चांग यांचे मत आहे. चीनपासून सावध व्हा आणि त्याच्यावर बहिष्कार घाला, अशी थेट मागणी करणारे गॉर्डन जी. चांग हे वंशानी चिनीच असून असून गेली काही वर्ष ते अमेरिकेत स्थायिक आहेत. (Fusarium graminearum) 

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.