Home » Chernobyl : चेर्नोबिलच्या परिसरात कुत्र्यांचा रंग झाला निळा !

Chernobyl : चेर्नोबिलच्या परिसरात कुत्र्यांचा रंग झाला निळा !

by Team Gajawaja
0 comment
Chernobyl
Share

चेर्नोबिल हे युक्रेनमधील अणुउर्जा प्रकल्पाचे शहर आहे. १९८६ मध्ये चेर्नोबिलचे नाव जगात सर्वत्र झाले. २६ एप्रिल १९८६ रोजी येथील अणुउर्जा प्रकल्पाच्या एका अणुभट्टीमध्ये चाचणी दरम्यान स्फोट झाला. यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात किरणोत्सर्गी पदार्थ पसरले गेले. या अणुभट्टीमध्ये काम करणा-या चाळीसहून अधिक कामगारांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात किती जखमी झाले, याचा आकडा कधीही जाहीर झाला नाही. ही घटना आतापर्यंतची सर्वात वाईट अणु आपत्ती मानली जाते. कारण या घटनेचे दीर्घकालीन परिणाम फक्त मनुष्याच्या आरोग्यावर झाले असे नाही, तर पर्यावरण आणि पशूपक्षांचीही मोठ्या प्रमाणात हानी झाली. आज या दुर्घटनेला ४० वर्ष होत आली तरीही चर्नोबिल हे नाव घेतले तरी या भागात दहशत पसरते. आता पुन्हा याच चर्नोबिलच्या नावाची दहशत युक्रेनमध्ये पसरली आहे. त्याला कारण ठरले आहेत, ते येथील मोकाट कुत्रे. (Chernobyl)

चेर्नोबिल अणुभट्टीच्या आसपासच्या परिसरात आता फक्त हातावर मोजता येईल, अशी मानवी वस्ती आहे. मात्र येथे भटक्या कुत्र्यांची संख्या मात्र अधिक आहे. या भटक्या कुत्र्यांची निगा एका सामाजिक संस्थेतर्फे ठेवण्यात येते. यातीलच काही कर्मचा-यांना चर्नोबिलच्या आसपास असणारे कुत्रे हे चक्क निळ्या रंगाचे झालेले आढळून आले आहेत. एकापाठोपाठ एक असे निळे कुत्रे सापडायला लागल्यामुळे या भागात खळबळ निर्माण झाली आहे. पुन्हा चर्नोबिलसारखी दुर्घटना होणार का, अशी भीती व्यक्त करण्यात आली. त्यातच अवघ्या तीन दिवसात कुत्र्यांचा रंग गडद निळा झाला आहे. त्यामुळे ४० वर्षापूर्वी घडलेल्या दुर्घटनेचा हा परिणाम आहे की, नव्यानं एखाद्या अपायकारक अशा रसायनाच्या संपर्कात हे कुत्रे आले आहेत, याचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे चेर्नोबिल अणुउर्जा प्रकल्पाची दहशत पुन्हा युक्रेनमध्ये पसरली आहे. (International News)

२६ एप्रिल १९८६ रोजी आत्ताच्या युक्रेनमधील आणि तेव्हाचे सोव्हिएत रशियामधील चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पात एक विनाशकारी अणु अपघात झाला. या अपघातानं फक्त रशियाच नाही, तर अवघं जग हादरलं होतं. अणुउर्जा प्रकल्पाचे फायदे तेव्हा सांगण्यात येत होते, मात्र या अणुउर्जा प्रकल्पात एखादा अपघात झाला, तर त्यात काम करणा-यांना आणि या प्रकल्पाच्या आसपास रहाणा-यांना किती जबरी किंमत मोजावी लागते, हे चेर्नोबिल अणुउर्जा प्रकल्पातील अपघातावरुन स्पष्ट झाले. या दुर्घटनेत किती मृत्यू झाले, याचा आकडा कधीही जाहीर करण्यात आला नाही. मात्र या चेर्नोबिल आपत्तीचे परिणाम अजूनही या प्रदेशात जाणवतात. या परिसरातील पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात झालेली हानी अद्यापही भरुन काढता आलेली नाही. तसेच माणसांसह येथील पशूपक्ष्यांनाही या दुर्घटनेचा फटका बसला होता. आता ४० वर्षानंतर चेर्नोबिलमधून झालेल्या किरणोत्सराचा परिणाम अद्यापही आहे का, हा प्रश्न विचारण्यात येत आहे. कारण चेर्नोबिल अणु आपत्ती स्थळाजवळील कुत्रे निळ्या रंगाचे झालेले आहेत. (Chernobyl)

या परिसरात राहणाऱ्या कुत्र्यांची काळजी घेणाऱ्या एका संस्थेच्या सदस्यांनी या निळ्या रंगाच्या कुत्र्यांचे फोटो शेअर केले आहेत. येथील स्थानिकानी दावा केला आहे की, हा बदल फक्त एका आठवड्यात झाला आहे. यातील अनेकांनी याचा संबंध ४० वर्षांपूर्वी झालेल्या चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पातील अपघाताशी असल्याचे सांगितले आहे. डॉग्स ऑफ चेर्नोबिल या संघटनेने निळ्या कुत्र्यांचे फोटो शेअर केल्यावर सर्वत्र खळबळ उडाली आहे. पूर्णपणे निळ्या रंगाचे हे कुत्रे एकप्रकारचे गुढच आहे. हे कुत्रे आता पकडण्याचा प्रयत्न होत असून ते एखाद्या रसायनाच्या संपर्कात आले आहेत का, याचाही तपास करण्यात येत आहे. १९८६ मध्ये चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पात झालेल्या विनाशकारी अणुदुर्घटनेनंतर येथील नागरिकांनी अन्य सुरक्षित स्थळी स्थलांतर केले. मात्र त्यापैकी अनेकांनी आपले पाळीव प्राणी येथेच सोडून दिले. या प्राण्यांची काळजी घेण्यासाठी डॉग्स ऑफ चेर्नोबिल ही संघटना स्थापन झाली. (International News)

हे देखील वाचा :

=======

China : कामगारांना जमिनीत गाडून त्यावर उभारलं जगाचं एक आश्चर्य!

========

चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पाभोवती २५० हून अधिक भटके कुत्रे राहतात, त्यांची काळजी ही संघटना घेते. सध्या चेर्नोबिल आपत्तीस्थळाभोवतीचा परिसर “बहिष्कार क्षेत्र” म्हणून ओळखला जातो. येथे अगदी तुरळत मनुष्यवस्ती आहे. तेही बेकायदेशीरपणे येथे रहातात. त्यापैकी बहुतेक वृद्ध लोक असून त्यांनी त्यांचे वडिलोपार्जित घर सोडण्यास नकार दिला आहे. अशा नागरिकांची संख्या अंदाजे १३० ते १५० आहे. याव्यतिरिक्त चेर्नोबिल प्रकल्पावर अंदाजे ३,५०० कामगार आहेत. काही पर्यटकही या भागाला भेट देण्यासाठी नियमित येतात. मात्र आता येथील कुत्र्यांचे रंग बदलल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे आणि या प्रकल्पाची नव्यानं तपासणी सुरु झाली आहे. (Chernobyl)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.