Home » विमानाच्या इंजिनवर ‘या’ कारणास्तव फेकल्या जातात कोंबड्या

विमानाच्या इंजिनवर ‘या’ कारणास्तव फेकल्या जातात कोंबड्या

विमानाच्या इंजिवर कोंबड्या फेकल्या जातात. हे फार कमी लोकांना माहिती असेल. ऐकून थोडं विचित्र वाटेल पण असं खरोखर केले जाते.

by Team Gajawaja
0 comment
Chiken Gun
Share

तुम्ही विमानाने कधी ना कधी प्रवास केलाच असेल. आतमधून तुम्ही इकोनॉमी क्लास, बिझनेस क्लास अथवा फर्स्ट क्लास ही पाहिला असेल. त्याचसोबत विमानात तुम्हाला दिली जाणारी सेवा ही उत्तमच असावी. त्यात तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था ते अन्य मदत ही तुम्हाला केली जाते. मात्र तुम्हाला विमानामधील काही गुपित गोष्टी माहितेयत का? (Chiken Gun)

खरंतर विमानाच्या इंजिवर कोंबड्या फेकल्या जातात. हे फार कमी लोकांना माहिती असेल. ऐकून थोडं विचित्र वाटेल पण असं खरोखर केले जायचे. काही कारणास्त असे केले जायचे. यामागील नेमके कारण काय हे आपण जाणून घेऊयात.

फ्लाइटचे इंजिन टेस्ट करण्यासाठी असे केले जाते. काही वेळेस तुम्ही ऐकले असेल की, पक्षी फ्लाइ विंगला धडकतात. यामुळे हजारो लोकांच्या जीवाला धोका उद्भवतो. अशातच विमानाला जर एखादा पक्षी धडकला तर त्याचा परिणाम कितपत होतो हे पाहण्यासाठी इंजिनवर कोंबड्या फेकल्या जातात. या दरम्यान चिकन गनच्या माध्यमातून कोंबडे ही फेकले जातात.अशा प्रकारे लोकंच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाते.

ही चाचणी दुर्घटनेपासून दूर राहण्यासाठी केली जाते. एका पक्षाच्या कारणास्तव फ्लाइटमधअये बसलेल्या प्रवाशाचा जीव धोक्यात येऊ शकतो. कंपनी सिमुलेटरचा वापर करुन निर्णय घेते की, पक्षाची धडक बसल्यानंतर इंजिनम काम करणे बंद होते की नाही.

Chicken gun - Wikipedia

या सर्व प्रोसेससाठी २-४ किलो कोंबड्यांचा वापर केला जातो. ही चाचणी आजच नव्हे तर काही वर्षांपासून केली जाते. याच्या माध्यमातून असे सुद्धा पाहिले जाते की, इंजिनला आग तर लागत नाही.

एविएशन एक्सपर्ट्सच्या मते, जेव्हा विमान हवेच्या दिशेने जात असते किंवा लँन्ड करून येत असते तेव्हा नेहमची भीती या गोष्टीची असते की, एखाद्या पक्षाची धडक बसू नये. जेणेकरुन विमानाचे नुकसान होईल. यामुळे विमान निर्मात्या कंपन्या कोंबड्या फेकून ही टेस्ट करतात. या प्रक्रियेला ‘बर्ड कॅनन’असे म्हटले जाते. काही वेळेस बनावट पक्ष्यांचा सुद्धा वापर केलाजातो. अथवा मृत कोंबड्यांचा वापर केला जातो. जेणेकरुन पक्षी धडकला तरीही विमानाचे इंजिन काम करणे बंद करणार नाही. (Chiken Gun)

दरम्यान, सर्वात प्रथम ही चाचणी १९५० च्या दशकात हर्टफोर्डशायरच्या डे हॅविलँन्ड एअरक्राफ्टसाठी करण्यात आली होती. या प्रक्रियेसाठी मृत कोंबड्यांचा वापर करण्यात आला होता. तेव्हा पाहिले गेले होते की, आह तर लागत नाही. त्यावेळी चाचणीसाठी एक कोंबडी इंजिनमध्ये टाकली गेली होती. चाचणी यशस्वी झाली आणि ती कोंबडी कोणत्याही जखमेशिवाय बाहेर आली होती. या चाचणीनंतर असे तथ्य पसरले गेले की, विमान चाचणीसाठी कोंबड्यांचा वापर केला पाहिजे. मात्र आजकाल असे होत असेलच असे नाही. कारण इंजिनची चाचणी करण्यासाठी सध्या नव्या टेक्नॉलिजीची मदत घेतली जाते.


हेही वाचा- ‘या’ चंबळ खोऱ्याच्या ठिकाणी पाहता येणार 80 डॉल्फिन


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.