Home » Shiv Jayanti : छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्यांची नावे माहित आहे का?

Shiv Jayanti : छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्यांची नावे माहित आहे का?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Shiv Jayanti
Share

ज्यांच्या केवळ विचारानेच अभिमानाने छाती फुलते, ज्यांच्या नावाने चेहऱ्यावर तेज आणि डोळ्यात चमक येते. ज्यांच्या आभाळापेक्षा महान कर्तृत्वापुढे मानच काय तर शब्द देखील झुकतात, ज्यांच्यामुळे मराठी असल्याचा अभिमान अधिकच तीव्र होतो अशा माझ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १६२७ की १६३० कधी झाला यावर मोठा वाद होता. अखेर अनेक गोष्टी पाहून २००० सालातील तत्कालीन सरकारने फाल्गुन वद्य तृतिया शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० ही तारीख स्वीकारली. (Shiv Jayanti)

मात्र २००० सालापासून राज्यात तारखेनुसार आणि तिथीनुसार अशी दोनवेळा शिवजयंती साजरी केली जाते. इंग्रजी कॅलेंडरनुसार १९ फेब्रुवारी रोजी आणि तिथीनुसार येणाऱ्या तारखेला. त्यामुळेच आज १७ मार्च रोजी आपण सर्व तिथीनुसार शिवजयंती साजरी करत आहोत. महाराजांबद्दल बोलावे एवढे आपली पात्रता नाही. संपूर्ण जनतेला स्वराज्याचे स्वप्न दाखवून ते पूर्णत्वास नेण्याचे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. मराठा साम्राज्याचे संस्थापक अशी ओळख असलेल्या महाराजांबद्दल आपण नेहमीच ऐकत असतो. त्यांच्या शौर्यावर आधारित सिनेमे बघतो. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात का असेना बऱ्यापैकी लोकांना महाराजांबद्दल माहिती असेल.(Chatrapati Shivaji Maharaj)

मात्र आज शिव जयंतीचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला महाराजांच्या महत्वाच्या गोष्टीबद्दल सांगणार आहोत. ही गोष्ट म्हणजे महाराजांचा घोडा. हो….आपण नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा बघतो, त्यांची कल्पना करतो, तेव्हा ते नेहमीच घोड्यावर स्वार झालेले आपल्याला दिसतात. घोड्याशिवाय महाराज नेहमीच अपूर्ण असायचे. त्यांचे साथी असणाऱ्या घोड्यांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.(Marathi Top Stories)

=======

हे देखील वाचा : Matheran Closed : माथेरान १८ मार्चपासून बंद होणार ? काय आहेत कारणं

========

शिवाजी महाराजांनी त्यांचे सैन्य तयार करताना त्यात प्रामुख्याने घोडदळाचा समावेश केला होता. या घोडदळामध्ये ते स्वतः आणि त्यांच्यासोबत अनेक निष्णात आणि हुशार घोडेस्वार होते. घोडदळातील स्वरांना स्वतः महाराजच घोडे पुरवायचे आणि त्यांच्या देखरेखीसाठी खिदमतगारही द्यायचे. शिवाजी महाराजांकडे अनेक जातीवंत घोडे होते. शिवाजी महाराज घोड्यांचा वापर निर्णायक प्रसंगी करत असत.(shivaji maharajs horses)

आपण नेहमीच महाराजांच्या कथा, किस्से ऐकताना त्यांनी जवळपास सर्वच महत्वाच्या मोहिमांमध्ये घोडा वापरल्याचे ऐकले आहे. शिवाजी महाराजांनी अनेक मोहिमांमध्ये घोड्यांचा वापर नेमकेपणाने केला. शिवाजी महाराजांकडे एकूण सात घोडे होते. मोती, विश्वास, तुरंगी, इंद्रायणी, गाजर, रणभीर, कृष्णा अशी या घोड्यांची नावे होती. यातल्या कृष्णा या पांढऱ्या रंगाच्या घोड्यावर छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचा राज्याभिषेक झाल्यानंतर बसले होते. महाराज स्वतः घोडेस्वारीमध्ये निपुण होते. ते लहान असताना घोडेस्वारी त्यांचा आवडता खेळ होता.(Trending Topic)

=======

हे देखील वाचा : Shankasur : कोकणात शिमग्याला ‘या’ असुराची पूजा का केली जाते ?

========

छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्याची स्थापना केली तेव्हा त्यांच्या अधिपथ्याखाली ४०० गड होते. काही गडांची स्थापना त्यांनी स्वत: केली होती आणि काही गड त्यांनी युद्ध करून जिंकले होते. महाराजांचा प्रत्येक गड, किल्ला हा स्थापत्यशास्त्र, व्यवस्थापन यांचे आजच्या काळातील लोकांसाठी जिवंत उदाहरण आहे. अतिशय हुशार, चाणाक्ष अशा महाराजांचा एक एक गुण हा सर्वांसाठीच प्रेरणादायी आणि अंगिकारावा असा आहे. महाराजांचे कर्तृत्व, त्यांची कीर्ती, प्रताप हे केवळ महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण जगाला प्रेरणा देणारे आहे. म्हणूनच शिव जयंती ही केवळ महाराष्ट्रात नाही तर १११ पेक्षा जास्त देशांमध्ये मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. यासाठीच तर म्हटले जाते, “निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ।।”(Marathi Latest News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.