आजकाल प्रत्येकजण हा सोशल मीडियात अॅक्टिव असतो. आयुष्यात काहीही सुरु असले तरीही त्या संबंधित काही गोष्टी इंस्टाग्राम, फेसबुक सारख्या प्लॅटफॉर्मवर शेअर करतो. अशातच सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपली मुलं, ही सुद्धा आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग असतात. त्यांचा हट्टीपणा, निरागसपणा आपल्याला एक वेगळाच आनंद देतो. असे क्षण नेहमीच लक्षात रहावे म्हणून बहुतांश जण ते आपल्या कॅमेऱ्यात कैद करतात आणि सोशल मीडियात पोस्ट करतात. असा कंटेट युजर्सला पहायला फार आवडतो. मात्र मुलांचे फोटो-व्हिडिओ ऑनलाईन शेअर करणे खरच सुरक्षित आहे का? (Child photo video)
बालपण अशी स्थिती हे जेव्हा मुलं शारिरीक आणि मानसिकरित्या वाढत असतात. त्यांच्यामध्ये कालांतराने काही गोष्टी समजून घेण्याची आणि स्वत:शी कनेक्ट होण्याची एक समज निर्माण होत असते. अशातच त्यांचे फोटो-व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट करणे म्हणजे त्यांच्या प्रायव्हेसीला धोका पोहचवण्यासारखे आहेच. त्याचसोबत याचा मुलांच्या वागणूकीवर सुद्धा परिणाम होतो. मुलांसंदर्भातील चुकीचा कंटेट पोस्ट करणे इंटरनेटच्या जगात धोकादायक ठरू शकते.
अशातच तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांचे फोटो-व्हिडिओ सोशल मीडियात अपलोड करत असाल तर काही गोष्टींची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. त्यांचे फोटो शेअर केल्याने त्यांच्या भविष्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो हे पालकांनी लक्षात घेतले पाहिजे.
-मुलांचे भविष्य
इंटरनेटवर काहीही पोस्ट केल्यानंतर हे हटवणे फार मुश्किल असते. ऑनलाईन शेअर करण्यात आलेल्या गोष्टींचा लोक स्क्रिनशॉट काढतात. मुलांचे कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ शेअर करताना याचा जरुर विचार करा की, जेव्हा तुमचे मुलं मोठे होईल तेव्हा या फोटो-व्हिडिओमुळे त्याच्यावर काय परिणाम होईल. तसेच याचा नकारात्मक परिणाम तर त्याच्या भविष्यावर होणार नाही ना हे सुद्धा लक्षात घ्या. (Child photo video)
-इंटरनेटवर चुकीच्या ठिकाणी व्हायरल होणे
तुमच्या मुलाची ऑनलाईन किडनॅपिंग होऊ शकते. हे खऱ्या स्वरुपातील अपहरणासारखे नाही. तर यामध्ये तुमच्या मुलाचा फोटो किंवा व्हिडिओ एखाद्या दुसऱ्या मुलाची ओळख म्हणून वापरला जाऊ शकतो. काही वेळेस असे होते की, काही लोक ऑनलाईनवरील एखाद्या मुलाला आपले मुलं असल्याचा सुद्धा दावा करतात.
-साइबर बुलिंग
मुलांचे फोटो शेअर करण्याचा हा एक मोठा धोका हे. साइबर बुलिंगचा मुलं थेट सामना करतात. यामुळे याचा फार मोठा परिणाम होतो. फोटो किंवा व्हिडिओ पाहून मुलाला चिडवले जाऊ शकते. ऑनलाईन वाईट कमेंट्स केल्या जाऊ शकतात. त्यामुळे मुलांना अशा काही गोष्टींपासून दूर ठेवले पाहिजे.
हेही वाचा- Helicopter पेरेंटिंग म्हणजे नक्की काय?
-अश्लील कंटेट/पीडोफाइल
सोशल मीडियात शेअर केलेल्या फोटोंचा चुकीच्या पद्धतीने वापर करु शकतात. याचा वापर पीडोफाइल म्हणजेच चाइल्ड पोर्नोग्राफीसाठी केला जाऊ शकतो. अशातच पालकांनी आपल्या मुलांचा फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट करताना काळजी घ्या. त्यासोबत जर फोटो मॉर्फ केला गेला तर तुमच्या मुलाचे भविष्य धोक्यात येऊ शकते.