Child Care Tips : आजकालच्या मुलांना सातत्याने फोन वापरण्याची सवय लागली आहे. अशातच मुलांची मोबाइलची इच्छा पूर्ण करण्यासाठी काही पालक मुलांना नवा मोबाइलही खरेदी करून देतात. पण तुम्हाला माहितेय का, मुलाच्या सततच्या मोबाइलच्या वापरामुळे त्याच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो?
दीर्घकाळ स्क्रिनसमोर बसल्याने होऊ शकते समस्या
जगभरातील अनेक रिसर्च सांगतात की, दीर्घकाळ स्क्रिनसमोर बसल्याने मुलांच्या मेंदूवर परिणाम होऊ शकतो. रिपोर्ट्सनुसार, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि टीव्ही पाहण्याच्या सवयीमुळे मुलांचे भवितव्यही धोक्यात येऊ शकते. याच कारणास्तव मुलांमध्ये वर्च्युअल ऑटिज्मचा धोका अधिक वाढला जातो.
वर्च्युअल ऑटिज्म
वर्च्युअल ऑटिज्म चार ते पाच वर्षामधील मुलांमध्ये दिसून येतो. बहुतांश मोबाइल फोन, टीव्ही आणि कंप्युटरच्या अधिक वापरामुळे वर्च्युअल ऑटिज्मची समस्या निर्माण होऊ शकते. स्मार्टफोनच्या सततच्या वापरामुळेही मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. दुसऱ्या व्यक्तींसोबत संवाद साधणे, फिरणे अशा गोष्टी करताना मुलाला त्रास होऊ शकतो.
एक ते तीन वर्षांमधील मुलांमध्ये वर्च्युअल ऑटिज्मचा धोका अधिक असतो. काही वेळेस आई-वडिलांना वाटते की, फोनमुळे मुलं बोलायचा शिकली आहेत. पण हे अत्यंत चुकीचे आणि मुलांच्या भवितव्यासाठी नुकसानदायक ठरू शकते.
मुलांना वर्च्युअल ऑटिज्मपासून दूर ठेवणे महत्वाचे
मुलांवर फोनचा फार मोठा प्रभाव सातत्याने पडत असतो. यामुळे काही मुलांना बोलण्याचीही समस्या उद्भवू शकते. मुलं गॅजेट्सवर अत्याधिक वेळ घालवत असल्याने नात्यांना फारसे महत्त्व देत नाही. याशिवाय अशी मुलं हट्टी आणि रागीट स्वभावाची देखील होऊ शकतात. यामुळे मुलांना फोन देण्यापूर्वी पालकांनी देखील त्याच्या आरोग्यासह भवितव्याचा विचार करावा. (Child Care Tips)
आजकालचे पालकही स्मार्टफोनवर व्यस्त अतात
डॉक्टर्स असे मानतात की, मुलांमधील फोन आणि टीव्ही पाहण्याची सवय सोडण्यासाठी पालकांनी याची सुरुवात स्वत:पासून करावी. मुलांसोबत वेळ घालवावा. जेणेकरुन मुलं गॅजेट्स आणि मोबाइल फोनपासून दूर राहतील. असे केल्याने तुम्हाला मुलांमध्ये सकारात्मक बदल झालेलेही दिसतील.