डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सत्ता हाती घेतल्यापासून अनेक कायदे बदलायला सुरुवात केली आहे. त्यामध्ये अमेरिकेत रहाणा-या परदेशातील नागरिकांवर जणू संक्रात आली आहे. कारण अमेरिकेत बेकायदेशीरपणे रहाणा-या नागरिकांना पकडून त्यांना त्यांच्या देशात सोडायला ट्रम्प प्रशासनानं सुरवात केली आहे. अशा नागरिकांची विमाने भारत, पाकिस्तान या देशात येत आहेत. आता अमेरिकेत कायदेशीररित्या राहणारे भारतीयही अडचणीत येण्यीची शक्यता आहे. कारण ट्रम्प 1,00,000 भारतीयांना भारतात पाठवण्याची तयारी करत असल्याची माहिती आहे. (America)
कारण आता अमेरिकेत ज्या भारतीय नागरिकांची मुले जन्माला आली आहेत, त्यांनाही अमेरिका सोडावी लागणार आहे. ट्रम्प सरकार अशा मुलांसाठी वेगळा कायदा आणण्याच्या विचारात असून अमेरिकेत जन्मलेल्या अन्य देशातील नागरिकांच्या मुलांना देश सोडावा लागणार आहे. आत्तापर्यंत अमेरिकेत जन्मलेल्या मुलाला अमेरिकन नागरिकत्व मिळते. जरी त्याचे पालक अमेरिकन नसले, तरी जन्माच्या आधारावर या मुलांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळत असे. त्या आधारावर या मुलांच्या पालकांना अमेरिकेचे नागरिकत्व बहाल कऱण्यात येत असे. त्यामुळे अमेरिकेत राहणारे स्थलांतरित त्यांच्या नातेवाईकांना अमेरिकेत आणत असल्याची ओरड होती. आता ट्रम्प यांनी ही सर्व नागरिकत्व पद्धतीच बदलण्याची तयारी सुरु केली आहे. यामुळे अमेरिकेत रहाणा-या भारतीयांसह अन्य देशातील नागरिकांमध्येही चिंता निर्माण झाली आहे. ट्रम्प सरकारच्या आदेशानुसार आता अमेरिकेत जन्मलेल्या मुलांना नागरिकत्व मिळणार नाही. यासंदर्भात डोनाल्ड ट्रम्प लवकरच एक घोषणा करणार आहेत. (International News)
यासंदर्भात माहिती मिळाल्यामुळे अमेरिकेत रहाणा-या अन्य देशांमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. असे झाल्यास या नागरिकांना त्यांच्या मुलांना मुळ देशात पाठवाले लागणार आहे. तसेच त्यांचे नागरिकत्वही पुन्हा मिळवावे लागणार आहे. शिवाय ट्रम्प सरकार यासंदर्भात कसा निर्णय घेणार आहेत, याबाबतही चिंता व्यक्त कऱण्यात येत आहे. ट्रम्प यांनी बेकायदेशीरपणे रहाणा-या नागरिकांना पकडून त्यांना ज्या पद्धतीनं त्वरित मुळ देशात परत पाठवले, तशीच पद्धत अमेरिकेत रहाणा-या नागरिकांच्या मुलांबाबत तर करणार नाहीत ना, अशी भीती आता व्यक्त होत आहे. यात अमेरिकेत रहाणा-या भारतीयांचाही समावेश आहे. ट्रम्प सरकारच्याच्या नवीन धोरणामुळे लाखो भारतीय अडचणीत सापडले आहेत. असा निर्णय झाल्यास एच-1बी व्हिसा धारकांच्या मुलांना मोठा धोका असणार आहे. (America)
या निर्णयाचा फटका 1.34 लाख भारतीय मुलांना बसण्याची शक्यता आहे. एकीकडे अमेरिकेतून बेकायदेशीर भारतीयांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु असतांना अमेरिकेतील भारतीयांना हा दुसरा धक्का बसणार आहे. अमेरिकेत काम करण्यासाठी व्हिसा आवश्यक असतो. या व्हिसा धारकांना हा फटका बसणार असल्यामुळे तेथील भारतीयांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. लाखो भारतीय एच-1बी व्हिसाचा आधार घेत कायदेशिररित्या अमेरिकेत प्रवेश करतात. ही मंडळी अमेरिकत स्थायिक होतांना आपले कुटुंबही अमेरिकेत आणतात. त्यातील अनेकांची मुले अमेरिकेतच जन्माला येतात. ही मुले अमेरिकेत जन्माला आल्यानं आपसूक अमेरिकेचे नागरिक होतात पर्यायानं या कुटुंबाचा अमेरिकेत रहाण्याचा मार्ग मोकळा होतो. आता ट्रम्प सरकार हाच नियम बदलत असून एच-1बी व्हिसा असलेल्या नागरिकांच्या मुलांना बहाल केलेले नागरिकत्व काढून घेण्याच्या निर्णयावर पोहचल्याची माहिती आहे. (International News)
===============
हे देखील वाचा : Sugarcane : सगळ्या रसवंती गृहांची नावं कानिफनाथच का असतात ?
==============
आता अमेरिकेत रहात असलेल्या भारतासह अन्य देशातील नागरिकांच्या मुलांना आणि अन्य नातेवाईकांना देश सोडण्याचे आदेश निघणार आहेत. अमेरिकेत अशा पद्धतीनं रहाणा-या लोकांची संख्या लाखात आहे. सरकारी आकडेवारीनुसार, मार्च 2023 पर्यंत, सुमारे 1.34 लाख भारतीय मुलांना त्यांच्या आश्रित व्हिसाची स्थिती संपण्यापूर्वी त्यांच्या कुटुंबांसाठी ग्रीन कार्ड मिळण्याची अपेक्षा होती. मात्र डोनाल्ड ट्रम्प सत्तेत येताच हे नियम बदलण्यात आले आहेत, आणि या मुलांचे नागरिकत्व रद्द होण्याची शक्यता आहे. डिफर्ड अॅक्शन फॉर चाइल्डहुड अरायव्हल्स अंतर्गत नवीन अर्जदारांना वर्क परमिट देण्यास अडथळा आणणारा निर्णय नुकताच देण्यात आला आहे. त्यामुळे भारतीयांनी या निर्णयावर चिंता व्यक्त केली आहे. अनेक भारतीयांनी आपल्या मुलांना शिक्षणासाठी अमेरिकेत ठेवण्याची काही तरतूद आहे का, याचीही शोधाशोध सुरु केली आहे. (America)
सई बने