देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांना लहान मुलं ”चाचा” असे म्हणायचे. त्यांना लहान मुलं फार आवडायची आणि म्हणूनच त्यांना मुल ही चाचा अशी हाक मारायचे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त म्हणजेच १४ नोव्हेंबरला देशभरात बालदिन साजरा केला जातो. मात्र तुम्हाला माहिती आहे का, जगातील अन्य देशांमध्ये बालदिन म्हणजेच चिल्ड्र्न्स डे हा कधी साजरा केला जातो? तर त्याचबद्दल आपण आज अधिक जाणून घेऊयात. (Children’s Day)
भारतात १४ नोव्हेंबरला बालदिन साजरा केला जाते. मात्र भारत वगळून अन्य जगात प्रत्येक वर्षी २० नोव्हेंबरला बालदिन साजरा केला जातो. १९५९ पूर्वी ऑक्टोंबर महिन्यात बालदिन साजरा करण्यात येत असे. जिनेवाच्या इंटरनॅशनल युनियन फॉर चाइल्ड वेल्फेअर यांच्या मदतीने ऑक्टोंबर १९५३ मध्ये पहिल्यांदाच बालदिन साजरा केला गेला होता.
जगभरात बालदिन साजरा करण्याचा विचार वीके कृष्ण मेनन यांनी केला होता. ज्याला संयुक्त राष्ट्राच्या महासभेद्वारे १९५४ मध्ये मानला गेला. १९५९ मध्ये ज्या दिवशी संयुक्त राष्ट्र महासभेने मुलांच्या अधिकाऱ्यांच्या घोषणापत्राला मान्यता दिली होती त्याच दिवशी उपलक्ष्यमध्ये २० नोव्हेंबरची तारीख निवडली गेली होती. १९८९ मध्ये ही तारीख मुलांच्या अधिकाऱ्यांच्या रुपातील करारावर स्वाक्षरी करत तो १९१ देशांनी संयुक्त रुपात पारित केला. (Children’s Day)
हे देखील वाचा- आपल्या मुलाला रस्त्यावर झोपण्यासाठी एकटे सोडते आई, कारण ऐकून व्हाल हैराण
तर पंडित नेहरु मानत होते की, देशातील मुलं आरोग्यदायी, शिक्षित आणि चरित्रवान असतील आणि ज्या देशात त्यांचे शोषण होणार नाही तोच देश उन्नती करेल. तेथीस सर्व मुलं ही एकत्रित विकास आणि शिक्षणाप्रती जागृक करु पाहत होते. पंडित नेहरु असे मानत होते की, मुले ही राष्ट्राची भावी निर्माते असतात. त्यामुळे त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते. बालदिन साजरा करण्यामागी उद्देश हा की, मुलांच्या अधिकारांचे संरक्षण करणे आणि त्यांना मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देणे. त्याचसोबत योग्य शिक्षण, पोषण, संस्कार मिळावेत हे सुद्धा सुनिश्चित करणे.
बालदिनानिमित्त देशभरात लहान मुलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच मुलांचे तोंडभरुन खुप कौतुक ही केले जाते. शाळांमध्ये शिक्षकांकडून मुलांसाठी खास कार्यक्रम आयोजित करतात. त्यामध्ये विविध अॅक्टिव्हिटीचा समावेश करत बालदिनाचा आनंद साजरा केला जातो. तर पालकांकडून ही मुलांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी आज करु दिल्या जातात.