Home » Chhaava Trailer ‘छावा’चा दमदार ट्रेलर आला, पण नक्की निर्माते चुकले कुठे ?

Chhaava Trailer ‘छावा’चा दमदार ट्रेलर आला, पण नक्की निर्माते चुकले कुठे ?

by Team Gajawaja
0 comment
Chhaava Trailer
Share

मौत के घुंगरू पहन कर नाचते है हम औरंग…

शेर नही रहा पर छावा अभी भी जंगल में घूम रहा है…

हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा…

अशा दमदार डायलॉग्स सोबत अखेर छावा चित्रपटाचा ट्रेलर (Chhaava Movie Trailer) आला. इतिहास, पराक्रम, Action, Emotion हे सर्व भरभरून असलेल्या या चित्रपटाची सगळेच वाट पाहत आहेत. त्यात ट्रेलरने तर असा धमाका केला आहे की, चित्रपट उद्याच रिलीज करावा, अशाही कमेंट्स सोशल मिडीयावर येत आहेत. विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराज, रश्मीका मंधाना महाराणी येसूबाई तर अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत यामध्ये दिसणार आहेत. Cinematic Liberty तर ऐतिहासिक चित्रपटांच्या पाचवीला पुजलेली आहे. पण तरीही ट्रेलरमध्ये सगळच हाय स्पेक्टेकल होत, अगदी VFX पण जमून आलय. विकी कौशल तर पूर्णपणे रुद्र अवतारातच आहे. डीरेक्टर लक्ष्मण उतेकर यांचीही मेहनत दिसून येतेय… पण तरीही या ट्रेलरमध्ये काही त्रुटी आहेत, ज्यावर काही प्रेक्षक सुद्धा आक्षेप घेत आहेत. काय आहेत या चुका आणि इतिहास काय सांगतो जाणून घेऊ.(Chhaava Trailer) 

सर्वप्रथम इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते की आजपर्यंत बॉलीवूडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर सोलो असा एकही चित्रपट आलेला नाही. ‘तान्हाजी – द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट देखील पूर्णपणे तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित होता. त्यामध्ये शिवरायांची भूमिका शरद केळकरने केली होती. जी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. पण अति Cinematic Liberty मुळे या चित्रपटावरही टीका करण्यात आली होती. पण आता मात्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर पूर्णपणे सोलो चित्रपट येण, ही मोठी गोष्ट मानली जातेय. आता जरा Cast वर नजर टाकूया…

विकी कौशल, रश्मीका मंधाना आणि अक्षय खन्ना सोडले तर हंबीरराव मोहिते यांची भूमिका आशुतोष राणा यांनी केली आहे. दिव्या दत्ताने सोयराबाईंची भूमिका केली आहे. विनीत कुमार कवी कलश यांच्या भूमिकेत आहे. डायना पेंटी औरंगजेबाची मुलगी झीनत उन्निसाच्या रोलमध्ये आहे. संतोष जुवेकर गणोजी शिर्के साकारतोय. गजनी फेम प्रदीप रावत येसाजी कंक यांचा रोल प्ले करणार आहेत. त्यामुळे अजूनही काही भूमिका गुलदस्त्यात आहेत, ते म्हणजे सईबाई, जिजाऊ मासाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज… ट्रेलरमध्ये हे तिन्ही पात्र कोणी साकारले आहेत, हे दाखवलेलं नाही.(Chhaava Trailer)

छावाच्या तगड्या डायलॉग्सनी सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत. पूर्ण ट्रेलर विकी कौशल आणि डायलॉग्सनीच उचलून धरलेला आहे. त्यातच व्हीएफएक्स सुद्धा परफेक्ट बसलं आहे. व्हीएफएक्सच्या माध्यमातून उभारलेला रायगड उठून दिसतोय. त्यातच Action Sequences, कॉस्च्युम डिझायनिंग सगळ अगदी जमून आलं आहे. पण सगळ्यांनी एका गोष्टीवर रोष व्यक्त केला, तो म्हणजे संभाजी महाराजांना डान्स करताना आणि येसूबाई यांच्यासोबत लेझीम खेळताना दाखवण… यावर अनेकांनी आणि विशेषतः इतिहासकारांनी आक्षेप घेतला आहे, छत्रपती घराणे नृत्य करत नव्हते आणि इतिहासात असा कुठेही उल्लेख नाही, त्यामुळे कोणत्या आधारावर तुम्ही शंभू राजेंना नृत्य करताना दाखवलं आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

याआधीही ऐतिहासिक चित्रपटांमध्ये बाजीराव पेशवे, सदाशिवराव पेशवे, तानाजी मालुसरे यांना नृत्य करताना दाखवण्यात आलं आहे. विकी कौशलच्या मुखी असलेला डायलॉग ‘हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा’ हा सुद्धा अपूर्ण आहे, असं अनेकांचं म्हणणं आहे. ‘हे हिंदवी स्वराज्य व्हावे, ही तर श्रींची इच्छा’ असा हा मूळ उल्लेख असल्याचं सांगण्यात येत आहे. दुसरीकडे रश्मीका मंधाना ही मराठ्यांची महाराणी शोभतच नाही, अशाही कमेंट्स सोशल मिडीयावर पहायला मिळाल्या. तर काही लोकांनी तिला साधे मराठी उच्चार येत नाहीत, असही म्हटलं. त्यामुळे तिचा एकंदरीत अभिनय कसा असेल, हे आपल्याला चित्रपटातूनच कळून येईल. रश्मीकाच्या जागी एखादी मराठी अभिनेत्री हवी होती, असेही सोशल मिडीया युजर्स म्हणाले होते. अक्षय खन्नाची मात्र यावेळी सगळीकडे प्रशंसाच पहायला मिळाली आहे.(Chhaava Trailer)

आता खऱ्या संदर्भांबद्दल बोलायचं झालं तर छावा या शिवाजी सावंत लिखित कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे. अनेकदा ऐतिहासिक चित्रपट हे कादंबरीवर आधारित असतात. कादंबरीत जशा काही गोष्टींमध्ये लिखाणाच्या बाबतीत थोडी लिबर्टी घेतली जाते, तसच चित्रपटांच्या बाबतीतही आहे. त्यामुळेच बाजीराव मस्तानी, पानिपत, तान्हाजी, पद्मावत, पृथ्वीराज या सर्व सिनेमांमधले ऐतिहासिक प्रसंग गंडले. आता संभाजी महाराजांचा इतिहास काही अंशी खोटा लिहिला गेला होता. त्यामुळे काही ठिकाणी ते रगेल आणि रंगेल होते, असं लिहिण्यात आलं. पण संभाजी महाराजांच्या मूळ इतिहासावर प्रकाश पाडण्याचं काम वा. सी. बेंद्रे, डॉ. कमल गोखले, सेतुमाधवराव पगडी, डॉ. जयसिंगराव पवार यांनी केलं आणि त्यानंतर शंभू राजेंचा खरा इतिहास लोकांसमोर आला. (Marathi News)

एकंदरीत आजपासून १०० वर्षांपूर्वी त्यांच्यावर जी मराठी नाटकं आणि सिनेमे आले होते, त्यातही शंभू राजे यांचं पत्र चुकिचच दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे छावा चित्रपट हा Barrier मोडू शकतो, हे दिसून येतं. अलीकडच्या काळात संभाजी महाराजांवर तीन मराठी चित्रपट आले, ते म्हणजे ‘छत्रपती संभाजी’, ‘शिवरायांचा छावा’, ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज ! तिन्ही चित्रपट तसे आपटले. ‘शिवरायांचा छावा’ फक्त थोडफार कलेक्शन करण्यात यशस्वी ठरला. या चित्रपटांमध्ये एक प्रसंग आहे, संभाजी महाराज चक्क वाघासोबत लढाई करत आहेत. आता ऐतिहासिक समकालीन ग्रंथामध्ये, बखरींमध्ये, कागदपत्रांमध्ये याचा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे छावाचीही ही घोडचूक ठरू शकते काम हे पहाव लागेल. कारण छावामध्ये तर शंभू राजे सिंहासोबत लढताना दाखवण्यात आले आहेत.

===============

हे देखील वाचा : Religious संध्याकाळी झाडांना हात न लावण्यामागे आहे मोठे कारण; जाणून घ्या त्याबद्दल

===============

पण तरीही छावा या हिंदी चित्रपटाकडून सर्वांना फारच अपेक्षा आहेत. कारण grand scale वर शंभू राजेंवर इतका मोठा चित्रपट येण… आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळण, यामुळेच हा मुव्ही अनेक रेकॉर्ड्स तोडेल हे नक्की. संभाजी महाराजांच्या आयुष्यात अनेक प्रसंग असे आहेत, जे हायलाईट करण्यासारखे आहेत. ते म्हणजे शिवरायांच्या निधनानंतर रायगडावर झालेला कलह, शंभू राजेंचा राज्याभिषेक, बुरहानपूरची लुट, औरंगजेबाची दक्खनमध्ये स्वारी आणि शंभू राजेंशी खुला संघर्ष, सिद्दी आणि पोर्तुगीजांसोबतचा लढा, अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे छावा हा चित्रपट शंभू राजेंचा एकूण लढा अडीच तासात क्लिष्ट करून दाखवतो की सुटसुटीतपणे सादर करतो, हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.(Chhaava Trailer)

आता चित्रपट तयार करणाऱ्यांची फौज बघुया… छावा नावाचं धनुष्य डिरेक्टर लक्ष्मण उतेकर आणि Maddock Films नेम म्हणजेच दिनेश विजानने पेललं आहे. लक्ष्मण उतेकर यांनी याआधी ‘मिमी’, ‘जरा हटके जरा बचके’ आणि ‘लुका छुपी’ असे चित्रपट केले होते, जे चांगलेच गाजले. पण हे सगळे romantic ड्रामा, सोशल इश्यूवर बेस्ड होते. आता त्यांनी थेट ऐतिहासिक चित्रपटावर उडी घेतली असून थेट संभाजी महाराजांचा इतिहास उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. Maddock Films चाही हा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट…(Chhaava Trailer)

चित्रपटाला म्युझिक देण्याच्या बाबतीतही योग्य निवड केल्याचं दिसून आलं आहे. कारण संगीताचा बादशाह ए आर रेहमानचं संगीत या चित्रपटाला लाभलं आहे. ए आर रहमान यांनी यापूर्वी जोधा-अकबर, पोन्नियीन सेल्व्हन या ऐतिहासिक चित्रपटांना संगीत दिलं होतं. एकंदरीत ट्रेलरची तीन मिनिटं दमदारही होती आणि तितकीच त्रुटी काढणारी होती. त्यामुळे आता अडीच तासांचा मुव्ही किती impact पाडेल, की केवळ cinematic liberty चा वापर करून शंभू राजेंना एक काल्पनिक हिरो बनवून सोडेल, हे आपल्या १४ फेब्रुवारीच दाखवून देईल.

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.