नैराश्य येणे हे फक्त तरुण किंवा वृद्धांमध्येच नव्हे तर काही वेळेस लहान मुलांना सुद्धा येऊ शकते. परंतु लहान मुलांमध्ये ते ओळखणे फार मुश्किल असते. कारण ना ते स्वत: आपल्याला असे का होत आहे हे ओळखू शकत नाहीत ना त्याच्याबद्दल त्यांना काही माहिती नसते. अशातच पालकांची जबाबदारी असते की, त्यांच्या या गोष्टीची काळजी घ्यावी. जेणेकरुन मुलाच्या मानसिक आरोग्यसह मानसिक रुपात ते ठीक आहेत की नाही हे कळणे तुम्हाला सोप्पे होईल. (Child mental health)
अशातच नेहमीच पालकांच्या मनात असा प्रश्न उपस्थितीत होतो की, अखेर आपल्या मुलाच्या मानसिक अवस्थेची कशी आणि कशा प्रकारे ते ओळखायचे. तर हेल्थशॉट्सच्या माहितीनुसार आम्ही तुम्हाला काही टीप्स सांगणार आहोत ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचे मुलं एखाद्या मानसिक तणावाखाली तर नाही ना हे कळू शकेल.
या लक्षणांवर लक्ष द्या
सामान्य रुपात मुलं आपल्या मनात काय सुरु आहे सांगण्यास घाबरतात. खासकरुन जर ती त्यांच्या मानसिक आरोग्यासंबंधित असेल. मात्र तुमचे मुल सांगत नसेल तरीही काही लक्षणांच्या माध्यमातून तुम्ही हे ओळखू शकता. जेणेकरुन तुम्हाला ते कोणत्या स्थितीतून जात आहे हे समजेल.

-तुमच्या मुलाचे एकटे रहाणे
जर तुमचे मुल दुसऱ्या मुलांपासून वेगळे राहणे पसंद करत असेल, किंवा खोलीत स्वत:ला एकटे ठेवण्याचा प्रयत्न करत असेल तर ही समस्या असू शकते. अशा स्थितीत त्यांच्याशी बोलण्यासह वेळ घालवण्याचा प्रयत्न करावा. मुलामध्ये आणि तुमच्यामध्ये एक मैत्रीचे नाते निर्माण करा.
-एंग्जाइटी
जर मुलात एंग्जाइटीची समस्या येत असेल तर ही चिंतेची बाब आहे. जर तुमचे मुल लहान लहान गोष्टीवरुन चिंतेत असेल आणि तणावाखाली असेल तर समजून जा तो आपल्या भावना समजण्यासाठी असमर्थ आहे. तो सातत्याने त्याच्याशी लढत आहे.
-चिडचिड होणे
अधिकाधिक चिडचिड होणे किंवा रागावर नियंत्रण नसणे, हा एक अलर्ट आहे. जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या मुलाला अधिकच राग येतोय तर त्याच्यावर ओरडण्याऐवजी शांतपणाने त्याच्याशी बोला. त्याच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. (Child mental health)
एकाग्रतेत कमतरता
जर तुमच्या मुलाचे कामात मन लागत नसेल, तो वारंवार आपल्याच धुंदीत असेल किंवा त्याचे लक्ष एका ठिकाणी केंद्रित होत नसेल तर ही स्थिती मानसिक आरोग्याशी संबंधित आहे. अशा स्थितीत मुलांची दुसऱ्या मुलांशी तुलना करु नका.
हे देखील वाचा- रात्रभर तुमचे मुलं झोपत नाही? ‘हे’ उपाय वापरुन पहा
-मूड स्विंग
मुलांमध्ये वारंवार व्यक्तिगत बदल, नैराश्य किंवा तणाव यामुळे ते एखाद्या स्थितीशी लढत असल्याचे दर्शवते. जर तुम्ही मुलाच्या वागण्यात खुप वेगळेपण पाहत असाल तर वेळीच लक्ष द्या. त्यांच्या खाण्यापिण्यावर, झोपणे किंवा बोलण्याच्या सवयीवर सातत्याने लक्ष ठेवा.