दिवाळीच्या वेळी वायुप्रदुषण होण्याची शक्यता असते. अशातच याचा परिणाम वृद्धांसह नवजात मुलांवर सुद्धा होऊ शकतो. डब्लूएचओच्या एका रिपोर्ट्सनुसार, जगभरात जवळजवळ ९० टक्क्यांहून अधिक मुलं प्रदुषित हवेत श्वास घेत असून याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. यामध्ये नवजात मुलं ते १५ वर्षापर्यंतच्या मुलांचा समावेश आहे. प्रदुषणामुळे काही मुलांच्या मानसिक आणि शारिरीक विकासावर प्रभाव पडतो. तर डब्लूएचओच्या मते २०१६ मध्ये जगभरात प्रदुषित हवेमुळे एक्यूट लोअर रेस्पिरेटरी इंफेक्शनच्या कारणास्तव ६ लाख मुलांचा मृत्यू झाला आहे. (Child Health Care)
यावरुन असे कळते की, जेव्हा गर्भवती महिला प्रदुषित हवेच्या संपर्कात येते तेव्हा मुलं जन्माला व्यवस्थितीत येईल का अशी भीती वाटत राहतो. याच कारणास्तव मुल अधिक लहान आणि कमी वजनाचे जन्माला येतात. काही मुलांना लहानपणासूनच अस्थमा आणि कॅन्सर सारखे आजार होतात. जर गर्भवती असताना महिलेने किंवा बाळ झाल्यानंतर त्याची योग्य काळजी घेतल्यास अशा समस्यांपासून दूर राहता येऊ शकते.
दिवाळीत कशा पद्धतीने घ्याल लहान मुलांची काळजी
नवजात मुलांचा प्रदुषणापासून बचाव करण्यासाठी जर महिला गर्भवती असेल तर तिने काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. या अवस्थेतत तिने अधिक बाहेर जाऊ नये आणि आपल्या सोबत मास्क जरुर ठेवावा. धुम्रपान करणाऱ्यांपासून दूर रहावे.
लहान मुलांना ठेवा हायड्रेट
नवजात मुलांना हायड्रेट ठेवणे अत्यंत गरजेचे असते. नवजात मुलं ही पाण्याचे सेवन स्वत:हून करु शकत नाहीत. अशातच पालकांनी त्याला दर दोन तासांनी पाणी द्यावे, जेव्हा मुलाचे ओठ हे सुखल्यासारखे वाटतील तेव्हा ओठांवर पाणी किंवा क्रिम लावावी. मोठ्या मुलांनी दिवसभरात ६-७ ग्लास पाणी प्यावे.
हे देखील वाचा- तुम्ही कुटुंबासोबत एकत्र जेवता का ? जाणुन घ्या फायदे
रोगप्रतिकारक शक्तीत सुधारणा करा
नवजात बालकं ही पूर्णपणे आपल्या आईवर अवलंबून असता. जर आईच हेल्थी असेल तर मुलाला सुद्धा आवश्यक पोषक तत्व मिळतात. प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी आईला आपल्या रोगप्रतिकारक शक्तीत सुधारणा करावी लागते. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठी आईला हेल्थी डाएट आणि व्यायामावर लक्ष केंद्रीत करावे लागेल. त्याचसोबत प्रदूषणापासून दूर रहावे लागेल. (Child Health Care)
पौष्टिक आहार घ्या
ज्या लोकांचे शरिर कमजोर आणि आधीपासूनच आजारपण असेल त्यांच्यावर प्रदुषणाचा परिणाम अधिक होतो. प्रदुषणापासून बचाव करण्यासाठी अशा लोकांनी पौष्टिक आहार घ्यावा. खाण्यात मिनिरल्स, फॅट, कार्ब्स आणि प्रोटीनचा समावेश करावा. तसेच अधिक गोड आणि तेलकट पदार्थांचा खाण्यात समावेश करु नये.