Home » Chhangur Baba हिंदू मुलींचं धर्मांतरण करून १०० कोटींची कमाई करणारा…

Chhangur Baba हिंदू मुलींचं धर्मांतरण करून १०० कोटींची कमाई करणारा…

by Team Gajawaja
0 comment
Chhangur Baba
Share

तो बलरामपूरच्या रेहरा गावात सायकलवर कसल्यातरी अंगठ्या आणि ताबीज विकायचा. लोकांना येड्यात काढायचा धंदा त्याने आधीपासूनच सुरु केलेला. या अंगठ्या आणी ताबीज जालीम आहेत, सगळा आजार-बीजार बरा करतात, असं सांगून त्याचा हा धंदा सुरूच होता. हळू हळू लोकांचा विश्वास वाढला. लोकांनीच नंतर त्याला डोक्यावर घेतलं. तो पीर बाबा म्हणून फेमस झाला. त्यात तो गावचा प्रमुख झाला आणि काही वर्षांनीच अचानक तो कोट्यावधी रुपयांचा मालक झाला. बक्कळ पैसा त्याने छापला. प्रॉपर्टी बनवली… कुणाच्याही डोक्यात तसं आलं नव्हतं की याच्याकडे इतका पैसा नक्की आला तरी कुठून… पण काही दिवसांपूर्वी अचानक त्याच्या एका भयानक Racket वर धाड पडली. लोकांना जो सुफी पीर बाबा वाटायचा त्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आला. हा बाबा जे Racket चालवायचा ते होतं, फक्त हिंदू मुलींचं धर्मांतरण. सध्या हा प्रकार लव्ह जिहाद म्हणून ओळखला जातो. यासोबतच तो इतर हिंदू लोकांनाही पैशांची लालच देऊन त्यांना मुस्लीम बनवायचा. याचं नाव जमालुद्दीन उर्फ करीमुल्ला शाह ऊर्फ छांगूर पीर बाबा… पण हे Racket नक्की काय होतं आणि याचा पर्दाफाश कसा झाला ? जाणून घेऊ. (Chhangur Baba)

तर या छांगुर बाबाने लोकांना सुरुवातीला अंगठ्या आणि ताबीजच्या नावाने गंडवल. जसं त्याचा हा धंदा वाढत गेला, तसा त्याने आपला धंदा वेगळ्या ठिकाणी वळवला. आधीच तो कट्टरपंथी होता. नंतर त्याने हिंदू मुलींना टार्गेट करण्याचं ठरवलं. आणि याची मूळ International लेव्हलपर्यंत पोहोचली. तर आता त्याने आपल्या लिंक्स कशा वाढवल्या हे जाणून घेऊ. तर इडीला या बाबाची मनी लाँड्रिंगची खबर लागली होती. त्यांनी त्याच्यावर धाड टाकली. आता आपली खैर नाही, हे कळताच हा पोपटासारखा बोलायला लागला आणि याने सगळ्या गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट याने सांगितली ती म्हणजे हा धर्मांतरण करण्याचं खूप मोठं racket चालवतो, जे आतापर्यंत उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, तमिळनाडू, बिहार, बंगालपर्यंत पसरलय. धर्मांतरण म्हणजे काय तर हिंदू मुलींना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांना पैशांचं आमिष दाखवून इस्लाम स्वीकार करून घेण !

Chhangur Baba

यामध्ये टार्गेट कोण होतं, तर गरीब घरातल्या हिंदू पोरी ज्यांना पैशांची,जॉबची गरज होती. लीगल किंवा मेडिकल गरज होती, त्यांना हे लोकं आपल्या जाळ्यात अडकवायचे आणि त्याचं धर्मांतर करायचे… आता जाळ्यात अडकवायचे म्हणजे नेमकं काय तर या छांगुर बाबाने १००० मुस्लीम तरुण मुलं तयार करून ठेवली होती. ही मूलं त्या हिंदू मुलींना मदतीचं आमिष द्यायचे… त्यांचं ब्रेन wash करायचे आणि नंतर त्यांना इस्लाम स्वीकार करायला लावायचे. या मुलांनाही त्याचं वेगळ पेमेंट मिळत होतं. आता हे सगळ racket चालवायला फंडिंग कुठून येत होतं तर थेट पनामा या देशातून… पनामामधली ‘लोगोस मरीन’ ही कंपनी त्यांना हे racket चालवायला बक्कळ पैसे पुरवायची. महत्त्वाचं म्हणजे पनामा हे इस्लामिक राष्ट्रच नाही. तर या पनामामधल्या कंपनीसोबत त्यांचं मनी लाँड्रिंगचं नेटवर्क पसरलं होतं. इथून पैसा येत असल्यामुळे त्याने आपलं racket एकदम strong करून ठेवलं. या छांगुर बाबाच्या या गोष्टीचं कनेक्शन पाकिस्तानच्या ISI सोबतही असल्याचं उघड झालं आहे. त्याच्या या कामात त्याचा मुलगा मेहबूब, नीतू वोहरा उर्फ नसरीन आणि तिचा नवरा नवीन उर्फ जलालुद्दीन हेसुद्धा भागीदार होते. नीतू आणि नवीन वोहरा या नवरा बायकांनी याच छांगुर बाबाकडे धर्मांतर करून घेतलं होतं. नीतू आणि नवीनसारख्याच ४००० लोकांना त्याने convert केलं होतं. (Chhangur Baba)

अशीही गोष्ट समोर आली की, नेपाळमधल्या पाकिस्तानी एम्बेसीमध्ये यांची गुप्त बैठक झाली होती. छांगुर बाबा चं planning होतं की, ज्या हिंदू पोरींना CONVERT केलं जाईल, त्यांची लग्न नंतर पुन्हा एकदा ISI एजंट आणि स्लीपर सेल्सबरोबर लावून द्यावीत. आणि याच पोरी नंतर आपल्यासाठी गुप्तहेर म्हणून काम करतील. यासाठी त्यांनी एक कोड langauge सुद्धा बनवली होती. उदाहरण द्यायचं झालं तर हे लोकं एक वाक्य वापरायचे… ‘मिट्टी पलटना’ याचा अर्थ होतो धर्मांतरण… याच कोडच्या माध्यमातून हा बाबा आणि त्याची Gang बोलायचे. इडीला मिळालेल्या माहितीनुसार या बाबाची आणि त्याच्या gang मेंबर्सची २० च्या वरती बँक खाती होती. यामध्ये जवळपास १०० कोटींची ढवळाढवळ झाली होती.

===============

हे देखील वाचा :   Japan : अजबच… जपानमध्ये वाढतोय गायब होण्याचा ट्रेण्ड !

===============

यासोबत या बाबाने भारतात खूप ठिकाणी आपली property बनवून ठेवली होती. मुंबईमध्येही या छांगुर बाबाने रुनवाल ग्रीन्स नावाचं एक कॉम्प्लेक्स खरेदी करून ठेवलं होतं. त्यांच्या अशा व्यवहारांची आणखी माहिती त्यांच्याकडून काढण्याचा प्रयत्न इडी करतच आहे. या छांगुर बाबाची चौकशी करत असताना आणखी एक गोष्ट समोर आली आहे, ते म्हणजे यांच्याकडे असलेल ‘शिजर-ए-तैयबा’ नावाचं पुस्तक ! या पुस्तकाचा उपयोग लव्ह जिहाद आणि बेकायदेशीर धर्मांतरसाठी केला जात होता. या बाबाने स्वत हे पुस्तक छापून घेतलं होतं. आता पुस्तकाची गोष्ट समोर आली असली तरी हे पुस्तक देशाच्या कोणकोणत्या भागात पोहोचलं असेल, याची भीती आहे. (Chhangur Baba)

पण यामध्ये सर्वात भयानक गोष्ट समोर आली ती म्हणजे हिंदू धर्मातली मुलगी नेमकी कोण आहे, यावर त्यांच्यावर हे लोकं दर लावत होते. ब्राम्हण मुलींसाठी १६ लाख आणि ओबीसी मुलींसाठी १२ लाख असे यांचे दर असायचे. जो मुस्लीम तरुण या मुलींना आपल्या जाळ्यात अडकवून इस्लाम कबूल करवून घेईल, त्याला तितकी रक्कम मिळायची आणि यासोबतच ब्रेन wash झालेल्या मुलींनाही पैसे मिळायचे. पण आता या छांगुर बाबाचं सगळ पितळ उघड पडलं आहे. हे छांगुर बाबा किंवा याच्यासारखी आणखी काही लोकं आहेत, जे निर्दोष लोकांचं ब्रेन wash करून त्यांना convert करून नंतर त्यांचा वापर देशविघातक कृत्यांसाठी करणाऱ्या कारवाया फक्त धर्मच नाही, तर देशासाठीही भयंकर घातक आहेत. त्यामुळे या अशा लोकांना कोणीही बळी पडू नये, इतकच !


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.