Child Health Care : आजकाल तरुणांसह लहान मुलं देखील एनर्जी ड्रिंक्सचे सेवन करतात. खासकरुन क्रिडा क्षेत्रातील मुलं स्पोर्ट्स अथवा एनर्जी ड्रिंक पितात. पालकांना वाटते की, एनर्डी ड्रिंकमध्ये कॅलरीज कमी असल्याने मुलांच्या शरिराला लगेच एनर्जी मिळू शकते. पण ही बाब अत्यंत चुकीची आहे. कारण साखर आणि कॅफेनयुक्त स्पोर्ट्स अथवा एनर्जी ड्रिंक तुमच्या मुलांचे आरोग्य बिघडवू शकतात. दीर्घकाळापासून एनर्जी ड्रिंकचे सेवन केल्याने मुलांमध्ये लठ्ठपणाच नव्हे मेंदू, हृदय, किडनी आणि थायरॉइल ग्रंथीवर परिणाम झाल्याच्या मोठ्या समस्या उद्भवल्या जातात.
कॅल्शिअमची कमतरता
मुलांमध्ये शारिरीक विकास खासकरुन हाडांच्या बळकटीसाठी कॅल्शिअमची गरज असते. अशातच एनर्जी ड्रिंकचे सेवन केल्याने शरिरात कॅल्शिअमची कमतरता निर्माण होऊ शकते. एनर्जी ड्रिंक तयार करण्यासाठी फास्फोरिक अॅसिड आणि कार्बन डाय ऑक्ससाइड गॅसचा वापर केला जातो. फॉस्फोरिक अॅसिडममुळे शरिरातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी होते. यामुळे मुलांचे दात आणि हाडं कमजोर होऊ लागतात.
अनिद्रा आणि तणावाची समस्या
दीर्घकाळापासून एनर्जी ड्रिंकचे सेवन केल्याने मुलांना गरजेपेक्षा अधिक कॅलरीज मिळतात. यामुळे झोपेत अडथळा निर्माण होऊ शकतो. याशिवाय मुलांमध्ये चिंता आणि एंग्जायटीची समस्याही निर्माण होऊ शकते. कॅफेन शरिरात कॉर्टिसोल हार्मोनचा स्तर वाढण्यास मदत करते. यामुळे मुलांना लक्ष केंद्रित करण्यासही समस्या उद्भवू शकते.
लठ्ठपणा वाढला जातो
एनर्जी ड्रिंकममध्ये फ्रुक्टोज कॉर्न सिरप मिक्स केले जाते. यामुळेच एनर्जी ड्रिंकमध्ये साखरेचे प्रमाण गरजेपेक्षा अधिक असते. अशातच मुलांमध्ये लठ्ठपणा वाढू शकतो आणि पुढे जाऊन टाइप-2 मधुमेहाची लक्षणे दिसून येऊ शकतात.
बीपीची समस्या
एनर्जी ड्रिंकच्या सेवनाने हाय बीपीच समस्या उद्भवू शकते. याशिवाय एनर्जी ड्रिंक मुलांमध्ये डिहाइड्रेशन, बैचेनी आणि भूक कमी लागणे अशा समस्या निर्माण करू शकते. (Child Health Care)
दातात कॅव्हिटी
एनर्जी ड्रिंकचे अत्याधिक सेवन केल्याने मुलांना दातात कॅव्हिटी होण्याची शक्यता वाढली जाते. साखरेचे प्रमाण एनर्जी ड्रिंकमध्ये अधिक असल्याने दातांना आतमधून नुकसान पोहोचले जाऊ शकते. एनर्जी ड्रिंक प्यायल्यानंतर दात स्वच्छ घासा.