सध्याच्या काळात मोबाईल फोनचा वापर हा सर्वांच्या आयुष्यातील एक महत्वाचा हिस्सा झाला आहे. अशातच याचा सर्वाधिक परिणाम मुलांवर होतो. बहुतांश मुल खुप वेळ मोबाईलवर वेळ घालवताना दिसतात. अभ्यास करताना असो किंवा गेम खळणे असो त्यांचा पूर्णपणे हा मोबाईलवरच जातो. यामुळे काही पालक जबरदस्तीने त्यांच्याकडून मोबाईल काढून घेतात. याचा मुलांना राग येतो आणि ते रडू लागतात. पण असे करणे मुलाच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. त्यामुळे मुलाची मोबाईल सातत्याने वापरण्याची सवय दूर करण्यासाठी पुढील काही टीप्स जरुर फॉलो करा. (Child Mobile Addiction)
-मुलांच्या समोर कमी फोनचा वापर करा
आपल्या सर्वांना माहितीच आहे की, लहान मुलं मोठ्यांकडे पाहून काही गोष्टी शिकतात. अशातच जर तुम्ही तुमच्या मुलासमोर अधिक वेळ फोन चालवत बसलात तर ते सुद्धा तसेच करु लागतील.
-मुलांवर थोडं रागवा
काही पालक आपल्या मुलांवर ऐवढे प्रेम करतात की त्यांचे मन दुखावेल असे काहीही करत नाहीत. त्यामुळे मुलं हट्टी होतात. अशातच जर तुम्ही मुलाकडून मोबाईल अचानक काढून घेतल्यास तर त्यांना ते सहन होणार नाही. त्यामुळे नेहमीच गोष्टी प्रेमाने सांगण्याऐवजी त्यांच्यावर रागवा सुद्धा. जेणेकरुन त्यांच्या मनात तुमच्या बद्दल थोडी भीती सुद्धा निर्माण होईल.
-विनाकारणास्तव फोन देऊ नका
आजची मुलं ऐवढी स्मार्ट झाली आहेत की, ते जरी रडले तरी पालक त्यांच्या हातात लगेच मोबाईल देतात. याच गोष्टीमुळे मुलांना अधिक मोबाईलची सवय लागते. त्यामुळे पालकांनी नेहमीच लक्षात ठेवावे की, त्यांना विनाकारणास्तव फोनचा वापर करण्यास देऊ नये.
-मुलांना दुसऱ्या कामात व्यस्त ठेवा
जर तुम्हाला तुमच्या मुलाची फोन वापरण्याची सवय दूर करायची असेल तर प्रयत्न करा की, मुलाला एखाद्या दुसऱ्या कामात व्यस्त ठेवा. त्यांना आवडणाऱ्या दुसऱ्या गोष्टी करण्यास सांगा. त्यांना अधिक क्रिएटिव्ह आणि फिजिकल अॅक्टिव्हिटीमध्ये व्यस्त ठेवा. जेणेकरुन त्यांचे फोनवरुन दुर्लक्ष होईल.(Child Mobile Addiction)
हे देखील वाचा- मुलीशी चुकूनही करु नका ‘या’ गोष्टी अन्यथा नात्यात फूट पडू शकते
पालकांनी या चुका करु नका
-बहुतांश वेळा असे पाहिले जाते की, पालक आपल्या मुलाला सांगतात की, लवकर अभ्यास केलास तर तुला मोबाईल देईन. यामुळे मुलाचे सर्व लक्ष मोबाईलकडे लागून राहते. अशातच तो अभ्यासाकडे कमी लक्ष आणि मोबाईल मिळेल म्हणून अभ्यास कसातरी पूर्ण करण्याच्या मागे लागतो. असे करताना अभ्यासात चुक झाली आणि पालकांनी मोबाईल दिला नाही तर त्याला राग येतो.
-मुलाची मोबाईल वापरण्याची सवय सोडवण्यासाठी कधीच त्याला मारहाण करु नका. यामुळे तो मोबाईल सोडणार नाहीच पण तुमच्यासाठी त्याच्या मनात नकारात्मक भावना निर्माण होतील. अशा स्थितीत तुम्ही त्याच्याशी प्रेमाने बोला. त्याला मोबाईलमुळे होणाऱ्या नुकसानीबद्दल ही सांगा.