आजकाल लोक आपल्या लहानसहान गोष्टी सुद्धा सोशल मीडियात पोस्ट करताना दिसतात. त्यांचे फोटो असो किंवा व्हिडिओ त्यामधून ते किती आनंदीत आहेत अथवा त्यांच्या मनातील ते भावना व्यक्त करत राहतात. असे व्हिडिओ बहुतांश लोक पाहतात आणि त्याखाली कमेंट्स ही करतात. पण अलीकडल्या काळात लहान मुलांचे फोटो सुद्धा सोशल मीडियात सर्रास टाकले जातात. मुलं लहान असताना तो काय करतो, त्याची काळजी कशी घेतली जातेय अथवा त्याच्या संबंधित ही लहान-लहान गोष्टी सोशल मीडियात सध्या पालक पोस्ट करत राहतात. पण असे करणे खरंतर चुकीचे आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या आणि मुलाच्या प्रायव्हसीची काळजी राहत नाही. हेच कारण आहे की, फ्रांन्स सरकारने आता या मुद्द्यावरुन एका मोठ्या निर्णयाची घोषणा केली आहे.(Child photos on social media)
येथे राहणाऱ्या पालकांना आपल्या लहान मुलांचे फोटो सोशल मीडियात पोस्ट करता येणार नाहीत. या संदर्भातील कायद्याला फ्रेंच नॅशनल असेंबलीने मंजूरी दिली आहे. त्यामुळे जर असे केल्यास तर पालकांना कायदेशीर शिक्षा होणार असे स्पष्ट करण्यात आले आहे.
रिपोर्ट्सनुसार, या प्रस्तावाला फ्रेंच खासदार ब्रुनो स्टुडर यांनी मांडले. त्यांचे असे म्हणणे होते की, कायद्याच्या माध्यमातून पालकांना सशक्त बनवले जाईल आणि मुलांना त्यांचे अधिकार कळावेत यासाठी प्रयत्न केले जातील. जेणेकरुन त्यांन कळेल की, त्यांच्या फोटोंसाठी केवळ पालकच जबाबदार आहेत. त्यांचे असे म्हणणे होते की, अल्पवयीन मुलांचे ऐवढे फोटो शेअर केले जातात की त्याचा दुरउपयोग चुकीच्या प्लॅटफॉर्मवर केला जातो. तर शाळेतील फोटोंमुळे त्यांची छेड काढली जाऊ शकते.
नव्या कायद्यानुसार कोर्टाला हा अधिकार असणार आहे की, ते आई-वडिलांना आपल्या मुलाचे फोटो सोशल मीडियात पोस्ट करण्यासाठी बंदी घालू शकतात. मुलांच्या अधिकारांसाठी आई-वडिलच जबाबदार असतील. जर फोटो सोशल मीडियात पोस्ट केल्यास तर सर्वात प्रथम मुलाच्या वयानुसार त्याची परवानगी घ्यावी. मात्र हे नियम मोडल्यास पालकांना कायदेशीर शिक्षा केली जाईल. ऐवढेच नव्हे तर जर मुलाच्या व्यक्तिमत्वाला अथवा नैतिक रुपावर कोणताही गंभीर प्रभाव पडल्यास तर पालक कधीच आपल्या मुलाच्या फोटोचा वापर करु शकणार नाहीत.(Child photos on social media)
हे देखील वाचा- मुलीशी चुकूनही करु नका ‘या’ गोष्टी अन्यथा नात्यात फूट पडू शकते
दरम्यान, मनोवैज्ञानिक आणि सोशल मीडिया तज्ञांच्या मते कमी वयातील मुलांची काळजी घेणे फार गरजेचे असते. अशातच मुलांचे फोटो सोशल मीडियात पोस्ट करुन तुम्ही त्याचे व्यक्तिमत्व तर बिघडवता आणि त्याच्या सुरक्षिततेकडे ही दुर्लक्ष करता. काही वेळेस चुकीच्या कारणांसाठी ही मुलांचे फोटो चोरी केले जातात. प्रस्ताव मांडण्यासह ब्रुनो स्टडर यांनी या गोष्टीवर ही लक्ष दिले आहे की, सोशल मीडियात लहान मुलांचे फोटो टाकल्याने ५० टक्के फोटो बाल लैंगिक शोषणाच्या प्लॅटफॉर्मवर वापरले जातात.