Child Skin Care : हिवाळ्यात वातावरणातील आर्द्रता कमी होते, थंडीची कोरडी हवा त्वचेतील नैसर्गिक तेलाचा स्तर कमी करते आणि त्यामुळे लहान मुलांची त्वचा पटकन कोरडी, खडबडीत आणि फुटलेली दिसू शकते. विशेषतः गालांचा भाग सर्वात जास्त एक्स्पोज्ड असल्याने तिथे लालसरपणा, खवले येणे आणि वेदना जाणवू लागतात. मुलांची त्वचा प्रौढांच्या तुलनेत अधिक नाजूक असल्याने या बदलांचा परिणामही अधिक दिसतो. त्यामुळे त्वचा फुटल्यानंतर तातडीने योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
१) त्वचेची मॉइश्चर केअर सर्वात महत्त्वाची
लहान मुलांच्या फुटलेल्या गालांवर सर्वप्रथम मॉइश्चरायझेशन करणे गरजेचे आहे. कोकोनट ऑइल, शिया बटर, बेबी लोशन किंवा पेट्रोलियम जेली सारखे जाड टेक्स्चरचे मॉइश्चरायझर्स वापरल्यास त्वचेला प्रोटेक्टिव्ह लेयर मिळते आणि त्वचा लगेच ओलसर होते. गाल धुतल्यानंतर २–३ मिनिटांतच क्रीम लावल्याने ओलावा टिकून राहतो. दिवसभरात किमान २–३ वेळा मॉइश्चर लावणे मुलांच्या त्वचेच्या संरक्षणासाठी उपयुक्त असते. जर त्वचा जास्त फुटली असेल तर रात्री झोपण्यापूर्वी थोडे जाड लेयर लावावे.
२) फेस धुण्याची योग्य पद्धत
हिवाळ्यात मुलांचा चेहरा गरम पाण्याने धुणे टाळावे, कारण ते त्वचा अधिक कोरडी करते. त्याऐवजी कोमट किंवा साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ करावा. हार्श साबण, फेसवॉश किंवा सुगंधी प्रॉडक्ट्स वापरणे टाळावे, कारण त्यातील केमिकल्स त्वचा अधिक सेंसिटिव्ह करतात. बाहेर जाताना मुलांच्या गालांवर मॉइश्चरचा लेयर आणि चाईल्ड-सेफ सनस्क्रीन वापरले तर थंडीची झळ कमी बसते. वारा जास्त असेल तर मुलांचा चेहरा कापड, वूलन कॅप किंवा स्कार्फने झाकून ठेवणे फायदेशीर आहे.

Child Skin Care
३) घरातील वातावरण ओलसर ठेवा
हिवाळ्यात घरातील हवा साधारणपणे कोरडी होते. अशावेळी ह्युमिडिफायरचा वापर केल्यास त्वचेतील ओलावा टिकवण्यास मदत होते. घरात पाण्याने भरलेले भांडे ठेवले तरी हवेतील ओलावा वाढतो. मुलांच्या त्वचेवर कोरडेणे, खवले येणे किंवा गाल फुटणे कमी होते. झोपताना खोलीत पुरेसा ओलावा असल्यास रात्री त्वचा नीट रिपेअर होते, त्यामुळे सकाळी कोरडेपणा जाणवत नाही.
४) आहार आणि पाण्याचे प्रमाणही महत्वाचे
लहान मुलांच्या त्वचेचे आरोग्य फक्त बाहेरून लावलेल्या क्रीमवर अवलंबून नसते, तर त्यांच्या आहारातील पोषणावरही अवलंबून असते. थंडीत मुलांना गरम सूप, डाळीचे पाणी, दूध, सूप्स, तूप, बदाम-दूध, ओमेगा-३ युक्त पदार्थ (जसे की अक्रोड, फ्लॅक्ससीड) देणे फायदेशीर ठरते. दिवसातून थोड्या प्रमाणात पाणी देणे आवश्यक आहे कारण हिवाळ्यात मुलं कमी पाणी पितात आणि यामुळे डिहायड्रेशन होऊन त्वचा आणखी कोरडी पडते. योग्य पोषण मिळाल्यास त्वचा नैसर्गिकरीत्या मऊ आणि निरोगी राहते.(Chind Skin Care)
========
हे देखील वाचा :
Migraine : हिवाळ्यात वाढतो का माइग्रेनचा धोका? तज्ज्ञांनी दिले महत्त्वाचे मार्गदर्शन
Thyroid : जगभरात वाढत आहेत थायरॉईड कॅन्सरचे रुग्ण, यावर उपचार शक्य आहेत?
Pedicure : घरीच करा डीप क्लीनिंग! पेडिक्योरसारखा रिजल्ट मिळवण्यासाठी सोपी होम केअर टिप्स
==========
५) कधी डॉक्टरांकडे जावे?
जर गालावर जास्त लालसरपणा, सूज, वेदना, पाणी येणे, जखमा होणे किंवा काही दिवस उपाय करूनही फरक न पडल्यास त्वचारोगतज्ञांचा सल्ला घ्यावा. काही वेळा ‘इक्झिमा’, ‘अॅलर्जी’ किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळेही त्वचा फुटू शकते. त्यामुळे घरगुती उपायांनी आराम न मिळाल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेणे सर्वात सुरक्षित.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
